Tuesday 29 March 2016

मंगळावर सेडीमेंटरी दगडांचे अस्तित्व



            मंगळावरील खोल पाण्याचे कुंड व सेडीमेंटरी दगडाचे अस्तित्व 
             फोटो -NASA/JPL-Caltech /Univ.of Arizona

नासा संस्था - 24 मार्च 
नासाच्या शास्त्रज्ञांना मंगळावर पूर्वी पाणी होते हे सिद्ध करणारा सबळ पुरावा पुन्हा एकदा मिळाला आहे
23 जानेवारी 2016 ह्या दिवशी नासाच्या HIRSE ह्या कॅमेरयाने घेतलेल्या मंगळावरील  Saheki   विवरावरील  छायाचित्रात तिथे असलेल्या दोन खोल पाण्याच्या कुंडाचा भाग छायांकित झाला 
त्या कुंडामध्ये सेडीमेंटरी दगड सापडले आहेत हे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात आलेल्या गाळापासून बनलेले आहेत दगडावर पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्याही खुणा सापडल्या आहेत त्या मुळे पूर्वी मंगळावरील ह्या भागात वाहत्या पाण्याचे कुंड अस्तित्वात होते हे सिद्ध झाले आहे त्यात असलेले दगड त्याच वाहत्या नदीच्या पाण्याबरोबर वहात आलेल्या धूळ माती वाळू व कचऱ्याच्या गाळ तिथेच साचल्याने तयार झाले आहेत वर्षानुवर्षे एकावर एक असे गाळाचे थर तयार होऊन अशा सेडीमेंटरी दगडाची निर्मिती होते त्या मुळे शास्त्रज्ञांना आता ह्या दगडाच्या थरावरून ते किती वर्ष आधी तयार झाले असावेत शिवाय त्याची खोली किती असेल ह्याचा शोध घेणे शक्य झाले असून मंगळावर पाणी कधी अस्तित्वात होते आणि ते कधी आटले आणि नष्ट झाले ह्याचाही शोध घेता येणार आहे    
मंगळाचा हा भाग अंतराळवीरांनी घेतलेल्या छायाचित्रात बरयाच वेळा दिसला पण त्यावर अस्तित्वात असलेले वाहत्या पाण्याचे झरे ,कुंड व सेडीमेंटरी रॉक मात्र जानेवारीत सापडले 
नासाच्या टक्सन येथील अंतराळ व तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी मंगळ संशोधन प्रकल्पा अंतर्गत  हे छायाचित्र घेतले आहे   

