Wednesday 20 January 2016

अवकाशात बहरलेल पहिलवहिल झिनियाच टवटवीत फुल

फोटो -स्कॉट केली -अवकाशात बहरलेल पहिलवहिल टवटवीत झिनियाच फुल व कळ्या

नासा  संस्था (अंतराळ स्थानक)  -19 जानेवारी 2016

नव्या वर्षात नासाच्या अंतराळवीरांनी पृथ्वीवासीयांना अंतराळस्थानकात उगवलेल्या झीनियाच्या फुलांची अनोखी भेट देऊन अचंबित केलेय
नासाचे अंतराळ स्थानकातील अंतराळवीर केजल लिंडग्रेन ह्यांनी 16 नोव्हेंबर -2015 मध्ये veggie ह्या प्रकल्पाची सुरवात केली व इतर अंतराळ वीरांनी त्यांना साथ दिली
ह्या प्रयोगा अंतर्गत अंतराळ स्थानकात अंतराळवीरांना लागणारी भाजी,फळे व फुले उगवण्यासाठी उशी सारख्या वाफ्यात बिया पेरण्यात आल्या ह्या आधीही त्यांनी लावलेल्या अंतराळ स्थानकातील लेट्युसच्या रोपाला पाने आली होती व अंतराळवीरांनी ती खाल्ली देखील होती आणि आता अंतराळ स्थानकात ताजी झीनियाची फुले बहरलीत व्हेजी ह्या शोध प्रकल्पा अंतर्गत अंतराळ स्थानकात लागवड केलेली रोपे एका चेंबर मध्ये वाढवल्या जातात तिथे त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये व प्रकाश दिल्या जातो ह्या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत रोपे कशी वाढतात हे जाणुन घेण्यासाठी झीनियाची लागवड केल्या गेली व शास्त्रज्ञांना अपेक्षे प्रमाणे ह्या अभिनव व नाविन्यपूर्ण प्रयोगात यशही मिळालय आणि त्यांच्या प्रयत्न आणि मेहनतीच फळ आता अंतराळ स्थानकात बहरलेल्या झीनियाच्या फुलांच्या रुपात पहायला मिळतय
अंतराळ वीरांसाठी हे काम अत्यंत आव्हानात्मक होत कारण फुलझाडे किंवा भाजीपाला उगवण्यासाठी तिथल सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि रोपे वाढवण्यासाठी आवश्यक असलेल पाणीच तिथे उपलब्ध नव्हत अशा विपरीत परिस्थितीत रोपे वाढवण कल्पनातीत आणि अश्यक्यच !
पण नासाच्या संशोधकांनी जिद्द ,कौशल्य आणि परिश्रमाने हा प्रयोग प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी करून दाखवलाय
सुरवातीला डिसेंबर मध्ये अंतराळवीर  स्कॉट केली ह्यांनी निरीक्षण केले असता त्यांना रोपांची योग्य वाढ होत नसल्याचे लक्षात आले त्यांनी त्या बाबतीत पृथ्वीवरील अंतराळवीरांच्या टीमशी चर्चा करून असे ठरविले कि ,अंतराळस्थानकातील रोपांची निगा पृथ्वीवरून नियंत्रित न करता त्याचे योग्य व्यवस्थापन तिथल्या अंतराळवीरांनीच करावे कारण भविष्यात जेव्हा अंतराळवीर मंगळ व इतर ग्रहावर जास्त दिवस वास्तव्यास जातील व तिथे हा व्हेजी प्रकल्प राबवल्या जाइल तेव्हा तिथल्या वातावरणात रोपांना किती पाणी द्यावे व त्यांची निगा कशी राखावी ह्याचा अंदाज येईल त्या नुसार ह्या प्रयोगात बदल झाला व अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांनी हि जबाबदारी पार पाडत व्हेजी प्रकल्प यशस्वी केला
आणि त्यांच्या प्रयत्न व कष्ठाला यश मिळाले त्यांच्या प्रयत्नामुळेच आधी लेट्युसची पाने आणि आता झिनिया अवकाशात बहरलाय  ह्या ताज्या फुलांचा हा फोटो अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी अंतराळ स्थानकातून टिपलाय व सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलाय       

Thursday 14 January 2016

नासाचे संशोधक शोधताहेत अंतराळवीरांच्या निद्रानाशावर उपाय

               फोटो -नासा संस्था  -अंतराळवीर अंतराळ यानात झोप घेताना  


नासा संस्था- 7 जानेवारी 2016

पृथ्वीवरील मानव आणि इतर सजीवांचे झोपणे व उठणे  ह्या क्रिया सूर्याच्या उगवण्या व मावळण्यानुसार नैसर्गिक रित्या आपोआपच  घडत असतात त्या नुसारच आपले शारीरिक घडयाळ (Biological Clock ) नियमित कार्यान्वित होते

अंतराळ वीर अनुभवतात दर पंचेचाळीस मिनिटांनी सूर्योदय व सूर्यास्त 

अंतरिक्षातील अंतराळ स्थानकात राहणारे अंतराळवीर मात्र नियमित झोप घेऊ शकत नाहीत कारण हे अंतराळवीर अंतराळ यानातून भ्रमण करतात आणि यान पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे अंतराळवीरांना
दर पंचेचाळीस मिनिटांनी सूर्योदय व सूर्यास्त पाहायला मिळतो त्या मुळे त्यांच्या निसर्गनिर्मित शारीरक घड्याळाचे गणित बदलते व त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो

सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि यानांची येजा ह्या मुळे येतो झोपेत अडथळा 

शिवाय अंतराळवीरांना अंतराळ मोहिमेदरम्यान तिथल्या विपरीत परिस्थितीच्या वास्तवाचेही परिणाम जाणवत आहेत तिथल्या सुक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीरांचे स्नायु कमकुवत होतात त्या मुळे निद्रानाश व पुरेशा झोपे अभावी येणारी अस्वस्थता अशा मनस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते अंतराळ प्रवासाआधी व प्रवासादरम्यान अंतराळ वीरांच्या झोपेच्या नैसर्गिक शारीरिक घडयाळात बदल झाल्याने त्यांना नियमित झोप येत नाही ह्या निद्रानाशावर उपाय म्हणून त्यांना झोपेचे ऒषध घ्यावे लागते त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अंतराळ स्थानकात ये,जा करणारया वेगवेगळ्या यानांमुळेही अंतराळवीरांना त्यांच्या झोपेच्या वेळा बदलाव्या लागतात त्या मुळेही झोपेत अडथळा येतो
नासाचे संशोधक  Flynn -Evons  म्हणतात विमान प्रवासात होणारया Jet Lag (दुसरया देशातील बदललेल्या वेळांमुळे झोपेवर होणारा परिणाम) सारखेच हे आहे पण त्याचे प्रमाण जास्त आहे
नासाच्या कॅलिफोर्निया येथील सिलिकॉन valley  मधील एम्स रिसर्च सेंटर मधील संशोधक Flynn - Evons
व त्यांची टीम  बोस्टन मधील  Harvard Medical School and Brigham and Women's Hospital इथल्या संशोधकांबरोबर अंतराळ वीरांना भेडसावणारया निद्रानाश व त्यासाठी त्यांना घ्यावे लागणारे ऒषध व त्या मुळे त्यांच्या शरीरावर होणारे विपरीत परिणाम ह्याचा अभ्यास करून त्यावर योग्य उपाय शोधत आहेत 

  संशोधकांनी  बनवले  Activity Monitors ,Performance Simulation Software (CPSS) चीही निर्मिती

संशोधकांनी त्या साठी एकवीस अंतराळ वीरांच्या 3248 अंतराळ मोहिमेतील वास्तव्याची माहिती गोळा केली असून त्या द्वारे त्यांच्या झोपेवर काय व किती परिणाम झाला ह्याचा सखोल अभ्यास केला ह्या साठी संशोधकांनी अंतराळ वीरांना मनगटावर घालण्यासाठी फिटनेस band सारखे  दिसणारे Activity Monitors दिले त्या वरून संशोधकांनी अंतराळ वीरांच्या झोपेच्या उठण्याच्या वेळा,झोपेचा कालावधी, झोपेची गुणवत्ता  आणि त्यांचे औषध व caffeine घेण्याचे प्रमाण ह्याची एक आठवडाभर नोंद केली तसेच अंतराळ वीरांना त्यांच्या झोपेबद्दल व त्या मुळे त्याच्या आरोग्यावर होणारया परिणामाबद्दल माहिती विचारल्या गेली 
आता नासाचे संशोधक अंतराळ वीरांचे आरोग्य चांगले रहावे व बदलणारया  biological clock मुळे त्यांना होणारा निद्रानाशाचा त्रास दूर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत त्यांना औषधाशिवाय चांगली झोप यावी ह्या साठी ते आणखी संशोधन करत आहेत नुकतीच त्यांनी  Performance Simulation Software (CPSS) ची निर्मिती केली आहे आता  त्याच्या सहाय्याने ते अंतराळ वीरांच्या निद्रानाशावर उपाय शोधत आहेत 






     

       

Tuesday 12 January 2016

नासाचे संशोधक तारयांच्या वेगावरून कृष्णविवराचे वस्तुमान काढणार


                                                                                                             फोटो -नासा/ इसा संस्था
 नासा संस्था -8 जानेवारी

पृथ्वीपासून 65 दसलक्ष प्रकाशवर्षे  दूर स्थित N G C 4845 ह्या चक्राकार काशगंगेचे लक्षवेधी छायाचित्र  , नासा  व इसा ह्याच्या सहकार्याने सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान संशोधकांनी हबल दुर्बिणीच्या साह्याने टिपलेय
ह्या अत्यंत प्रकाशमान आकाशगंगेच्या केंद्रस्थानी भव्य कृष्णविवर आहे ह्या कृष्णविवरातील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे कृष्णविवराभोवतीचे तारे आत ओढल्या जातात त्याचा सुSSसु असा आवाजही येतो हे तारे अतिशय वेगाने केंद्राभोवती फिरतात त्यावरूनच तिथे कृष्णविवाराचे अस्तित्व असल्याचा अंदाज येतो
त्या मुळेच शास्त्रज्ञांना आता तारयांच्या वेगावरून कृष्ण विवराचे वस्तुमान काढता येईल असा विश्वास वाटतोय त्यांच्या मते ते सूर्यापेक्षा हजारोपट जड आहे शिवाय आता संशोधकांनी ह्याच तंत्राचा वापर करून
आपल्या मिल्की वे ह्या आकाशगंगेचेही वस्तुमान काढले असून ते सूर्याच्या वस्तुमानाच्या चार मिलियनपट आहे असा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत