Flight engineer Kate Rubins स्थानकातील लॅब मध्ये Cardinal Heart Study वर संशोधन करताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था-
ह्या महिन्यात नासाच्या अंतराळ मोहीम 64 च्या अंतराळवीर Kate Rubins आणि Shannon walker ह्यांनी California येथील Million Girls Moonshot Education Group San Diego येथील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
Dary Ann - ह्या वर्षी नासा संस्थेत आणि Space मध्ये कायकाय नवीन घडामोडी घडल्या ?
Shannon - ह्या वर्षी नासा संस्थेन खूप असामान्य आणि अविश्वसनीय काम करून दाखवलय कोरोनाच्या कठीण काळातही संघर्ष करत ह्या वर्षीं Perseverance Mars Rover च launching झाल पुढच्या महिन्यात ते मंगळावर पोहोचेल Parker Solar probe सूर्याच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करत आहे ह्या वर्षी दोन Space X Crew Dragon स्थानकात आले त्यातून आम्ही स्थानकात पोहोचलो आणि सोयूझ यानातून आमच्या आधी Kate Rubins आणि तिचे सहकारी रशियन अंतराळवीर आले स्थानकात कार्गोशिप्स आले गेले हे सर्व खरच नासाने करून दाखवलय
Nina - सध्या स्थानकात तुम्ही कुठल्या सायंटिफिक प्रयोगावर संशोधन करत आहात ?
Kate -मी व Shannon इथे बायॉलॉजिकल संशोधन करत आहोत मी सध्या बॅक्टेरिया व मानवी हृदयाच्या स्नायूंवर इथल्या झिरो ग्रॅविटीत होणाऱ्या परिणामावर संशोधन करत आहे तिथे पृथ्वीवर आपल्या शरीराभोवती हवेत सतत सूक्ष्म स्वरूपात आपल्याला न दिसणारे बॅक्टेरिया वावरत असतात त्यातील काही मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असतात तर काही अपायकारक तेच बॅक्टेरिया इथे झिरो ग्रॅविटीत कसे बिहेव्ह करतात त्यांच्यात काय बदल होतो ह्या वर मी संशोधन करतेय शिवाय मानवी हृदय इथे झिरो ग्रॅव्हीटीत कसे कार्य करते त्याच्या स्नायूत,पेशीत काय बदल होतो ह्याचे निरीक्षण करून त्यावर संशोधन करतेय ह्याचा उपयोग हार्ट अटॅक वर उपयुक्त औषध व अत्याधुनिक उपचार शोधण्यासाठी होणार आहे
Flight engineer Shannon Walker स्थानकातील Veggie चेंबर मध्ये देखभाल करताना फोटो -नासा संस्था
Bera - स्थानकापासून सूर्याच अंतर किती आहे ?
Shannon - आमच स्थानक पृथ्वीपासून फक्त दोनअडीचशे मैल अंतरावर आहे त्यामुळे सूर्य पृथ्वीपासून जितक्या दूर अंतरावर आहे तेव्हढेच अंतर स्थानक व सूर्यामध्ये आहे 93 मिलियन्स मैल अंतरावर
Estreya - अंतराळवीर होण्यासाठी तुम्ही किती वर्ष ट्रेनिंग घेतल ?
Kate - आधी नासा संस्थेत निवड झाल्यावर दोन वर्ष बेसिक ट्रेनिंग नंतर अंतराळवीर होण्यासाठी पुन्हा अडीच वर्षे स्पेशल ट्रेनिंग घ्याव लागत आणि ते अत्यंत कठीण असत सुरवातीला नासा संस्थेत नंतर अंतराळवीर म्हणून निवड झाल्यावर नासा संस्थेतील आंतरराष्ट्रीय पार्टनर्स असलेल्या जपान,यूरोप ,रशिया ,कॅनडा आणि अमेरिकेतील नासा संस्थेत टेक्सास मध्ये
Natalie - स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील अनुभव कसा असतो ?
Shannon - Excellent! इथे कुठेही कसेही तरंगत जाता येत सुपर हिरोसारख कुठेही छतावर ,भिंतीवर उलट ,सुलट कसही उभे राहता येत खालून वर वरून खाली कसही तरंगत जाता येत पक्षांप्रमाणे ! हा अनुभव मजेशीर आणि रोमांचक असतो
Alex - स्थानकातील Gyroscopic Stabilizer कसे कार्यरत राहते ?
Kate - Good Question! इथे स्थानकात त्या साठी खास यंत्रणा बसविलेली असते स्थानकाला बाहेरून चार मोठ्या आकाराचे C.M.G बसविलेले असतात त्यांना wheels बसविलेले असतात ते प्रचंड वेगाने सतत फिरत असतात त्यांच्या साहाय्याने Gyroscopic stabilizer काम करते पण कधी,कधी सतत फिरत राहिल्याने त्यांची कार्यक्षमता क्षीण होते किंवा ते बंद पडण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्रास होतो अशा वेळी स्थानकाच्या आतील भागातील यंत्रणा कामी येते इथे स्थानकातील आतील भागात Fire thrusters असतात त्यांच्या साहाय्याने Gyroscopic stabilizer पुन्हा कार्यरत होते
Tiegan -अंतराळवीरांची निवड कशी होते ? ट्रेनिंग किती काळ घ्यावे लागते ?
Kate -अंतराळवीर होण्यासाठी नासा संस्थेतर्फे जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा अप्लिकेशन केल्यावर पात्रतेनुसार निवड होते सुरवातीला दोन वर्षांच बेसिक ट्रेनिंग असत नंतर अंतराळवीर होण्यासाठी अडीच वर्षे विशेष ट्रेनिंग दिल जात आणि ते अत्यंत कठीण असत
Esme -अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन यंत्रणा बसविण्यासाठी किती वेळ लागतो हे काम कसे करता ?
Kate -त्या साठी स्थानकाबाहेरील अंतराळातील निर्वात पोकळीत काम कराव लागत हे काम नेहमी किंवा दररोज करावे लागत नाही स्थानकाच्या बाहेर नवीन यंत्रणा बसवायची असल्यास किंवा खराब झालेली यंत्रणा दुरुस्ती साठी ती बदलून नवीन बसविण्यासाठी आम्ही स्पेसवॉक करतो स्थानकात झिरो ग्रॅव्हिटी असते पण बाहेर निर्वात पोकळी असते त्या मुळे तिथे काम कारण खूप कठीण असत त्या साठी आम्ही स्पेशल बनविलेले स्पेस सूट घालतो शिवाय स्पेसवॉकची आधी तयारी करावी लागते हा स्पेसवॉक साधारण सहा ते साडेसहा तासांचा असतो कधीकधी जास्तवेळ लागतो त्यासाठी आधीची तयारी आणि स्पेसवॉक झाल्यावर स्थानकात परतल्यानंतर पूर्ववत होण्यासाठी सहा तास असा दहाबारा तासांचा वेळ लागतो हे काम कठीण असल तरी अशक्य मात्र नाही
Kayla - तुम्ही स्थानकात फिट राहण्यासाठी व्यायाम करता का ?कोणते व्यायाम करता ?
Shannon - हो! इथे सतत तरंगत राहण्यामुळे मसल्स स्ट्रॉंग राहण्यासाठी शरीराला व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते त्या साठी इथे तीन मशिन्स आहेत आम्ही रोज दोन अडीच तास ट्रेडमिल वर व्यायाम करतो इथल्या वेटलेस म्युझिकल मशीनवर व्यायाम करतो तेव्हा व्यायामाबरोबर म्युझिक ऐकताना मजा येते
Tabith - Boston -तुमच्या ट्रेनिंग दरम्यान कुठल चॅलेंज कठीण वाटल ?तुम्ही आधीपासूनच अंतराळवीर होणार हे ठरवल होत का ?
Kate -Hello ! Boston ! मी Boston मध्ये तीन वर्षे होते तिथल्या MIT मध्ये शिकत असताना ! हो ! मी पाच वर्षांची असताना मला जर कोणी तू मोठेपणी कोण होणार अस विचारल तर मी अंतराळवीर होणार असं सांगायची Shannon पण हेच सांगतेय आम्ही दोघींनी लहानपणीच अंतराळवीर होण्याच ठरवल होत नंतर मी पुढे शिकत गेले आम्हाला अवकाशातील ग्रहतारे पाहायची आवड होती सुदैवाने आम्हाला शिकताना टेलिस्कोप मधून ग्रह ताऱ्यांच निरीक्षण करायला मिळाल तेव्हा हि इच्छा तीव्र झाली अंतराळवीर होऊन हे तारे जवळून पाहण्याची मग पुढे सिलेक्शन झाल्यावरचा काळ challenging होता कारण अडीच वर्षांच्या ट्रेनिंग मध्ये खूप काही शिकाव लागत इथे अंतराळवीर होऊन स्थानकात येण्याआधी प्लम्बर ,इलेक्ट्रिशियन,डॉक्टर ,डेंटिस्ट,सायंटिस्ट आणि स्पेसवॉकर हे सार इतक्या कमी वेळात शिकून लक्षात ठेवण खूप कठीण असत challenging असत
Allie - स्थानकाच्या खिडकीतून बाहेर पाहताना तुम्हाला काय,काय दिसत ? कुठल्या वस्तू दिसतात ?
Shannon- खरतर खूप इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात ! कधी पृथ्वीवरच्या भागात क्षितिजापल्याड सुंदर रंगीत Avora दिसतो तर कधी खाली पाहील तर पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पृथ्वी वरचे बर्फाच्छादित डोगर,दऱ्या,खोरे ,हिरवळ नद्या ,ग्लेसिअर्स वै दिसत तर अंतराळात चन्द्र ,सूर्य तारे ,milky way दिसत
Bora - स्थानकातल फूड आणि पृथ्वीवरच घरातल फूड सेम असत का ?
Shannon - छान प्रश्न ! नाही ! इथे पृथ्वीवरच्या सारख ताज अन्न भाजी फळ मिळत नाही इथे आम्ही पृथ्वीवरून आलेल फ्रोझन प्रिझर्व्ह ड्राईड केलेल फूड खातो इथे पृथ्वीवरच्या सारखी ग्रॅव्हिटी नसल्यामुळे इथे पातळ liquid युक्त पदार्थ खाता येत नाही कारण द्रवपदार्थ उलट्या दिशेने वाहू लागतात पण इथे आम्ही ते फूड प्रोसेस करून खातो सॉस व इतर पदार्थ स्थानकात बसवलेल्या ओव्हनमध्ये गरम करून खाता येतात पण चवीत फरक असतो
Nathalie - स्थानकातील computers व इतर इलेक्ट्रिकल वस्तू वर कसे कंट्रोल करता ? त्यांची देखभाल कशी करता ?
Kate - छान प्रश्न ! आमच स्थानक प्रचंड वेगाने सतत फिरत असत पण स्थानकातील यंत्रणेमुळे सर्व वस्तू स्थिर राहतात रोज सकाळी उठल्यावर आम्ही जसे व्यायाम वै करतो तसेच स्थानकातील ऑपरेटस ,computers वै चेक करतो सहसा त्या बिघडत नाहीत पण कधी बिघाड झाला तर लगेच दुरुस्त करतो आम्हाला ट्रेनिंग मध्ये ह्याच प्रशिक्षण दिलेल असत
Emillia - तुम्ही स्थानकात तुमचा फावला वेळ कसा घालवता ?
Kate - आम्ही सर्व अंतराळवीरांनी आता एक आयडिया केलीय आम्ही सर्वजण इथे एकत्रित जमतो आणि मध्यभागी सर्वजण वेगवेगळ्या दिशेने गोलाकार तरंगतो कुणी छताला कुणी खाली कुणी बाजूच्या भिंतीला असे सर्वांची डायरेक्शन ठरवतो आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो अशावेळी एरोमॉडेलिंग मधल्या विमानासारखे आकाशात जसे विमान फोर्सने सरळ दिशेने उडते तशी कसरत करतो खूप मजा येते आणि आम्हाला त्याचा उपयोग होतो प्रॅक्टिस होते एरव्ही खूपदा आम्ही स्थानकातील भिंतीला छताला धडकतो ,आमची टक्कर होते कधी दुखापतही होते शिवाय आम्ही आमचे छंद जोपासतो
स्थानकातील रिकाम्या वेळात अंतराळवीरांचा एकत्रित फोटो पोट्रेट -फोटो नासा संस्था
Gobrielie - अंतराळवीरांना वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात का ?
Kate - हो ! निश्चितच ! इथे नासा संस्थेत अनेक देशांचा अंतराळमोहिमेत सहभाग असल्यामुळे आम्हाला जापनीज,रशियन,इंग्लिश ह्या भाषा शिकाव्या लागतात Shannon ला जर्मन भाषाही येते येथे स्थानकात सर्व सहभागी देशांचे अंतराळवीर एकत्रित राहतात संशोधन करतात त्या मुळे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या भाषा येण आवश्यक असत