Monday 21 March 2016

नासाचे तीन अंतराळवीर सोयुझ यानाने अंतराळ स्थानकात रवाना


            नासा अंतराळवीर जेफ विल्यमस,रशियन अंतराळवीर अलेक्सी आणि ओलेग
नासा संस्था -19 मार्च
नासाच्या मोहीम सत्तेचाळीसद्वारे आणखी तीन अंतराळवीरांनी सोयुझ TMA.20 ह्या यानाने एकोणीस मार्चला अंतराळात झेप घेतली ह्या मोहिमेत रशियन कमांडर  अलेक्सी ओव्ह्चीनीन , फ्लाईट इंजिनिअर ओलेग स्क्रीपोचका आणि अमेरिकेचे फ्लाईट इंजिनिअर जेफ विल्यमस ह्यांचा समावेश आहे  हे तीन अंतराळवीर काझाकीस्थान इथल्या बैकोनुर ह्या अवकाशतळावरून शनिवारी सोयुझ यानाने अंतराळ स्थानकात  पाच महिने राहण्यासाठी गेले आहेत  अवकाश यानाला रशियाचे पहिले अंतराळवीर युरी गागारीन ह्यांचा फोटो लावण्यात आला होता त्यांनी बारा एप्रिल 1961साली पहिल्यांदा अवकाशात झेप घेतली होती अंतराळस्थानकात आता सहा अंतराळवीर मिळून पाच महिने जवळपास अडीचशे पेक्षा जास्त प्रयोग करणार आहेत त्या मध्ये Earth science,  Biology,Human research,physical sciences आणि technology ह्या विषयांचा समावेश आहे
सध्या नासाचे जेफ विल्यम्स हे अंतराळ स्थानकात सहा महिने राहण्यासाठी गेले असून त्यांच्या ह्या मोहीम पुर्ती नंतर ते सर्वात जास्त दिवस राहणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर ठरतील त्यांनी आतापर्यंत तीनदा अंतराळ स्थानकात मुक्काम केला असून हि  त्यांची चवथी अंतराळ मोहीम आहे ते सर्वात जेष्ठ अंतराळवीर असून त्यांना तीन नातवंडेही आहेत
मार्च महिन्याच्या शेवटी सुरु झालेल्या ह्या संशोधन मोहिमेत प्रथमच वास्तव आगीशी संबंधित व पृथ्वीच्या वातावरणात शिरणारया उल्कांसंबंधित संशोधन केले जाइल तसेच सूक्ष्म गुरूत्वाकर्षणात मातीवर होणारया परिणामाचेही निरीक्षण केले जाइल
ह्या मोहिमेतील अंतराळ वीरांना नवीन Expandable Activity Module (BEAM)  ची टेस्ट करण्याची संधी मिळणार आहे हे  मोड्यूल नंतर कार्गो मार्फत अंतराळात पोहोचवले जाइल व अंतराळ स्थानकाला जोडले जाइल हे नवे मोड्युल विस्तारित होणारे असून त्यात राहण्याची सोयही आहे  सध्या अंतराळ वीरांना त्यात राहता येणारनसले तरीही वेळोवेळी टेस्टिंग साठी त्यांना त्यात प्रवेश करता येईल हे  मोड्यूल दोन वर्ष अंतराळात राहण्याच्या क्षमतेचे आहे का ह्याची वेळोवेळी चाचणी घेतल्या जाइल ह्याचा उपयोग आगामी मंगळ मोहिमेसाठी नासा करणार आहे हे नवे मोड्यूल विस्तारित करता येत असल्याने ते रॉकेट मध्ये कमी जागा व्यापेल व राहण्यासाठी जास्त जागा मिळेल ह्या मोहिमेतील अंतराळ वीरांना रशियातून खाद्य सामुग्री ,इंधन व प्रयोगासाठीचे सामान मिळणार आहे
ह्या मोहिमेतील जेफ विल्यम्स सहा मिहीन्याच्या अंतराळ निवासानंतर स्कॉट केली ह्यांचा अंतराळ स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडतील चार जूनला विल्यम्स मोहीम अठ्ठेचाळीसची सूत्रे हाती घेतील व कोप्रा ,Malenchenko व  Peake हे अंतराळवीर पाच जूनला पृथ्वीवर परततील
गेल्या पंधरा वर्षापासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर शक्य नसलेले प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करत आहेत व त्यात यशही मिळवत आहेत हे शोध दूरवरच्या खोल  अंतराळाचे  गूढ उलगडण्याच्या मानवी स्वप्नांना यशस्वी वाटचालीकडे नेणारी पाऊलवाट निर्माण करताहेत ह्या अंतराळातील सूक्ष्मगुरुत्वाकर्षणातील अनोख्या प्रयोगशाळेत आजवर सतराशेहून अधिक प्रयोग केल्या गेले असून त्यात 15  देशातील दोनशे अंतराळ संशोधकांचा सहभाग आहे       

