Friday 27 March 2015

बातचीत

 गुढीपाडवा ठिकठिकाणी मिरवणुक काढून पहाट जागवून उत्साहात साजरा झाला पूर्वी गणेशोत्सवाला निघणारी मिरवणूक आता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने निघत असते त्या मुळे लोकांना आता अशा मिरवणुकीच नाविन्य फारस राहिलेलं नाही विशेष म्हणजे इकडे ढोलताशांच्या निनादात गुढीपाडवा साजरा होत असताना तिकडे सीमेवर आपले जवान लष्करी वेशात भारतीय हद्दीत घुसलेल्या अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत होते लष्करी तळावर हातबॉम्ब फेकून केलेल्या आत्मघातकी हल्ल्याला प्रत्युत्तर देत होते आधी कथुआ नंतर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वाई येथील जवानासह इतर तीन जवानांना वीरमरण आले तर निरपराध नागरिक जखमी झाले आपल्या प्राणांचे बलिदान देऊन ह्या शूरवीर जवानांनी दोन अतिरेक्यांना यमसदनी पाठवले .सिमेवर आपले जवान रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढतात म्हणुनच आपण निर्धास्त जीवन जगू शकतो सणवार साजरे करू शकतो म्हणूनच अशा वीर जवानांचे सतत स्मरण करायला हवे
ह्या महिन्यात काही चांगले सरकारी निर्णय जाहीर झाले 
त्या पैकी एक म्हणजे वाळीत टाकण्यारयांवर कारवाई करण्याचा निर्णय एखाद्या निरपराध अनिष्ट रूढी परांपरा विरुध्द आवाज उठवणारया लोकजागृती करू पाहणारया नागरिकांना सामुदायिक एकी करून वाळीत टाकल जात त्या मुळे नाहक अशांचा बळी जाण्याचे प्रकार घडतात आणि अशी प्रकरणे उघडकीस आल्यावर त्याच्यावर कारवाईही करण्यात येते तरीही सामाजिक ,आर्थिक ,धार्मिक,राजकीय हितसंबंध जपण्यासाठी आपला हेतू साध्य करण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे मुठभर लोक इतर लोकांना वेठीस धरतात एखाद्या व्यक्तीला ,कुटुंबाला एकी करून वाळीत टाकतात त्यांच्या घरी लोकांना वा कामगारांना येऊ देत नाहीत त्यांना धमकावल जात त्यांना चुकीचा पत्ता देण,त्यांची बदनामी करण,खोटया अफवा पसरवण ,फोन ट्रेस,tap करण,त्यांना आलेली पत्र गहाळ करण,काढून घेण थोडक्यात अशा अनेक प्रकारांनी त्यांची सर्व प्रकारे अडवणूक केली जाते त्यांना एकी करून एकट पाडल जात तेव्हा कमकुवत मनाचे लोक जीव देतात अशी अनेक उदाहरण नेहमी घडतात पण आता सरकारी कठोर कारवाईच्या निर्णया मुळे अशा गोष्टींवर  अंकुश बसेल 
आता अशा वाळीत टाकणारया व्यक्तींना ३ते ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५लाख रु दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे शिवाय त्यांना वृद्धाश्रम ,अनाथाश्रम येथील स्वच्छतागृहाची सफाई करण्याच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात येणार आहे आणि ह्या सेवेचे व्हिडीओ चित्रण व बातम्या देण्याचे स्वातंत्र्य मिडिया प्रत्रकारांना देण्यात येणार आहे त्या मुळे सामाजिक बहिष्कार टाकणारया जातपंचायत ,सोसायटी वा इतर गुन्हेगाराला आपल्या कृत्याची लाज वाटेल व पुन्हा तो अशी कृत्ये करण्यास धजावणार नाही हा हेतू त्या मागे आहे
ह्या वर्षीपासून शैक्षणिक क्षेत्रातही काही महत्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत विद्यार्थी प्रत्येक इयत्तेत त्यांच्या वयाच्या क्षमतेनुसार ज्ञान प्राप्त करतात का? व शिक्षकही विद्यार्थ्याला शिकवण्या योग्य क्षमतेचे आहेत का? ह्याची पडताळणी करण्याकरता शाळेकडून नैदानिक चाचणी घेण्यात येणार असुन त्याचा तपशील शाळेने शिक्षण विभागाला कळवणे बंधनकारक करण्यात येणार आहे शिवाय बाहेरील संस्थेकढूनही अशी चाचणी घेण्यात येणार आहे
पाच वर्षापूर्वी झालेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या त्याचा परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होत होता परीक्षाच नसल्याने त्यांचा जास्त वेळ खेळण्यात जातो व ती उनाड बनतात शिवाय एकदम नववीत परीक्षा देताना त्यांची तारांबळ उडते ती माघारतात त्या मुळे त्यांची नियमित परीक्षा घ्यावी अशी मागणी शिक्षण शेत्रातल्या मान्यवरांकडून होतेय ती योग्यच आहे आता अवैध गुणवाढ, वाढती कॉपी प्रकरणे पेपर सेटिंग अशा शैक्षणिक क्षेत्रातल्या इतर समस्याही सरकारने गांभीर्याने घ्याव्यात अशीही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सरकार तर्फे "भारत रत्न "पुरस्कार जाहीर झालाय  अटलजींसारख्या कुशल नेतृत्व व स्वछ प्रतिमेच्या व्वाक्तीला हा पुरस्कार मिळण हि अभिनंदनीय बाब आहे
                                                                                   yojana.duddalwar@gmail.com 

