Wednesday 20 January 2016

अवकाशात बहरलेल पहिलवहिल झिनियाच टवटवीत फुल

फोटो -स्कॉट केली -अवकाशात बहरलेल पहिलवहिल टवटवीत झिनियाच फुल व कळ्या

नासा  संस्था (अंतराळ स्थानक)  -19 जानेवारी 2016

नव्या वर्षात नासाच्या अंतराळवीरांनी पृथ्वीवासीयांना अंतराळस्थानकात उगवलेल्या झीनियाच्या फुलांची अनोखी भेट देऊन अचंबित केलेय
नासाचे अंतराळ स्थानकातील अंतराळवीर केजल लिंडग्रेन ह्यांनी 16 नोव्हेंबर -2015 मध्ये veggie ह्या प्रकल्पाची सुरवात केली व इतर अंतराळ वीरांनी त्यांना साथ दिली
ह्या प्रयोगा अंतर्गत अंतराळ स्थानकात अंतराळवीरांना लागणारी भाजी,फळे व फुले उगवण्यासाठी उशी सारख्या वाफ्यात बिया पेरण्यात आल्या ह्या आधीही त्यांनी लावलेल्या अंतराळ स्थानकातील लेट्युसच्या रोपाला पाने आली होती व अंतराळवीरांनी ती खाल्ली देखील होती आणि आता अंतराळ स्थानकात ताजी झीनियाची फुले बहरलीत व्हेजी ह्या शोध प्रकल्पा अंतर्गत अंतराळ स्थानकात लागवड केलेली रोपे एका चेंबर मध्ये वाढवल्या जातात तिथे त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये व प्रकाश दिल्या जातो ह्या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत रोपे कशी वाढतात हे जाणुन घेण्यासाठी झीनियाची लागवड केल्या गेली व शास्त्रज्ञांना अपेक्षे प्रमाणे ह्या अभिनव व नाविन्यपूर्ण प्रयोगात यशही मिळालय आणि त्यांच्या प्रयत्न आणि मेहनतीच फळ आता अंतराळ स्थानकात बहरलेल्या झीनियाच्या फुलांच्या रुपात पहायला मिळतय
अंतराळ वीरांसाठी हे काम अत्यंत आव्हानात्मक होत कारण फुलझाडे किंवा भाजीपाला उगवण्यासाठी तिथल सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि रोपे वाढवण्यासाठी आवश्यक असलेल पाणीच तिथे उपलब्ध नव्हत अशा विपरीत परिस्थितीत रोपे वाढवण कल्पनातीत आणि अश्यक्यच !
पण नासाच्या संशोधकांनी जिद्द ,कौशल्य आणि परिश्रमाने हा प्रयोग प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी करून दाखवलाय
सुरवातीला डिसेंबर मध्ये अंतराळवीर  स्कॉट केली ह्यांनी निरीक्षण केले असता त्यांना रोपांची योग्य वाढ होत नसल्याचे लक्षात आले त्यांनी त्या बाबतीत पृथ्वीवरील अंतराळवीरांच्या टीमशी चर्चा करून असे ठरविले कि ,अंतराळस्थानकातील रोपांची निगा पृथ्वीवरून नियंत्रित न करता त्याचे योग्य व्यवस्थापन तिथल्या अंतराळवीरांनीच करावे कारण भविष्यात जेव्हा अंतराळवीर मंगळ व इतर ग्रहावर जास्त दिवस वास्तव्यास जातील व तिथे हा व्हेजी प्रकल्प राबवल्या जाइल तेव्हा तिथल्या वातावरणात रोपांना किती पाणी द्यावे व त्यांची निगा कशी राखावी ह्याचा अंदाज येईल त्या नुसार ह्या प्रयोगात बदल झाला व अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांनी हि जबाबदारी पार पाडत व्हेजी प्रकल्प यशस्वी केला
आणि त्यांच्या प्रयत्न व कष्ठाला यश मिळाले त्यांच्या प्रयत्नामुळेच आधी लेट्युसची पाने आणि आता झिनिया अवकाशात बहरलाय  ह्या ताज्या फुलांचा हा फोटो अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी अंतराळ स्थानकातून टिपलाय व सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलाय       

No comments:

Post a Comment