फोटो -नासा JPL/Caltech Test rover वरील साधा व केमिकल Laptop
नासा संस्था -18 Nov.
नासाच्या कॅलीफोर्निया ( Pasadena ) येथील Jet Propulsion प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी Chemical Laptopची निर्मिती केली असून त्यावर अजून संशोधन सुरु आहे
अंतराळातील इतर ग्रहावरील जीवसृष्ठीचा शोध घेण्यासाठी अंतराळात नेता येऊ शकेल अशा छोटया व सहजतेने हाताळता येण्याजोग्या उपकरणाचा शोध शास्त्रज्ञ अनेक वर्षापासून घेत आहेत नुकतेच त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा केमीकल Laptop पृथ्वीसारखीच आणखी कोठल्या ग्रहावर जीवसृष्ठी आहे का ह्याचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडेल.
फोटो-नासा संस्था - JPL चे संशोधक Jessica Creamer,Fernanda mora,Peter Wills Chemical Laptop सोबत
कसा आहे हा Chemical Laptop ?
हा Chemical Laptop म्हणजे एक अत्यंत संवेदनशील उपकरण असून त्या द्वारे इतर ग्रहावरील Amino Acid व Fatty Acid चा शोध घेता येईल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटत असून भविष्यात युरोपा व मंगळ ग्रहावर हा Laptop पाठवण्याची त्यांची इच्छा आहे
हा Laptop म्हणजे एक केमिकल Analyzer असून साध्या Laptop पेक्षा थोडा जाड आहे त्यात Amino acid व fatty acid शोधण्यास मदत करणारे Apps आहेत
हा Laptop द्रव्य स्वरूपातील Amino व fatty acid शोधु शकेल पण इतर ग्रहावर हि acids द्रव्य स्वरूपात नसतील आणि तिथे पाणी नसेल तर ?
ह्या समस्येवरही शास्त्रज्ञांनी उपाय शोधलाय त्या साठी त्यांनी Expresso Machine सारखे तंत्रज्ञान वापरले असून मातीचे नमुने पाण्यात मिसळुन 212.F डीग्री तापमानावर वर तापवुन त्याचे Analysis केले जाईल
मागच्या वर्षी शास्त्रज्ञांनी ह्या Chemical Laptop ची यशस्वी चाचणी घेतली असून सद्या हा Laptop आणखी प्रभावशाली करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
JPL प्रयोगशाळेचे प्रमुख संशोधक Peter Wills म्हणतात कि ,"Mars Rover सारख्या Space craft वर हे उपकरण बसवणे हे आमचे अंतिम उद्दिष्ठ आहे " हा Chemical Laptop आणखी प्रभावशाली करण्यासाठी नवीन Laser Technologyचा वापर करण्यावरही संशोधन सुरु आहे Atacama Desert ( Chile ) इथे पुढील चाचणी होणार आहे
पृथ्वीवरील नमुने शोधण्यासाठीही हा Chemical Laptop उपयुक्त आहे वेगवेगळे नमुने किंवा ऒषधातील भेसळ शोधण्यासाठी हे नमुने प्रयोग शाळेत नेण्याऐवजी ते तिथल्या तेथेच शोधण्यासाठी हा Laptop उपयुक्त ठरेल