Wednesday 30 July 2014

हि धग शांत कधी होणार

                 कारगिल युद्धाच्या आधी भाजप सरकार सत्तेत आल अन काश्मिरी जनतेचा आशावाद जागा झाला अटलजींनी पाकिस्तानशी सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्नही  केला पण लाहोर यात्रेच फलित कारगिल युद्धान मिळाल तर  आग्र्याच्या शिखर परीषदेच फलित जम्मु रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारान आधी काश्मिरी पंडितांना तेथून हुसकावून लावलं गेल आणि नंतर दहशतवाद जम्मूपर्यंत पोहोचला होता अतिरेक्यांच्या गोळीबारात निरपराधांचा बळी गेल्याची बातमी वाचून मन सुन्न झाल होत आणि मनात येत होत धगधगत काश्मीर शांत कधी होणार?माझ्या डोळ्यापुढे मला भेटलेले जवान येत होते  आणि मला तो प्रवासातला प्रसंग आठवत होता.
          साधारण ९८च्या मे महिन्यातली गोष्ट आम्ही दुसरयांदा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालो होतो जम्मुतावी एक्स्प्रेस पकडण्यासाठी घाई,घाईन नागपुरात पोहोचलो गाडी यायला अगदी थोडासा अवधी होता तितक्यात अनाउन्समेंट झाली गाडी ५-६तास उशिरा येतेय आणि पुन्हा पुन्हा अनाउन्समेंट होत,होत अख्खी रात्र गेली आता येईल,मग येईल म्हणता म्हणता गाडी सकाळी आठ साडे आठला आली स्टेशनवर सर्वत्र आर्मितले जवान त्यांच खूपसार सामान बायका मुले दिसत होते  गाडीन पार विरस केल्यान कोणी कोणाशी बोलत नव्हत गाडी आली आणि सारयांनी गाडी पकडण्यासाठी गर्दी केली आम्हीही गाडीत शिरलो ते  आता सामान व्यवस्थित ठेवून मस्त आराम करायचा विचार करूनच कारण रात्रभर स्टेशनवर बसून वैताग आला होता आमच्या डब्यात बरेचसे जवान होते आमची जागा एका साऊथ इंडियन कुटुंबीयांनी काबीज केली होती सर्वत्र सामानच सामान कस,बस सामान इकडेतिकडे सरकवून त्यांनी आम्हाला बसायला जागा दिली त्यांचा थोडा विरस झाला कारण ते विशाखा पट्टणमहून एकटेच होते थोड्याच वेळात त्यांच्या छोटया मुलीमुळे ओळख झाली चौकशी केल्यावर कळाल की तो आर्मितला जवान आहे आणि विशाखापट्टनमहून आपल्या कुटुंबीय व सामानासोबत श्रीनगरला जात आहे थोडयाच वेळात गप्पांना सुरवात झाली सुरवातीला अलिप्त असलेला तो जवान देखील गप्पात सामील झाला अर्थातच विषय काश्मीरवर घसरला ८१ मध्ये बर्फातल शांत सुंदर काश्मीर मनसोक्त पाहिलेल ,तिथल स्वर्गीय सौंदर्य मनात साठवलेलं ते जणू साद घालत होत म्हणून विचारल,बर्फवृष्टी मुळे बंद असलेला काश्मीरचा भाग पुन्हा पहायला आम्ही येऊ शकतो का? आता तिथली परिस्थिती कशी आहे ?
