निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसा प्रचाराचा जोर वाढतोय टी.वि. चानल्स दै.पेपर्स,रस्ते ,गावागावातल वातावरण निवडणूकमय झालय मागच्या वेळेस पक्षांची युती असल्यान निवडणूक सरळ,सरळ" नमो व्हर्सेस रागा "अशी होती शिवाय लोकांना बदल हवा होता त्या मुळे उत्साही वातावरण होत
पण ह्या वेळेस सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत जाहीर सभांमधून आपली इतक्या वर्षाची युती होती हे विसरून एकमेकावर आरोप, प्रत्यारोप करत दुषणे देऊ लागलेत लोकांना ह्या साऱ्यांचा वीट आलाय लोक आधीच भ्रष्टाचार ,चोरया ,लुटालूट ,महागाई,भारनियमन,नियमित पाणीपुरवठा व इतर समस्येने त्रस्त झालेत ,वैतागलेत पण ह्या साऱ्यावर कुरघोडी करत निवडणूक प्रचार मात्र जोरात सुरु आहे
दररोज राजरोसपणे कोट्यावधी रकमेची ने-आण सुरु आहे आणि मतदारांना वाटण्यासाठी नेल्या जात असल्याच्या संशयावरून ती रक्कम पकडल्याही जातेय पण हि रक्कम बँकेची आहे व्यवसायाची आहे, पक्षाची आहे असे सांगून सुटका करून घेतल्या जातेय सामान्य नागरिक मात्र सतत चोरया होत असताना कोट्यावधी रकमेची पोत्यातून होणारी ने-आण पाहून आवाक झालाय शिवाय माध्यमांनी कितीही भ्रष्टाचार उघड करून,गुंडांची गुंडगिरी प्रकाशझोतात आणली तरीही काहींना पक्षांनी तिकीट दिलय काहीतर जेलमधून निवडणूक लढवत आहेत अशा वेळेस मतदार मत कोणाला ध्यावे ह्या संभ्रमात न पडला तरच नवल!
ह्या वेळेसच्या निवडणूकीची आणखी नवलाची गोष्ट म्हणजे रोजदारीवर मजूर आणल्यागत निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते आणल्या जात आहेत तेही शंभर ते सात-आठशे रुपये रोज देऊन वर जेवण,नास्ता चहा फुकट!
एव्हढे करूनही कार्यकर्ते मिळत नाहीत म्हणून नेते त्रस्त आहेत अशा बातम्या वाचण्यात येताहेत हे कार्यकर्ते जिथे जास्त पैसे तिकडे आपला मोर्चा वळवत आहेत तर काहीजण त्याही वरताण सकाळी एका पक्षात तर दुपारी दुसरया पक्षाचा प्रचार करताना दिसतात अर्थात नेतेच जिथे पक्षाशी एकनिष्ठ नाहीत तिथे कार्यकर्ते कसे असतील?
काही ठिकाणी तर दारूही पकडण्यात आलीय दहा पंधरा वर्षापूर्वी काही नेते पैसे,दारू व सोबत मिठाचा पुडाही देत असल्याच काही कामकरी खाजगीत सांगत कारण खाल्या मिठाला जागाव म्हणून! पण हि युक्ती आता अशक्यच! नेत्यांच्या पैसे वाटपामुळे कामकरी वर्ग मात्र निष्क्रिय ,व्यसनी ,कर्जबाजारी झालाय आणि त्यांचा त्रास सामान्य नागरिकांना होतोय पण नेते मात्र त्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवतच असतात
हे नेते निवडणुकीला उभे राहताच लोकांपुढे येतात सत्तेत असूनही आधी दिलेलं आणि पूर्ण न केलेलं आश्वासन विसरून पुन्हा नव्यान, नव्या जोशात मी हे करीन !ते करेन! अस आश्वासन देतात नियमित पाणीपुरवठा ,भारनियमन , महागाई ,रस्ते विकास(रस्त्यावरील खड्ड्यांचा विसर,पाडत) व इतर समस्या दूर करण्यासाठीचे जाहीरनामे सादर करतात .जोरात प्रचार करतात रिक्षा मागून रिक्षे फिरतात. आणि आता तर प्रचार हायटेक झालाय
प्रत्यक्षात हे नेते आपण आधी सत्तेत होतो हे मतदार जाणतात हे सोयीस्करपणे विसरतात आणि निवडूनआल्यावर गायब होतात मग समस्या सोडवण ,विकास करण विसरून जातात अशांना मतदारांनी दिलेलं मत वाया जात तेव्हा अशा नेत्यांना मतदारांनी परत बोलवावं त्यांना राजीनामा द्यायला लावावा शिवाय आपला शब्द न पाळणाऱ्या नेत्याला परत बोलावण्यासाठी कायद्यातही कडक तरतुद करायला हवी.
जर एखादा नेता खरच कर्तुत्ववान असेल त्याने आपल्या मतदारसंघाचा विकास केला असेल ,समस्या सोडवल्या असतील भ्रष्टाचार केला नसेल तर त्याच काम हाच त्याचा प्रचार असू शकतो त्या साठी वेगळा प्रचार करावा लागत्त नाही ,रयालीसाठी ,सभेसाठी रोजदारीवर कार्यकर्ते आणावे लागत नाहीत हे सुज्ञ मतदार जाणतोच पण केवळ थोडया पैशासाठी आपल अमुल्य मत विकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे