Thursday 24 May 2018

नासाचे पार्कर सौरयान सूर्याला गवसणी घालण्यासाठी सज्ज

illustration of Parker Solar Probe
                            नासाचे पार्कर सोलर प्रोब हे सौर यान - फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 मे
नासाचे पार्कर सोलर प्रोब हे सौरयान 31जुलै  2018ला नासाच्या फ्लोरिडा येथील स्पेस सेंटर येथून सूर्याकडे झेपावणार आहे पण त्या आधीच त्याची तयारी पूर्ण होत आलीय हे सौर यान प्रथमच सूर्याच्या जवळ जाणार आहे आजवर  एकही यान सूर्यापर्यंत गेलेले नाही
इतक्या दूरवरून सूर्याच्या प्रचंड उष्णतेने पृथ्वीवासी हैराण होतात आणि तप्त तळपत्या सूर्याकडे मानव क्षणभरही पाहू शकत नाही अशावेळेस तिथे सौरयान पाठवून त्याची माहिती मिळवण्याची कल्पनाच किती अचाटआणि  अविश्वनीय पण आजच्या ह्या शास्त्रज्ञांच्या युगात काहीच अशक्य नाहीय
हे पार्कर सोलर प्रोब आपल्या सोबत 11लाखांच्याही पेक्षा जास्त लोकांची नावेही सूर्यावर  पोहोचवणार आहे

memory card containing 1,137,202 names for Parker Solar Probe
     शास्त्रज्ञ हौशी लोकांची नावे मेमरी कार्डमध्ये संग्रहित करून पाठवण्याच्या तयारीत - फोटो -नासा संस्था

पार्कर सोलर प्रोबचे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ निकोल फॉक्स म्हणतात हे अत्यंत कठीण अभियान आहे पण ह्या मुळे आपल्याला सूर्यावरील वातावरणा सोबतच आपल्या ग्रहमालेतील जवळच्या ग्रहांचीही माहिती मिळेल
हे पार्कर सौर यान त्याच्या सातवर्षांच्या कार्यकाळात चोवीस वेळा सौरवातावरणा जवळून फेऱ्या मारेल आजवर एकही सौर यान सूर्याच्या इतक्या जवळ गेले नव्हते पण पार्कर यान हे कठीण काम यशस्वी करेल अशी आशा आम्हाला वाटते
ह्या सौरयानात अत्याधुनिक  सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट असून त्यात शिकागो युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ Eugene Parker  ह्यांचा फोटो व त्यांनी लावलेल्या शोधाच्या माहितीची प्रतही पाठवण्यात येणार आहे त्यांनीच प्रथम सौर वादळवाऱ्याचा (solar wind ) शोध लावलाआणि त्यांचेच नाव ह्या यानाला देण्यात आले आहे विशेष म्हणजे प्रथमच जिवंत माणसाचे नाव ह्या सौर यानाला देण्यात आलेय

dedication plaque and chip for Parker Solar Probe
   Eugene N Parkerह्यांच्या शोधाची माहिती installed केलेली Chip  दाखवताना  - फोटो -नासा संस्था

हे सोलर यान सूर्याच्या कक्षेत प्रवेश केल्या नंतर त्याच्या कार्यकाळात चोवीस वेळा सूर्याच्या वातावरणाजवळून फेऱ्या मारेल आणि तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून ती माहिती पृथ्वीवर पाठवेल त्या मुळे सूर्यावरील वादळी स्फोटाची माहिती मिळेल शिवाय त्याचा सॅटलाईट,अंतराळयात्री व मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाचीही माहिती जाणून घेता येईल
मार्च महिन्यात ह्या अभियाना अंतर्गत इच्छुक व हौशी लोकांना सूर्यावर आपले नाव पाठवण्याची संधी देण्यात आली होती आणि लोकांनीही ह्या अभीयानाला उत्स्फूर्त प्रितिसाद देत ह्या संधीचा लाभ घेतला अकरा लाखांच्याही पेक्षा जास्त नावे नासा संस्थेकडे पाठवली होती
आता 18 मेला ह्या लोकांची नावे मेमरी कार्ड मध्ये संग्रहित करून यानात लावली आहेत आणि लवकरच पार्कर सोलर प्रोब आपल्या सोबत हि नावेही सूर्यावर पोहोचवण्यासाठी आणि सौर प्रवासासाठी सज्ज झाले आहे