Tuesday 24 March 2015

उनाळ्यातही फुललेले बदक फुल


उनाळ्यातही फुललेले बदक फुल   

डिसेंबर मध्ये फुललेले बदक फुल 

 

बदक फुलाच्या बदका सारख्या दिसणारया मोहक कळ्या 

फोटो -पुजा दुद्दलवार-BE(Soft),BMC

Wednesday 11 March 2015

पुलगम टेक्स्टाइल

सोलापुरी चादरी ,बेडशीट ,टॉवेल म्हणजे सोलापूरच वैभव आतातर सोलापुरच्या हातमाग व्यवसायान जागतिक बाजारपेठ काबीज केलीय सोलापुरातील मोहन handloom ,मयुर handloom, चाटला टेक्स्टाइल पुलगम टेक्स्टाइल हे काही अग्रगण्य हातमाग व्यावसायी ज्यांनी सोलापूरच्या हातमाग व्यवसायाला देशातच नाही तर परदेशातही नावलौकिक मिळवून दिलाय त्या पैकीच एक पुलगम टेक्स्टाइल
त्यांच्या उद्योगा विषयी त्यांच्या कडून जाणुन घेतलेली हि माहिती
                                                               पुलगम टेक्स्टाइल 


सोलापूरचा हातमाग व्यवसाय नावारूपाला आला तो हातमाग कर्मचारी विशेषत: पद्मशाली साळी समाजामुळे
पूर्वी आणि अजूनही राजेंद्र चौक,साखरपेठ ,दाजीपेठ,निलानगर ,प्रभाकर महाराज रोड ह्या ठिकाणी रस्त्यावर हातमागावर सुत गुंडाळुन  कापड ,साड्या विणणारे कामगार दृष्टीस पडतात
पुलगम टेक्स्टाइलचे मालक " रामय्या पुलगम" हे देखील साळी समाजाचे आंध्रातल्या वरंगल जील्यातल्या  मेडक गावचे सुरवातीला हातमाग कर्मचारी म्हणुन सोलापुरात आले आणि व्यवसायाच्या निमित्याने इथेच स्थायिक झाले त्यांच्या धंद्याची सुरवात १९४९साली अवघ्या चार लुम्सवर झाली त्यांनी सुरवातीला फरसपेटी व जपानी किनारयांच्या साड्याच उत्पादन केल त्या साड्या बायकांच्या पसंतीस उतरल्याने व मागणी वाढल्याने त्यांचा उत्साह वाढला आणि दोन वर्षातच त्यांच्या लुम्सची संख्या आठवर पोहोचली १९५९च्या दरम्यान त्यांनी साखरपेठेत दुकान सुरु केल आणि नऊवारी लक्ष्मी नारायण छाप साड्यांच उत्पादन बाजारात आणल त्यालाही बायकांनी उत्तम प्रतिसाद दिला