Thursday 17 March 2016

नासा अंतराळवीर स्कॉट केली एक एप्रिलला निवृत्त होणार

             नासाच्या होस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये स्कॉट केली ,मार्क केली चार्लस बोल्डेन व इतर
             फोटो -नासा संस्था
नासा संस्था -16 मार्च
नासा अंतराळवीर स्कॉट केली एक एप्रिलला  निवृत्त होणार आहेत स्कॉट केली ह्यांनी 1996 साली नासा ह्या संस्थेत प्रवेश केला होता नुकतेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात  सलग एक वर्ष राहण्याचा विक्रम करून परतले आहेत
1987 साली न्यूयार्क university तून Electrical Engineer झाल्यानंतर त्यांनी टेनेसी युनिव्हरर्सिटीमधून Aviation System मध्ये मास्टर्स केल 1989च्या जुलै मध्ये केली नेव्हल एअर स्टेशन मध्ये नेव्हल एव्हियेटर म्हणून नोकरीत दाखल झाले आणि 1993 मध्ये त्यांची U.S. Naval Test Pilot School मध्ये जाण्यासाठी निवड झाली 1994साली ट्रेनिंग पूर्ण होताच 1996 साली त्यांचा नासा संस्थेत प्रवेश झाला त्यांच्या ह्या वीस वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात त्यांनी चारवेळा अंतरीक्ष वारी  केली आणि ह्या चार मोहिमेदरम्यान आता पर्यंत ते 520 दिवस अंतराळ स्थानकात राहून आलेत 
1999 साली पहिल्यांदा त्यांनी  S.T.S.-103  ह्या हबल स्पेस टेलिस्कोप सार्व्हीसिंग मिशन मध्ये डिस्कव्हरी ह्या यानाने अंतरिक्षात झेप घेतली 
दुसरयांदा ते S.T.S.-118 ह्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मोहिमेचे पहिले कमांडर म्हणून अंतरिक्षात गेले 
2010 सालच्या Expedition ह्या 26 व्या अंतराळ मोहिमेतहि ते कमांडर म्हणूनच सहा महिन्यासाठी गेले होते 
आणि आता ते सलग एक वर्ष आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून सर्वात जास्त दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित करून आणि संशोधित उपयुक्त माहिती गोळा करून मार्च मध्ये पृथ्वीवर परतले आहेत 
केली हे जरी निवृत्त झाले तरी निवृत्ती नंतरही ते नासा ह्या संस्थेत कार्यरत राहणार आहेत ह्या दरम्यान त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील संशोधनातील गोळा केलेल्या माहिती व नमुन्याच्या सखोल संशोधनात ते सहभागी होतील त्यांनी आणलेले त्यांचे अंतराळ स्थानकातील वास्तव्या दरम्यानचे त्यांचे मेडिकल नमुने आणि त्यांचा जुळा भाऊ मार्क केली ह्यांच्या मेडिकल नमुन्याशी संबंधित त्यांचे संशोधन ते नासा संस्थेत सुरूच ठेवतील केली व त्यांचा भाऊ मार्क केली हे दोघे मिळून उर्वरित पुढील संशोधन करतील 
आपल्या एक वर्षाच्या अंतराळ प्रवासा विषयी सांगताना केली म्हणतात हा प्रवास माझ्यासाठी एकमेव अविस्मर्णीय सुंदर पर्वणीच होती आमच्यासाठी रोजचा दिवस म्हणजे एक नव आव्हानच होत माझ्या नेव्हीतल्या आणि नासातल्या करिअर मूळे मला हे अतुलनीय व अलौकिक काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली आम्हाला आमची बौद्धिक क्षमता ,पात्रता सिद्ध करण्याची संधीही मिळाली अंतरिक्षात जास्त दिवस राहून आम्ही गोळा केलेली माहिती ,केलेले प्रयोग आता आगामी मंगळ व इतर ग्रहांच्या अवकाश मोहिमेत जास्त दिवस राहण्यासाठी उपयोगी पडेल अजूनही मला नासाच्या आगामी अंतरीक्ष यात्रेत सहभागी व्हायला आवडेल नासाच्या सौर सिस्टीम मध्ये काम करायचीही इच्छा आहे आणि नव्या पिढी सोबत सायन्स आणि Technology च्या संशोधनात सहभागी व्हायला आवडेल 
नासाच्या होस्टन इथल्या फ्लाईट डिपार्टमेंटचे डायरेक्टर ब्रेन केली म्हणतात ,स्कॉट केली ह्याचं नासामधील योगदान प्रचंड आहे ह्या एक वर्षात त्यांनी प्रदीर्घकाळ मानवी अंतराळवास्तव्यादरम्यान त्याच्या शारीरिक मानसिक होणारया परिणामाच्या संशोधनात सहभाग घेतला व उपयुक्त माहिती गोळा केली हि माहिती आगामी मंगळ व इतर ग्रहाच्या अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत उपयोगी आहे त्यांची कामावरील निष्ठा ,आवड व अभ्यासू वृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी वेळोवेळी पाठवलेली माहिती व फोटो मुळे लोकांना नासाच्या कार्याची ओळख झाली त्या मुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत 
नासाच्या Administrator चार्लस बोल्डेन म्हणतात ,जेव्हा पहिला अमेरिकन अंतराळवीर मंगळावर पहिले पाऊल ठेवेल तेव्हा तो स्कॉट केली ह्यांनी दाखवलेल्या पाऊल वाटेवरून चालत असेल 
स्कॉट केली ह्यांचे अंतराळ स्थानकातील हे वास्तव्य खरोखरच सोपे नव्हते आधी अंतराळात प्रवेश करण्याचे अग्निदिव्य त्यातून सहीसलामत अंतराळात पोहोचुन अंतराळ स्थानकात प्रवेशणे आणि तिथल्या सूक्ष्म गुरुत्वाकार्षणात स्वत:ला adjust करणे तिथे इथल्या सारख गुरुत्वाकर्षण नसल्यान वस्तूच काय त्यांचही तरंगण मग खाण ,पिण ,झोपण ह्यासाठीची कसरत शिवाय दिवस रात्र ह्याच्या वेळा कार्यकाळ सारच वेगळ त्याच्याशी जुळवून घेताना होणारा त्रास, अपुरी झोप अंतराळात शरीरातील द्रव्य पदार्थही पायाकडे खालच्या दिशेने वाहतात ह्या विपरीत परिस्थितीत इतक्या दिवस राहून संशोधन करण सोप नव्हतच आणि सर्वात महत्वाच म्हणजे किट्ट अंधारात कुठेही मानवी अस्तित्वच काय ,वातावरण झाड फळे फुले प्राणी पक्षी पाणी अन्न काहीच नाही! ना ताजे जेवण ना शांत झोप! ना गरम पाण्यानी अंघोळ ना थंड वारयाची झुळूक ! आपले आप्त स्वकीय मित्र मैत्रीण कोणाचाही संपर्क नाही झालाच तर अधून मधून फोनवरून असल्या रुक्ष वातावरणातही ह्या अंतराळवीरांनी प्रयोग करून अंतराळ स्थानकात लेट्युस ,झीनियाची फुले दररोज देखभाल करून उगवून दाखवली आणि त्याचे फोटो काही तासांच्या आत पृथ्वीवरील लोकांना पहाण्यासाठी पाठवले तंत्रज्ञानाची प्रगती अफाट असली तरी हि प्रगती तितक्याच उत्साहाने तत्परतेने पाठवण्याच श्रेय ह्या अंतराळवीरानांच ध्याव लागेल आजवर अशी त्वरित माहिती पृथ्वीवरील लोकांना आधीच्या मोहिमेतून मिळाली नव्हती ह्या अत्यंत बिझी व रुक्ष वातावरणात स्कॉट केली ह्यांनी खेळकरपणे , मिस्किलतेन तिथले आनंदी क्षण अचूक टिपलेच शिवाय ह्या अंतरीक्ष स्थानकाच्या भ्रमणा दरम्यानही ग्रह,तारे ,आकाशगंगा ,उगवती पृथ्वी सूर्योदय ,सूर्यास्त वै असे जवळपास सातशे फोटो पृथ्वीवरील नागरिकांना पाठवून त्यांचा आनंद अविस्मरणीय क्षण त्वरित पृथ्वी वासियांशी शेअर केले एव्हढेच नाही तर त्यांनी ह्या अंतराळ स्थानकातील वास्तव्या दरम्यान अंतराळ विषयक माहितीपर प्रश्न विचारण्याची संधी नागरिकांना व पत्रकारांना नासा संस्थेतर्फे दिली नासाचे अंतराळवीर Scott Kelly ह्यांनी ह्या एक वर्ष दरम्यान अंतराळात तीनवेळा स्पेस walk केला  डिसेंबरमध्ये त्यांनी अंतराळ स्थानका बाहेर तीन तास सोळा मिनिटेचा  space walk करून विक्रम केला होता त्या दरम्यानचा त्यांचा सेल्फीही त्यांनी पाठवला होता
(  केली ह्यांनी पाठवलेले फोटो व संशोधनाच्या बातम्या ह्याच ब्लॉग वर वाचा  )    

Wednesday 9 March 2016

नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ वीरांगना

                                   नासाच्या अंतराळ वीरांगना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -8 मार्च
आठ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्याने नासाने अंतराळ वीरांगनाचा हा फोटो सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलाय
एप्रिल 2010 साली अंतराळ  स्थानकात गेलेल्या अंतराळ वीरांच्या  मोहीम  S T S 131 मध्ये काही महिला वैज्ञानिकांचाही समावेश होता त्याच मोहिमेदरम्यान ह्या अंतराळ वीरांगनांचा टिपलेला हा फोटो
ह्या फोटोत  डावीकडून
जपानच्या एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी च्या Naoko Yamazaki
नासाच्या  Dorothy Metcalf आणि Lindenburger
आणि Expedition 23 च्या फ्लाईट इंजिनीअर ट्रेसी Caldwell  Dyson
ह्या चार अंतराळ वीरांगना दिसत आहेत 2010 सालच्या एप्रिलमध्ये गेलेल्या S T S 131 ह्या अंतराळ मोहिमेतील ह्या टीम सदस्य अंतराळ स्थानकाच्या " मल्टी पर्पज लॉजिस्टिक मोड्युल" विभागापासून रोबोटिक आर्मच्या सहाय्याने अंतराळ स्थानकातील कार्गो वेगळे करून दुसरीकडे हलवत आहेत
ह्या अंतराळ मोहिमेत सुरवातीला सात अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले नंतर नासाच्या केनडी स्पेस स्टेशन मधून उर्वरित सहा अंतराळवीर अंतराळ स्थानकात त्यांच्या सोबत राहायला गेले तेव्हा प्रथमच ह्या अंतराळ मोहिमेत ह्या चार अंतराळ वीरांगना एकत्र आल्या होत्या

Wednesday 2 March 2016

आज अंतराळवीर स्कॉट केली आणि मिखाईल Kornienko स्पेस स्टेशन वरून परतले


                                    फोटो-नासा संस्था- स्कॉट केली स्पेस स्टेशनमध्ये
नासा संस्था -2 मार्च
नासाचे अंतराळवीरव मोहीम 46 चे कमांडर स्कॉट केली आणि रशियाचे अंतराळवीर मिखाईल  Kornienko स्पेस स्टेशन वरून आपला वर्षभराचा कार्यकाल पूर्ण करून आज पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत
सोयुझ T.M.A.-18 ह्या अंतराळ यानाने ते प्रथम काझाकीस्थान येथे  सकाळी 11 वाजून २६ मिनिटाला  पोहोचले त्यांच्या सोबत रशियाचे Sergey Volkov हेही परतले आहेत ह्या अंतराळवीरांनी  अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये तीनशे चाळीस दिवस वास्तव्य केले
स्कॉट केली जेव्हा पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांच्या स्वागताला
 युनायटेड स्टेटच्या सेकंड लेडी Dr. Jill Biden
,सायन्स आणि Tecnology च्या अध्यक्षा Dr. John Holdren,
 नासाचे administrator Charies Bolden
 आणि स्कॉट केली ह्यांचा जुळा भाऊ ,former आणि नासाचा अंतराळवीर मार्क केली हजर होते
काझाकीस्थाला पोहचल्या नंतर चोवीस तासानंतर ते होस्टन येथिल जोहन्सन स्पेस सेंटर मधे पोहोचतील
शुक्रवारी दुपारी 1ते 2 ह्या वेळात ते नासाच्या टी वी वाहिनीवरून तेथील प्रत्रकारांशी संवाद साधतील त्यानंतर पंधरा मिनिटे ते नागरिकांच्या प्रश्नांनाही उत्तरे देतील  दुपारी दोन वाजता ते स्वत:चे अनुभव शेअर करतील तर एक वाजता नासाच्या अंतराळवीरांशी व शास्त्रज्ञांशी संवाद साधतील
     
