मंगळावर कार्यरत Curiosity Mars Rover चिकणमातीयुक्त भागातील उत्खननादरम्यान -फोटो नासा संस्था
नासा संस्था -
नासाने 2012 साली मंगळावर पाठवलेल्या Curiosity मंगळ यानाला मंगळावरील चिकणमातीयुक्त भाग सापडला आहे
मंगळावरील भूपृष्ठाच्या सुरु असलेल्या खोदकामादरम्यान Clay bearing unit ह्या भागात नावाप्रमाणेच भरपूर प्रमाणात चिकणमाती सापडली आहे आतापर्यंतच्या खोदकामात सापडलेल्या खडकाळ भागापेक्षाही हा भाग भरपूर मोठा असून तिथे चिकणमातीचे भांडारच सापडले आहे
Curiosity मंगळयान मंगळ ग्रहावरील Aberlady आणि Kilmarie ह्या दोन भागातील पर्वत रांगांच्या खालील भागात रोबोटिक आर्मच्या साहाय्याने उत्खनन करत असताना चिकणमातीचे हे भांडार सापडले मंगळयानाने पृथ्वीवर पाठवलेल्या सेल्फीमुळे शास्त्रज्ञांना हा भाग दिसला Curiosity यानाने ह्या भागातील मातीच्या नमुन्यांचे फोटो पृथ्वी वर पाठवले आहेत
2012 साली मंगळावर गेलेल्या Curiosity मंगळयानाच्या मंगळावरील दिनगणनेनुसार 2405व्या दिवशी हा शोध लागला नासाच्या अंतराळ एजन्सीतील शास्त्रज्ञांच्या मते हा भाग पर्वतरांगातील खालील भागात आहे
गेल्या सात वर्षांपासून Curiosity मंगळ ग्रहावर अब्जावधी वर्षांपूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात होती का? तिथे पाणी आणि सजीवांना जिवंत राहण्यासाठी योग्य वातावरण होते का? सजीव सृष्टी असल्यास ती कशी होती ह्याचे अवशेष रूपातील पुरावे संशोधित करत आहे त्यासाठी भूपृष्ठाखाली उत्खनन करण्यात येत आहे आणि आतापर्यंत केलेल्या संशोधनात मंगळावर डोंगरदऱ्या,त्यातील आटलेले पाण्याचे स्रोत,नदीचा प्रवाह बर्फाच्या स्वरूपातील सूक्ष्म गोठलेल्या पाण्याचे अस्तित्व आढळले आहे
आणि आता तिथे चिकणमातीचे भांडारच सापडल्याने मंगळावर सजीवसृष्टी अस्तित्वात होती ह्याला आणखी सबळ पुरावा सापडला आहे कारण चिकणमाती तयार होण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते
नदी,नाले दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून येणारा गाळ,पाणी आणि माती ह्यांच्या मिश्रणातून चिकणमाती तयार होते आणि पाणी जीवनासाठी आवश्यक आहे आणि ह्याच चिकणमातीच्या थरावर थर साचून डोंगर तयार झाले असावेत
Curiosity च्या CheMin (Chemistry &Mineralogy ) ह्या अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने हा शोध घेण्यात आला ह्या शिवाय ह्या उत्खननादरम्यान Hematite हे मिनरलही सापडले आहे ते अत्यंत कमी प्रमाणात सापडले असले तरी ह्या आधी केलेल्या मंगळावरील उत्तरेकडील Vera Rubin Ridge ह्या भागातील उत्खननादरम्यान मात्र हे मिनरल आणि Iron Oxide जास्त प्रमाणात सापडले आहे ह्या आधी Gale Crater ह्या भागात पुरेशा प्रमाणात पाण्याचे अस्तित्वही असल्याचे पुरावे सापडले होते आता त्यावर संशोधन सुरु आहे
No comments:
Post a Comment