Sunday 6 May 2018

नासाचे Insight Mars Lander मंगळाकडे झेपावले


https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/insight-4a.jpg
            Insight Mars Landar च्या उड्डाणाचा ऐतिहासीक क्षण  फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 5 मे
शनिवारी पाच मेला 7.05 p.m.वाजता नासाचे Insight मंगळ यान  कॅलिफोर्निया येथील Vandenberg Air Force येथून मंगळाकडे झेपावले हे मंगळयान तब्बल साडेसहा महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर मंगळ ग्रहावर पोहोचेल काहीही विघ्न न आल्यास नियोजित वेळेत म्हणजे २६ नोव्हेंबर 2018ला तीन वाजता Insight मंगळयान मंगळ ग्रहाच्या भूमीवर सुखरूप पोहोचेल ह्या यानाचा मुक्काम मंगळावर पृथ्वीवरील वर्षगणनेनुसार दोन वर्षे असेल तर मंगळावरील वर्षगणनेनुसार एक वर्ष चाळीस दिवस असेल
ह्या मंगळयानाच्या कार्यकाळात Insight मंगळग्रहावर त्याच्यावर बसवलेल्या विशेष उपकरणाद्वारे मंगळावरील वातावरण ,तिथे होणारे वातावरणातील बदल ,भूकंप , मंगळाची भूकंप प्रवण क्षमता,भूकंप प्रवण क्षेत्र ह्या संदर्भातील अंतंर्गत घडामोडींचे निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती पृथ्वीवर पाठवेल
शास्त्रज्ञाच्या मते मंगळावर पूर्वी भूकंप झाले होते त्यामुळेच मंगळावरील पृष्ठभागांना तडे गेले ,जमीन खिसकली व खोल भेगाही पडल्या आणि मंगळाला पूर्वी  ब्रह्मांडातील उल्काही धडकल्या होत्या
Insight Mars लँडर वर सिस्मोमीटर बसवण्यात आला आहे जेव्हा हे मंगळयान मंगळावरील भूमीवर उतरेल तेव्हा ह्या उपकरणाचा एक रोबोटिक आर्म पृष्ठभागावर सिस्मोमीटर बसवेल तर दुसरा रोबोटिक आर्म त्याच्या सेल्फ हॅमरींगद्वारे मंगळावरील उष्ण वाऱ्यांचे प्रवाह व उष्णतेची तीव्रता ह्याचे निरीक्षण नोंदवेल तसेच मंगळावरील पृष्ठभागावर दहा ते सोळा फूट खोल खड्डा खणेल पृर्वीच्या तुलनेत ह्याची खोली पंधरापट जास्त असेल
ह्या मंगळयानाला सौर ऊर्जेसोबतच बॅटरीच्या ऊर्जेचा पुरवठा केल्या गेला असून शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार हे यान मंगळावर सव्वीस महिने कार्यरत राहू शकेल नासाच्या JPL lab चे Insight चे मुख्य प्रबंधक म्हणतात हा प्राथमिक अंदाज असला तरीही Insight ह्या पेक्षा जास्त काळ कार्यरत राहील मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी seismology च्या ह्या प्रकल्पाचे स्वप्न शास्त्रज्ञ गेल्या चाळीस वर्षांपासून पहात आहेत त्या वेळेस मी student होतो आणि आज मी त्यात सह्भागी आहे असे JPL लॅबचे Insight mars Lander चे मुख्य investigator Bruce Banordt  म्हणतात
ह्या मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेमुळे मंगळावरील वातावरणाची ,भूगर्भांची माहिती मिळेल शिवाय ब्रह्मांडातील पृथ्वी चंद्र आणि इतर ग्रहांची आपल्याला अवगत नसलेली माहितीही मिळेल आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी ,मंगळ ग्रहावरील  मानवी निवासासाठी उपयुक्त ,योग्य ठीकाण ,तेथील मानवासाठी आवश्यक वातावरणाचीही माहिती मिळेल मागच्या मंगळ मोहिमेत मंगळावरील माती ,डोंगर दऱ्या ,volcanoes ,पाण्याचे आटलेले प्रवाह ह्यांची माहिती मिळाली आता ह्या ग्रहाची अंतर्गत रचना व वातावरणाची माहिती मिळेल
ह्या आधी 2012 मध्ये नासाचे क्युरियासिटी मार्स रोव्हर मंगळावर पोहोचले होते आता Insight Mars lander मंगळावर पोहोचेल व तिथली अद्ययावत आधुनिक माहिती पृथ्वीवर पाठवेल
ह्या यशस्वी Insight मंगळ मोहिमेत नासा संस्थेसोबत France ,German आणि अनेक युरोपियन स्पेस एजन्सीची मदत मिळाली नासाचे नवे Administrator Jim Bridenstine  ह्यांनी ह्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले असून हा  ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी ते आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित होते