                                             स्पेस स्टेशन मधील शेवटच्या सुर्योदयाच हे नयनरम्य दृश्य

                        फोटो - स्कॉट केली (नासा संस्था)
नासा संस्था -1मार्च 2016
स्कॉट केली ह्यांनी स्पेस स्टेशन सोडताना उगवत्या सूर्याचा हा नयनरम्य फोटो टिपलाय आणि त्यांच्या चाहत्यांना पाठवलाय त्या खाली त्यांनी लिहलय," माझा स्थानकातला शेवटचा सूर्योदय "
स्कॉट केली ह्यांनी  एक मार्च 2016 ला सकाळी आठ वाजून दोन मिनिटाला हा फोटो घेतलाय

                             सोयुझ T M A-18M  हे अंतराळ यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतताना
                    फोटो -नासा Bill Ingalls

            अंतराळवीर स्कॉट केली व मिखाईल Kornienko पृथ्वीवर परतल्यावर पृथ्वीवरील ताजी व शुद्ध हवेत                                          श्वास घेण्याचा आनंद लुटताना

                      फोटो -नासा संस्था
नासाचे अधिकारी चार्लस बोल्डेन म्हणतात कि स्कॉट केली हे अंतराळ स्थानकात वर्षभर वास्तव्य करणारे पहिले अमेरिकन आहेत त्यांनी ह्या मोहिमे द्वारे खूप मोलाचे संशोधन केले असून ते आगामी मंगळ मोहिमे साठी उपयोगी पडेल
ह्या एक वर्षाच्या अंतराळ निवासात अंतराळवीरांनी मानवी आरोग्याशी संबधित व आगामी मंगळ मोहिमेशी निगडीत चारशे वेगवेगळे प्रयोग केले त्यात वजनरहित अवस्थेत मानवी शरीराचे जुळवून घेणे ,एकांत ,radiation आणि लांब व मोठ्या अंतराळ प्रवासामुळे येणारा मानसिक ताण असे अनेक विषय अभ्यासले गेले स्कॉट केली ह्यांचा जुळा भाऊ मार्क केली ह्यांनी हाच अभ्यास पृथ्वीवरील प्रयोग शाळेत केला व शास्त्रज्ञांनी ह्या दोन्हि संशोधनाचे निष्कर्ष काढून अंतराळाचा मानवी शरीरावर ,आरोग्यावर होणारया परिणामाचा अभ्यास केला गेला
अंतराळात  वजनरहित अवस्थेत मानवी शरीरातील द्रव्य पदार्थ वर सरकतात व त्या मुळे काही बदल होऊन intracranial  pressure वाढण्याची शक्यता असते म्हणूनच दूर अंतराळ प्रवासाला जाण्यापूर्वी ह्या समस्येवर उपाय शोधणे आवश्यक आहे ह्या अभ्यासात Russian Chibls हे उपकरण वापरून शरीरातील द्रव्य खाली पायाकडे परत ओढले जाते आणि असे करताना अंतराळ वीरांच्या डोळ्यात झालेले बदल टिपले जातात नासा आणि Roscosmos  ह्या संस्थेद्वारे हा अभ्यास सुरु ठेवण्यात येणार असून स्थानकातील अंतराळवीर ह्या प्रयोगात सामील होतील
पृथ्वी भोवती फिरताना ह्या अंतराळवीरांनी त्या स्थितीचा लाभ घेत वेगवेगळी  छायाचित्रे घेतली अंतराळ स्थानकात डार्क mattar अभ्यास करण्यासाठी काही उपकरणे पोहोचवली गेली स्पेस क्राफ्ट च्या operating swarmsची चाचणी घेण्यात आली केली व मिखाईल ह्यांच्या वर्षभराच्या मुक्कामात पृथ्वीवरून सहावेळा सामान पाठवण्यात आले केली ह्यांचा नासाच्या दोन कार्गो फ्लाईट च्या रोबोटिक capture मध्ये सहभाग होता
केली ह्यांनी ह्या दरम्यान तीनवेळा स्पेस walk केले हे space walk स्तानकाची देखभाल ,दुरुस्ती व तांत्रिक कारणासाठी होता
Gennady Padalka ,  स्कॉट केली आणि Kornienko हे 27मार्च 2015 ला अंतराळ स्थानकात एक वर्षाच्या मुक्कामासाठी गेले होते त्यांच्या सोबत  स्थानकात सहा वेगवेगळ्या देशाचे अंतराळवीरही होते  केली ह्यांनी 520 दिवस स्थानकात राहण्याचा विक्रम केला तर  Kornienko ह्यांनी त्यांच्या दोन फ्लाईट दरम्यान 516 दिवस अंतराळ स्थानकात मुक्काम केला Volcov ह्यांनी त्यांच्या तीन फ्लाईट मध्ये 548 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य केले आहे


