Monday 27 July 2015

लाखोंच्या संखेने भाविक पंढरपुरात दाखल

 गेल्या महिनाभरापासून हाती टाळमृदुंग व मुखी हरिनामाचा गजर करीत ऊनपावसाची तमा न बाळगता मैलोनमैल पायी चालत पंढरीकडे वाटचाल करणारया वारकऱ्यांच्या दिंड्या आषाढीच्या पूर्व संध्येला पंढरपुरात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जवळपास ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सपत्न्निक पूजेसाठी पंढरपुरात दाखल झाले.जवळपास सर्वच मराठी channels नी  प्रेक्षकांना लाइव टेलिकास्ट दाखवून घरबसल्या वारी दर्शन घडवल त्या त्या चानल्सचे पत्रकार प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊन वारीतली अद्ययावत बित्तंबातमी लोकांपर्यंत पोहोचवत होते
 ह्या वर्षीच वैशिष्ठ म्हणजे तरुणाईची फेसबुक दिंडी, मोबाइल क्रांतीचा उपयोग करत तरुणाईने फेसबुक वरून वारीतल्या लोकांना वारीतल्या आवश्यक गोष्टीची माहिती पुरवली तर सेल्फिचा मोह वारकऱ्यांनाही पडला काही उत्साही तरुणाईने ह्या वेळेस डिजीटल कॅमेरा अश्वाच्या गळ्यात अडकवून  "अश्वाच्या नजरेतून रिंगण सोहळा "  हा अफलातून प्रयोग राबवत लोकांना त्याचे दर्शन घडवले.
 ह्याही वेळी वारीचा उपयोग लोकप्रबोधनासाठी करण्यात आला आणि परमार्थ व पर्यटना सोबत जागृती मोहीमही राबवली गेली त्यात नेहमीच्या "साक्षरता अभियान ,स्वच्छता अभियान ,पर्यावरण संतुलन" ह्या संदेशासोबत " अवयव दान श्रेष्ठ दान "हा उपक्रम राबवला गेला वेगवेगळ्या दहा भाषेतून विठोबाचे नाव टोप्यांवर banners वर लिहुन भाषेची ओळख करून देण्यात आली शिवाय मोडी भाषेचीही माहिती दिल्या गेली वारीच जागोजागी स्वागत होऊन त्यांच्या राहण्याची जेवण्याची सोय करण्यात आली ह्या वेळेस वारीतल्या जेवणात भाकरी पिठल्या सोबत मिष्ठान्न भोजन व धोंड्याचा महिना असल्याने एका ठिकाणी धोंड्याचा (मोदक ) समावेश होता वारीतल्या कष्ठकरयांनी वारीत आपला व्यवसाय करून आपल्या उद्योगशीलतेचे दर्शन घडवले ( हे उदाहरण आत्महत्त्या करू पाहणाऱ्या शेतकरयांपुढे ठेवायला हरकत नाही कर्ज फेडण्यासाठी ते इतर उद्योग करू शकतात  )
 पूजेसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या अमृता फडणवीस ह्यांनीही वारकरयासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.आषाढी एकादशी निमित्त्य पंढरपुरात जवळपास ८-१० लाख भाविक दाखल झाले असून मंदिरापासून सातआठ किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून हि रांग आणखीही लांबवर जाण्याची शक्यता आहे शीघ्र व व्ही आय पी दर्शन बंद असून पदस्पर्श दर्शनाला २० तास तर मुख दर्शनाला दीड दोन तास लागत होते.
एव्हढ्या मोठ्या संखेने पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांच्या सुरक्षाव्यवस्थेचा ताण प्रशासनावर पडला असून लोकांच्या सुरक्षेसाठी सोलापूरहून आलेल्या पोलिसांची सतर्क यंत्रणा सज्ज आहे जवळपास ५००० पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत भाविकांसाठी कोणी अचानक आजारी पडल्यास अध्ययावत उपकरणासह डॉक्टरांचे पथकही सज्ज आहे त्यांच्याकडे ECG मशीन ,oxygen सिलिंडर्स व इतर आधुनिक उपकरणे आहेत इंडियन रेड क्रॉसचे व इतर स्वयंसेवी संघटनेचे स्वयंसेवक लोकांना मार्गदर्शन व आवश्यक मदत देण्यासाठी सज्ज आहेत
 मंदिर आकर्षक रोषणाइने सजले असून मंदिरावर लावलेल्या टी वी स्क्रीन वरून मंदिराबाहेरील लोकांना विठ्ठलाचे दर्शन घेत येत आहे मंदिर समिती तर्फे भाविकांना मोफत चहा पाणी देण्यात येत असून लोकांना मंदिराजवळील अतिक्रमण हटविल्याने दर्शन घेणे सोयीचे झाले आहे. आधीच अस्वच्छतेच्या प्रश्नांनी हैराण झालेले पंढरपूरकर मात्र  वारीनंतर होणारया घाणीच्या समस्येने चिंतीत आहेत तर वारीतल्या वारकरयांची  स्वयंशिस्त स्वच्छतेच्या बाबतीत पंढरपुरात का दिसत नाही? असा सवाल प्रशासना तर्फे विचारला जातोय

वाचा -  आषाढी एकादशी   (वाचा वर क्लिक करा )


Saturday 18 July 2015

सोन्या चांदीचे भाव उतरले

सोन्या चांदीचे भाव सद्या उतरले असून शुक्रवार पर्यंत  २६००० च्या आसपास असलेले standard सोने व ३५००० च्या आसपास  असलेली चांदी शनिवारी आणखी कमी होऊन सोने २५७०० रु तर चांदी ३४५०० पर्यंत उतरली असून अजूनही भाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय 
गेल्या आठवडयात ग्रीसची टळलेली दिवाळखोरी ,चीनच्या उद्योगधंद्याचे दूर झालेले आर्थिक संकट आणि इराणने अणुउर्जा करारावर केलेली स्वाक्षरी ह्या मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले 
शिवाय डॉलरच्या मजबुतीमुळे  आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने विक्रीस काढले लंडन मध्ये सोन्याचे भाव गेल्या आठवडयापासुन कमी होत आहेत त्या पाठोपाठ अमेरिकेतही डॉलरच्या मजबुतीमुळे गुंतवणुकदार सोने विक्री करत असून  सेन्सेक्सने मारलेल्या उसळी मुळे भारतातही शेअरबाजार तेजीत आहे त्या मुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळल्याने भारतात सोन्याचे भाव उतरत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ५ वर्षानंतर भाव इतके कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोन्याचांदीचे भाव आणखी खाली आले तर सोन्याचे भाव २४००० पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून हि स्थिती फार दिवस टिकणार नसल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतोय  

Saturday 11 July 2015

यवतमाळ पावसाच्या प्रतीक्षेत

जुन महिना संपून जुलै अर्ध्यावर आला तरी यवतमाळ येथे अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही त्या मुळे यवतमाळकर पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत जुन मध्ये पावसाने व्यवस्थित हजेरी लावली त्या मुळे शेतकरी व नागरिक सुखावले पण नंतर मात्र पाऊस लांबल्याने नागरिक पुन्हा उन्हाळा अनुभवत आहेत  गेल्या आठवडयात संद्याकाळी साडेसहा पर्यंत सूर्याची प्रखरता जाणवत होती
ह्या आठवड्यातही सूर्याची प्रखरता जाणवत असली तरी मधून अधून काळे ढग दाटून येतात आणि आता पाऊस बरसणार असे वाटत असताना पुन्हा ऊन पडते आणि पाऊस काही येत नाही
वातावरणातील उष्मा आणि उकाड्या मुळे पुन्हा नागरिकांनी कुलर्स बाहेर काढलेत शिवाय यवतमाळकरांना 
आता पुन्हा पाणीटंचाईची चिंता भेडसाऊ लागलीय आधीच पाणीपुरवठा दोनदिवसांनी होतोय पुरेसा पाऊस पडला नाही व धरण भरले नाहीतर पाणीप्रश्न आणखी गंभीर होईल
जूनमधल्या वेळेवर पावसाच्या आगमनामुळे आनंदित झालेल्या शेतकरयांनी आपल्या शेतात पेरणीही केली होती पण पावसाने मारलेल्या दडीमुळे पिके कोमेजू लागल्याने त्यांनाही आता दुबारपेरणीची चिंता लागली आहे 
यवतमाळ येथे आधी दुष्काळ मग अतीपावसाने आलेला पूर ,गारपीट  ह्या मुळे आधीच लोक त्रस्त झाले होते आणि आता पावसाने मारलेल्या दडीमुळे लोकाना पाणीप्रश्न तर शेतकरयांना दुष्काळाची चिंता लागलीय  म्हणुनच लोक आता पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत