फोटो -नासा संस्था -अंतराळवीर अंतराळ यानात झोप घेताना
नासा संस्था- 7 जानेवारी 2016
पृथ्वीवरील मानव आणि इतर सजीवांचे झोपणे व उठणे ह्या क्रिया सूर्याच्या उगवण्या व मावळण्यानुसार नैसर्गिक रित्या आपोआपच घडत असतात त्या नुसारच आपले शारीरिक घडयाळ (Biological Clock ) नियमित कार्यान्वित होते
अंतराळ वीर अनुभवतात दर पंचेचाळीस मिनिटांनी सूर्योदय व सूर्यास्त
अंतरिक्षातील अंतराळ स्थानकात राहणारे अंतराळवीर मात्र नियमित झोप घेऊ शकत नाहीत कारण हे अंतराळवीर अंतराळ यानातून भ्रमण करतात आणि यान पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे अंतराळवीरांना
दर पंचेचाळीस मिनिटांनी सूर्योदय व सूर्यास्त पाहायला मिळतो त्या मुळे त्यांच्या निसर्गनिर्मित शारीरक घड्याळाचे गणित बदलते व त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो
सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि यानांची येजा ह्या मुळे येतो झोपेत अडथळा
शिवाय अंतराळवीरांना अंतराळ मोहिमेदरम्यान तिथल्या विपरीत परिस्थितीच्या वास्तवाचेही परिणाम जाणवत आहेत तिथल्या सुक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीरांचे स्नायु कमकुवत होतात त्या मुळे निद्रानाश व पुरेशा झोपे अभावी येणारी अस्वस्थता अशा मनस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते अंतराळ प्रवासाआधी व प्रवासादरम्यान अंतराळ वीरांच्या झोपेच्या नैसर्गिक शारीरिक घडयाळात बदल झाल्याने त्यांना नियमित झोप येत नाही ह्या निद्रानाशावर उपाय म्हणून त्यांना झोपेचे ऒषध घ्यावे लागते त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अंतराळ स्थानकात ये,जा करणारया वेगवेगळ्या यानांमुळेही अंतराळवीरांना त्यांच्या झोपेच्या वेळा बदलाव्या लागतात त्या मुळेही झोपेत अडथळा येतो
नासाचे संशोधक Flynn -Evons म्हणतात विमान प्रवासात होणारया Jet Lag (दुसरया देशातील बदललेल्या वेळांमुळे झोपेवर होणारा परिणाम) सारखेच हे आहे पण त्याचे प्रमाण जास्त आहे
नासाच्या कॅलिफोर्निया येथील सिलिकॉन valley मधील एम्स रिसर्च सेंटर मधील संशोधक Flynn - Evons
व त्यांची टीम बोस्टन मधील Harvard Medical School and Brigham and Women's Hospital इथल्या संशोधकांबरोबर अंतराळ वीरांना भेडसावणारया निद्रानाश व त्यासाठी त्यांना घ्यावे लागणारे ऒषध व त्या मुळे त्यांच्या शरीरावर होणारे विपरीत परिणाम ह्याचा अभ्यास करून त्यावर योग्य उपाय शोधत आहेत
संशोधकांनी बनवले Activity Monitors ,Performance Simulation Software (CPSS) चीही निर्मिती
संशोधकांनी त्या साठी एकवीस अंतराळ वीरांच्या 3248 अंतराळ मोहिमेतील वास्तव्याची माहिती गोळा केली असून त्या द्वारे त्यांच्या झोपेवर काय व किती परिणाम झाला ह्याचा सखोल अभ्यास केला ह्या साठी संशोधकांनी अंतराळ वीरांना मनगटावर घालण्यासाठी फिटनेस band सारखे दिसणारे Activity Monitors दिले त्या वरून संशोधकांनी अंतराळ वीरांच्या झोपेच्या उठण्याच्या वेळा,झोपेचा कालावधी, झोपेची गुणवत्ता आणि त्यांचे औषध व caffeine घेण्याचे प्रमाण ह्याची एक आठवडाभर नोंद केली तसेच अंतराळ वीरांना त्यांच्या झोपेबद्दल व त्या मुळे त्याच्या आरोग्यावर होणारया परिणामाबद्दल माहिती विचारल्या गेली
आता नासाचे संशोधक अंतराळ वीरांचे आरोग्य चांगले रहावे व बदलणारया biological clock मुळे त्यांना होणारा निद्रानाशाचा त्रास दूर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत त्यांना औषधाशिवाय चांगली झोप यावी ह्या साठी ते आणखी संशोधन करत आहेत नुकतीच त्यांनी Performance Simulation Software (CPSS) ची निर्मिती केली आहे आता त्याच्या सहाय्याने ते अंतराळ वीरांच्या निद्रानाशावर उपाय शोधत आहेत

No comments:
Post a Comment