Monday 22 September 2014

Thank यु, thank यु आर्मी


                                        Thank you , thank यु  आर्मी ,शुक्रिया जवान ,अल्ला तुम्हे सलामत रखे लंबी उमर दे! एक महिला जवानाला दुवा देत होती गेल्या आठवड्यात झेलम नदीच्या पूराच तांडव सुरु असताना मृत्युच्या तावडीतून आपल्या जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त काश्मिरी जनतेचा जीव वाचवणाऱ्या जावानांप्रती  जवळपास सर्वांचीच हीच भावना होती.
               वरून धो धो कोसळणारा पाऊस समोर झेलम नदीच्या पूराच तांडव, दल झीलही पुरान ओसंडून वाहू लागल्यान पूराच पाणी रस्त्यावरून घराघरात शिरलं आणि आपल्या बरोबर घरदार,शेती ,सामान,अन्नधान्य वाहून नेऊ लागल डोळ्यादेखत क्षणात आपल सर्वस्व उध्वस्त होताना पाहून विमनस्क , असहाय काश्मिरी जनतेच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला.
                 पुराच्या काळात जवळपास सर्वच चानल्स वरून लाइव टेलिकास्ट दाखवल्या जात होत चानल्सचे पत्रकार प्रत्यक्ष तिथे जाऊन पाण्यातुन वाट काढत आपला माइक व तोल सावरत पूरग्रस्तांची बितंबातमी लोकांपर्यंत , सरकार पर्यंत पोहोचवतानाच रडणाऱ्या काश्मिरींना धीर देत त्यांच सांत्वन करत होते त्यांना मदतीच आवाहन करतानाच तिथली संपर्क यंत्रणा बंद पडल्यान टी.वि. वरून त्यांची माहिती प्रकाशित करून त्यांना फोन लाईनही  उपलब्ध करून देत होते.
           काहीच्या मते गेल्या १०९ वर्षात तर काहीच्या मते साठ वर्षात एव्हढा प्रलयकारी पूर आला नव्हता पाणी वाहून जाणारे नाले बुजवल्या गेल्याने, दल झील जवळ बांधकाम झाल्याने आणि झीलमध्ये भराव टाकून केलेल्या फुले,भाजीपाल्याचा शेतीमुळे पूर आल्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.
                 जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली  काश्मीर खोर पाण्याखाली गेल.शहरातील रस्ते ,घरे ,दुकाने दहा -पंधरा फुट पाण्यात बुडाल्याने स्थानिक लोक ,पर्यटक अडकून पडले ग़ाड्या पाण्यात वाहू लागल्यान मदतकार्य ठप्प झाल तेव्हा त्वरीत लष्कराला पाचारण करण्यात आल लष्कराच्या तिन्ही दलातील आणि N D R F चे जवान मदतीसाठी धावले लष्कराने आपली विमाने ,Helicopters व water बोट्स मदतीसाठी उपलब्ध करून दिली लष्कराची ,Helicopters ,विमाने लोकांच्या सुटकेसाठी त्यांना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी सतत येजा करत होती दोरखंडाच्या साह्याने लोकांना वर ओढून वाचवण्यात येत होत आधी वृद्ध,रुग्ण व बालकांना वाचवण्यात आल ,पुलवामा जिल्यात लोकांच्या मदतीसाठी गेलेली बोट बुडाली त्यातले दोन जवान बेपत्ता झाले तरीही बोटींनी लोकांना वाचवण्यात येत होत पुरात दोनशे लोक ,जनावरे मेली  वीज गेली पूराच पाणी दोन मजल्याच्याही वर चढल्यान घरातल सामान अन्न धान्य वाहून गेल आणि पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्यान लोकांचे हाल झाले पण लष्कराने त्यांच्या साठीची खाण्याची बिस्किटे ,पाणी ,दुध,औषध ह्यांची पाकिटे ,Helicopters मधून अडकलेल्या लोकांसाठी टाकली .श्रीनगर विमानतळावर पूरग्रस्तांसाठी त्यांच्या जवळचे तंबू ठोकून लोकांच्या राहण्याची सोय केली त्यांना अंथरूण ,पांघरूण दिले जनरेटरवर वीज उपलब्ध केली ,आपल्यासाठीच अन्न शिजवून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली.
                      श्रीनगर मधले सात दवाखाने व मेडिकल कॉलेज पाण्याखाली गेल्याने पुरामुळे आजारी पडलेल्या रुग्णांचे हाल झाले तेव्हा लष्कराने विमानतळावर मेडिकल कॅम्प उभारून लष्करातील मेडिकल चमु स्थानिक रिटायर्ड डॉक्टर्स ,स्वयंसेवक ,नर्स ह्यांच्या मदतीने रुग्णावर उपचार केले इंजेक्शन्स,औषधाची सोय केली.
                           पुरामुळे जागोजागी रस्ते उखडले ,दरडी  कोसळल्या पुलावर पाणी साचल त्या मुळे रस्ते बंद झाले होते वैष्णो देवीचे यात्रेकरू चार दिवस रस्त्यात अडकले तेव्हा जवानांनी त्यांना पहाडी जुन्या रस्त्यांनी व्यवस्थित बाहेर काढल पुराच्या प्रचंड वेगाने आलेल्या प्रवाहाने जम्मू श्रीनगर हाय वे वरचा पुल [लेह पुंछ कडे जाणारा ] पाहता पाहता क्षणात वाहून गेला पण लष्कराच्या अभियांत्रिकी चमूंनी अहोरात्र मेहनत करून अवघ्या सोळा तासात पुन्हा पूल बनवला आणि दोन्हीकडे अडकलेल्या लोकांची सुटका केली.धोक्याचा इशारा दिल्यानंतर काहीजण सुखरूप बाहेर पडले पण काहीजण आपल सुस्थितीतल घर चोरी होईल ह्या भितीन सोडायला तयार नव्हते त्या मुळे ते अडकले तिथल्या स्थानिकांनी टाक्या दारे,टायर बांधून होडी तयार करून त्यांना वाचवले तर काही छतावर चढले   पुरात बेमिना मधली सुगंधी तांदळाची शेती वाहून गेली ,आक्रोड ,सफरचंद ,केशराच नुकसान झाल आधीच अतिरेक्यांचा त्रासान त्रस्त झालेले काश्मिरी नैसर्गिक ,विध्वंसक आपत्तीन बेहाल झाले अश्रू ढाळू लागले.                          
                            नव्वदच्या दशकापर्यंत स्वर्गीय सौदर्याच वरदान लाभलेलं काश्मीर खुशहाल होत कित्येक हिंदी सिनेमांच शुटींग इथे व्हायचं त्या मुळे  साहजिकच काश्मीर पर्यटकांनी गजबजायच इथल्या काश्मिरी विणकरांनी विणलेल्या  व कलावंतांच्या काश्मिरी काशिदाकारीनी अलंकृत झालेल्या शाली,गालिचे ,स्वेटर्स ,रेडीमेड  ड्रेसेस ,सिल्कच्या साडया त्यांनी बनवलेल्या धातूच्या व कागदी हस्तकलेच्या वस्तू लाल लाल सफरचंद पर्यटकांना आकर्षित करायचे अजूनही करतात ऐशीच्या दशकातल बर्फाच्छादित काश्मिरच निसर्ग सौदर्य पाहिलं अनुभल होत  काश्मीरचा कोपरान कोपरा नैसर्गिक सौंदर्यान नटलेला जिकडे तिकडे खळाळत पाणी झरे बर्फाच्छादित गिरिशिखरे ,बर्फाचा भुर भुरता पाऊस ,सुरुची झाडे  सारच विलोभनीय ,अप्रतिम !
                     तेव्हा  सुशोभित शिकारयातून जाताना हाउस बोटीतल्या काश्मिरी बायका पर्यटकांना"आओ बेहनजी चाय पिने"म्हणून बोलवायच्या काश्मिरी कारखानदार खास "काश्मिरी कहवा"  एकदा तरी पिऊन पहा असा आग्रह करायचे  थंडी पासून आपला बचाव करण्यासाठी कोळशांनी{मंद }पेटवलेली कांगडी ओव्हरकोट मध्ये घेऊन फिरणारे काश्मिरी पर्यटकांचे हसून स्वागत करायचे  तिथल्या हाउस बोटीतल्या वास्तव्यात काश्मिरी कलावंतांच्या अप्रतिम कलेच दर्शन तर घडलच शिवाय आपण एखाद्या अद्ययावत सुसज्य घरात आहोत की बोटीत असा प्रश्न पडला  तिथे एक दिवसाच्या वर राहू नका अस सांगण्यात आल होत कदाचित तेव्हाच दहशतवादी सक्रिय झाले असावेत नव्वद नंतर काश्मीर हळू हळू घुमसत गेल सतत भीतीच्या छायेखाली राहील आधी अटलजींनी काश्मिर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण कारगिल युद्धान त्यावर पाणी पडल आणि आता पंतप्रधान मोदींनी तिथल्या सर्वच क्षेत्रातल्या विकासा साठी हजारो कोटीची आर्थिक तरतूद जाहीर केली त्या मुळे काश्मिरी आंनंदित होते पण पुराच्या तांडवान सर्वस्व गेल्याने काश्मिरी हतबल झाले पण काश्मिरी लोकांना लाभलेल्या कलेच्या वरदानामुळे ते पुन्हा आत्मनिर्भर होतील,धैर्याने उभे राहतील  मोदींनी मदतनिधी जाहीर केला आहेच अर्थात सार पुर्ववत व्हायला वेळ मात्र लागेलच .

Monday 8 September 2014

धरण ओव्हरफ्लो पण पाणी कपात सुरूच

यवतमाळ येथे आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असून गेल्या दोनचार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसा मुळे नदीनाले दुथडी भरून वहात आहेतकाही ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे तर काही गावात शेतात पाणी साचले आहे यवतमाळ जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असलेले निळोणा चापडोह बोरगाव ,सायखेड,वाघाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत बेम्बळा धरणाची दारे क्षमते पेक्षा जास्तपाणी भरल्याने उघडण्यात आली असून आसपासच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे इतर धरणे देखील पावसाच्या पाण्याने भरली असून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
              पाणी असे रस्त्यावरून वाहून वाया जात असतान यवतमाळ करांची पाणी टंचाई अजूनही संपली नाही योग्य नियोजना अभावी पाणी पुरवठा अजूनही तीन दिवसांनीच होत आहे म्हणजे तब्बल पाचव्या दिवशी पाणी सोडण्यात येतेय गेल्या तीन चार दिवसा पासून पाणी दोन दिवसाआड सोडण्यात येईल असे सांगण्यात येत असून यवतमाळ येथे चवथ्या दिवशीही पाणी सोडण्यात आलेले नाही पुणे मुंबई व इतर शहरातील धरणातील जलसाठा वाढताच पाणी पुरवठा नियमित म्हणजे दररोज केला गेला पण यवतमाळ येथे मात्र जास्तीचे पाणी रस्त्यावर सोडून दिल्या जात आहे पण जनतेला मात्र कृत्रिम पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागतेय कारण पाणी कपात करून पाणी आठवड्यातून एकदाच सोडल्या जातेय.
                    त्या मुळे नागरिक चिडलेले असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जनतेची मागणी आहे पाणी टंचाई मुळे एकदिवसा आड होणारा पाणी पुरवठा यवतमाळ जिल्ह्यात दोनदा पूर येऊनही पुन्हा नियमित झाला नाही आता देखील भरपूर पाऊस येऊनही अजूनही पाणी आठवडयातून एकदाच सोडण्यात येतेय तो तसाच राहिल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत कारण पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेला बेंबळा प्रकल्प पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु आहे पर्यटन केंद्र करायचे असल्यास वेगळे तळे खोदुन त्यात जास्तीचे पाणी साठवून करता येऊ शकेल जनतेला पाणी पुरवण्यासाठी बांधलेल्या पाणी प्रकल्पाचा उपयोग जनतेसाठी पाणी पुरवण्यासाठीच करावा अशी जनतेची मागणी आहे.
दि. ९
 आठवड्याभर पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणारे जलप्रकल्प ओव्हरफ्लो तरीही आजपासून पाणी दोन दिवसाआड म्हणजे आठवडयातून दोनदाच सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय 
जिल्ह्यातील लघु,मध्यम,व मोठे प्रकल्प भरले असून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सुरु असूनही यवतमाळ करांना नियमित पाणी पुरवठा केल्या जात नसून नागरिक पावसाळ्यातल्या कृत्रिम पाणी टंचाईने त्रस्त आहेत 

Wednesday 3 September 2014

यवतमाळ येथील गणेशोत्सव

यवतमाळ येथे गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरु असताना सुद्धा गणपतीचे सर्वत्र उत्साहात 
स्वागत झाले यवतमाळ येथील मारवाडी युवक मंडळाने 31  हजार मडक्यांच्या सहाय्याने  साकारलेला  
हा सुबक देखावा सारयांना आकर्षित करत आहे  त्या साठी कलकत्ता येथील कारागिरांना बोलावण्यात आले असुन त्यांनी महिनाभरात हा देखावा साकारला तर मूर्ती सचिन वनकर ह्यांनी तयार केली आहे 
यवतमाळचा राजा

 
मडक्यांनी सजवलेले सभामंडप  
मडक्यांनी सजवलेला प्रवेश द्वारावरील देखावा 


एकता मंडळांनी  थर्माकोलच्या सहाय्याने साकारलेला अष्ठ विनायकाचा देखावा 
व गणेशाची सुबक मूर्ती 
फोटो  -पुजा दुद्दलवार BE(Soft )BMC  


Tuesday 2 September 2014

धरण ओव्हरफ्लो पण पाणी कपात सुरूच

यवतमाळ येथे आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असून गेल्या दोनचार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसा मुळे नदीनाले दुथडी भरून वहात आहेत  काही ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे तर काही गावात शेतात पाणी साचले आहे यवतमाळला पाणीपुरवठा होत असलेले निळोणा  चापडोह ,बोरगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहेत  तर बेम्बळा धरणाची दारे क्षमते पेक्षा जास्त पाणी भरल्याने उघडण्यात आली असून आसपासच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे
पाणी असे रस्त्यावरून वाहून वाया जात असताना यवतमाळ करांची पाणी टंचाई अजूनही संपली नाही योग्य नियोजना अभावी पाणी पुरवठा ,तीन दिवसांनीच होत आहे म्हणजे तब्बल पाचव्या दिवशी पाणी सोडण्यात येतेय  त्या मुळे नागरिक चिडले असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जनतेची मागणी आहे पाणी टंचाई मुळे एकदिवसा आड होणारा पाणी पुरवठा यवतमाळ जिल्ह्यात दोनदा पूर येऊनही पुन्हा नियमित झाला नाही आता देखील भरपूर पाऊस येऊनही अजूनही पाणी तीन दिवसांनी सोडण्यात येतेय तो तसाच राहिल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत कारण यवतमाळकरांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या बेंबळा प्रकल्प पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु आहे