Tuesday 1 March 2016

दिल दोस्तीची रंगतदार रॉक कॉन्सर्टने सांगता

                                 झी वाहिनीवर जवळपास वर्षभर प्रसारित होणारी आणि तरुणाई प्रमाणेच सर्वच वयाच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या दिल दोस्तीची सांगता रंगतदार रॉक कॉन्सर्टने नुकतीच झाली
हि मालिका बंद झाल्यावर ह्या मित्रांनी मिळून प्रेक्षकांसाठी एका रंगतदार रॉक कॉन्सर्टचे आयोजन केले होते ह्या मालिकेतील आशु ,सुजय कैवल्य ,रेशमा ,Ana आणि मिनल ह्या मित्रांच्या मनोरंजक सूत्र संचलनात विनोदाची पेरणी करत सुरेल गाण्यांचा रॉक परफॉरमन्स उत्तरोत्तर रंगत गेला ह्या दोस्तांच सूत्रसंचालन पाहताना प्रेक्षकांना आपण एपिसोडच पहातोय असा भास होत होता कारण ह्या सारया दोस्तांचा सहज सुंदर नैसर्गिक अभिनय !
विशेषत: आशुच(पुष्कराज चीरपुटकर)स्टेजवर रॉक म्हणजे दगड आणण ,उलटी गिटार पकडून किंजलसाठी गाण म्हणत केलेली विनोद निर्मिती उपस्थित तरुणाईला आवडली शिवाय वन्समोअरही मिळाला.
                          ह्या कार्यक्रमात सर्वात जास्त गाणी अमेय वाघने (कैवल्य)म्हटली त्याचा रॉक परफॉरमन्स उत्तम होता त्याच्या सोबत सुजय (सुव्रत जोशी ) आणि मिनल (स्वानंदी टिकेकर ) ह्यांनी म्हटलेली गाणीही उत्तम होती स्वानंदीला तिच्या आईकडून गाण्याचे बाळकडू मिळालेत. सखी गोखले ,पुज ठोंबे ह्यांचा डान्सही छान होता कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जवळपास तीन तास हि तरुण मुल उभी राहून कार्यक्रमाचा आनद लुटत होती हि तरुणाई आपल्या आवडत्या कलाकारांचा हात हातात घेण्यासाठी धडपडत होती आणि स्वानंदी अमेय आणि इतर दोस्त गाणे म्हणत म्हणत स्टेज खाली उतरून ह्या तरुणाईचा जमेल तसा हात हातात घेत होते जवळपास सारेच आपल्या मोबाईल वरून ह्या कार्यक्रमाचे लाइव रेकॉर्डींग करत होते त्या मुळे स्टेजवर अंधार होताच कार्यक्रमस्थळी ह्या मोबाईलच्या प्रकाशाचे दिवे लुकलुकत होते. ह्या कार्यक्रमात ह्या दोस्तांसोबत जुईली जोगळेकर ,रोहित राउत ,लक्ष्य भटनागर ह्या इतर गायकांनीही गाणे गायली.
                            ह्या कार्यक्रमात स्टेजवर राकेश ,किंजल, निशा ह्यांची अनुपस्थिती जाणवत होती शेवटी ह्या दोस्तांनी त्यांना स्टेजवर आणून डान्स केला ह्या कार्यक्रमाला झी वाहिनीवरील इतर मालिकांचे कलाकारही उपस्थित होते.शेवटी ह्या दोस्तांनी दिल दोस्ती बंद होणार असे जाहीर करतात तरुणाई बंद करू नका असे म्हणत होती पण आशुने आम्ही तात्पुरता विसावा घेतोय व लवकरच पुन्हा परत येणार आहोत म्हणताच साऱ्यांनी एकच जल्लोष केला.