लोकांचा वाढता प्रतिसाद आणि वाढती मागणी ह्या मुळे लवकरच त्यांचा धंद्यात जम बसला आणि सातआठ वर्षातच त्यांनी चादर निर्मिती उद्योगात पदार्पण केल त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला तो आजतागायत वाढतोच आहे आता त्यांनी उत्पादित केलेल्या हातमाग वस्तुंची मागणी वाढतच गेल्याने लुम्सची संख्या १०४ वर पोहोचली.लोकांचा उत्तम प्रतिसाद आणि खरेदीसाठी होणारया गर्दीमुळे त्यांनी दाजी पेठेत भव्य शोरूम उघडल  आता प्रचंड प्रतिसाद यश मिळालय पण सुरवातीचा काळ कष्टाचा होता प्रचंड स्पर्धा होती ,अडचणी आल्या पण जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी यश मिळवल त्यांनी आणलेल्या चादरीच्या  मयुरपंख brand ला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय खपही वाढला आणि नावलौकिकही आता त्यांच्या सितारा,रोशनी,राधिका आणि इतर brand च्या चादरी बेडशिट्स ,टॉवेलस आणि इतर हातमाग वस्तुंना देशातूनच नाही तर परदेशातुनही मागणी वाढतेय
त्यांच्या MIDC मध्ये असलेल्या कारखान्यात रोज शेकडो हातमाग वस्तू तयार होतात  दाजी पेठेतील त्यांच्या भव्य शोरूम मध्ये चादरी,बेडशिट ,कर्टन आणि इतर हातमाग वस्तूंचे विशेष दालन व गोडाऊन आहे तिथे शेकडो लोक दररोज खरेदी साठी येतात
.
चादरीचे विशेष दालन 
त्यांच्या मालाचा खप ,नवनवीनउत्पादने आणि quality ह्याची दखल घेत त्यांना इंडियन इकॉनॉमिक  and रिसर्च असोशिएशन (IEORA )ह्या संस्थेतर्फे "उद्योग रत्न" पुरस्काराने व दिल्लीतील  world इकॉनॉमिक प्रोग्रेस सोसायटी तर्फे बक्षीस देऊन गौरवण्यात आलय.            
          

Sunday 1 March 2015

यवतमाळ जिल्यात अवकाळी पाऊस

यवतमाळ येथे भर उन्हाळ्यात अचानक शनिवारी दुपारी गारासह पावसाला सुरवात झाली असुन दुसरया दिवशीही पावसाचा  जोर कायम आहे हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्या नुसार यवतमाळ सह आजूबाजूच्या खेडयात दुपारी तीन नंतर पावसाने हजेरी लावली सुरवातीला संथ गतीने पडणाऱ्या पावसाचा जोर अचानक वाढला सोबतच गारांचाही वर्षाव सुरु झाला सुमारे दहापंधरा मिनिटे गारा पडत होत्या पावसासोबतच आलेल्या वादळाने काही ठिकाणचे मोठे वृक्ष ,घरावरील पत्रे उडून गेले यवतमाळ येथील रस्त्यावरचे  मोठे वृक्ष वादळामुळे उन्मळून पडले विजेच्या तारांनाही वादळाचा तडाखा बसल्याने काही काळ वीज खंडित झाली अमरावती मार्गावर मोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोलमडली , संद्याकाळी थोडावेळ कमी झालेल्या पावसाचा जोर रात्री उशिरा पुन्हा वाढला पावसाने जिल्हा कारागृहाच्या कर्मचारी निवासस्थानाचे छप्पर उडाले तर एका शोरूमच्या समोरील भागातील काचा निखळल्या
फोटो -पुजा दुद्दलवार-BE(Soft)BMC
अवकाळी पावसाने आंब्याचा मोहोर गळून पडला तर,संत्रा ,गहू,हरबरा व इतर पिकांचे नुकसान झाले
यवतमाळ सह दारव्हा,दिग्रस,आर्णी,बाभूळगाव,उमरखेड या तालुक्यांनाही वादळी पावसाचा तडाखा बसला बिटरगाव येथे वीज पडून एक शेतकरी मरण पावला तर त्याची दोन मुले जखमी झाली आहेत गेल्या आठवडाभरात उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र ऊनाचा सामना कराव्या लागणारया नागरिकांना अवकाळी पावसाने गारवा अनुभवायला मिळाला पण शेतीचे नुकसान झाले.