               त्यांनी सांगितल तिथली परिस्थिती आता बरीच निवळलीय भाजप वाल्यांनी खूप छान काम केलय म्हणुनतर आम्ही आमच्या कुटुंबियांना तिथे घेउन जातोय जवळ जवळ ५-६ वर्षानंतर मी यांना घेउन जातोय तुम्हाला यायचं तर येऊ शकता पण आमच्या प्रोटेक्शन मध्ये रहाव लागेल रात्री फिरता येणार नाही. बायकोची चेष्टा मस्करी करत छोटीचे लाड करत तो तिथली माहिती देत होता खरेतर सैनिक म्हटलं कि डोळ्यापुढे येते ती  करडया शिस्तीची गणवेशधारी ,बंदुकीनी शत्रूला टिपणारी व्यक्ती पण आम्हीतर त्याच हे दुसर रूप न्याहाळत होतो आणि मग सुरवातीच्या त्याच्या अलिप्ततेची कल्पना आली सैनिक म्हटलं कि कधी युद्धावर जाव लागेल सांगता येत नाही शिवाय ५-६वर्ष एकट्याने काढल्याने मिळालेला प्रत्येक क्षण त्याला त्याच्या कुटुंबीयांसोबत घालवायचा असेल शिवाय श्रीनगर ते विशाखापट्टनम म्हणजे दुसर टोकच आणि श्रीनगरला पोहोचाल कि लगेच ड्युटी जॉईन करायची मग त्यांच्यामध्ये त्याला दुसरा वाटेकरी आलेला कसा आवडेल त्याची बायको मात्र खूप बोलकी होती ,खुश होती तिला खूप दिवसांनी नवरयासोबत जायला मिळाल्याचा आनंद ती माझ्यासोबत शेअर करत होती ती साऊथ इंडियन असल्याने इडली उत्तप्पाच्या गोष्टी झाल्या मग तिला छोटीच्या गोष्टी किती सांगू,किती नको अस झाल बोलताबोलता तीन हळूच सामानातुन अलबम काढून तिच्या मोठीचा फोटो दाखवला कारण तिला मात्र तिच्या नवऱ्यान सोबत आणु दिल नव्हत कारण तो ड्युटीवर गेल्यावर ती एकटी दोघींना कशी सांभाळणार ? शिवाय पहाडावर एकदा ड्युटी लागली कि मग चारपाच दिवस खाली येता येत नाही आणि अतिरेक्यांची भीती होतीच तीच मन मात्र साहजिकच मोठीकडे धाव घेत होत उत्साहाने ती मला ट्रंकेच कुलूप उघडून ड्रेस,साड्या दाखवत होती मग मीही तिच्या आनंदात सहभागी होत होते तेव्हाचे दिवस निर्धास्त होते आणि ती सैनिकाची पत्नी होती आम्ही विचारलेल्या अतिरेक्यांच्या बाबतीतल्या  प्रश्नाच उत्तर देण मात्र तो टाळत होता कदाचित बायकोपूढे त्याला ते देता येत नसाव किव्हा माहिती न देण बंधन कारक असेल किती जपत होता तो आपल्या बायकोलेकीला!  तीन सांगितलं आपण जम्मूला पोहचू तेव्हा आम्हाला न्यायला स्पेशल बस येईल मी म्हटलं मजा आहे बाई तुझी!पण रेल्वे जम्मूला पोहोचली तेव्हा पाहिलं त्यांना न्यायला आर्मीचे ट्रक आले होते त्यात सैनिक ,त्यांचे सामान आणि नातेवाइक कसेबसे कोंबले जात होते तरीही सगळे आनंदात होते भाजप सरकारवर खुश होते
                येतानाही आमच्या कम्पार्टमेंट मध्ये काही मध्यमवयीन जवान आणि तरुण अविवाहित एअर फोर्स मधले पायलट होते त्यांच्या मनमोकळ्या स्वभावान त्यांनी आम्हाला आपलस केल पुन्हा काश्मीर प्रश्न राजकारण ह्या वर चर्चा झाली त्यांच्याही मते भाजपन काश्मीर मध्ये शांती आणली लोक मोकळा श्वास घेताहेत मग काश्मीर मधल्या विस्थापित झालेल्या जम्मूत दिसलेल्या काश्मिरी जनतेच काय?ते अजून काश्मीर मध्ये का परतत नाहीयेत सरकार ह्या बाबतीत काय करतेय ? अतिरेकी निरपराध्यांना का मारताहेत? ते म्हणाले आपल सरकार सुसज्य आहे तुम्ही पहा लवकरच सार सुरळीत होईल आता लवकरच एक चांगली घटना घडेल आणि पाकिस्तानला धडा मिळेल.  तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही पण नंतर अटलजींनी अणुचाचणी घेतली आणि त्या दोघांची आठवण झाली ते म्हणाले होते आपण पाकिस्तान पेक्षा सरस आहोत ते आपल्या संरक्षण यंत्रणेपुढे टिकणार नाहीत आपल्याला खरा धोका आहे तो चीन कडून आणि खरेच चीन सिमेपलीकडून घुसखोरी करतोय. सैन्यात असले तरी तेही आपल्यासारखेच आहेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होत त्याचं पोस्टिंग दिल्लीला झाल होत खूप दिवसांनी त्यांना त्यांच्या मित्राच्या बायकोंनी दिलेला घरचा नास्ता मिळाला होता तोही ते शेअर करत होते आम्ही अर्थातच तो नाकारला त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार  त्यांना पुरेसा नसल्याच सारेच सांगत होते मनात आल खरेच आपल्या देशासाठी थंडी,पाऊस,उन वादळ आणि प्राणाचीही पर्वा न करता प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आयुष्य जगतो त्यांना पुरेसा पगार मिळायला हवाच
                      जेमतेम वर्षही झाल नसेल तोच कारगिल युद्ध झाल आणि अनेक वीर जवानांनी आपल बलिदान दिल आणि माझ्या मनाला चुटपूट लागली अरे उणेपुरे आठदहा महिनेही झाले नसतील ती दोघ एकत्र राहिलेल्या,सार काश्मीर पाहणार होती ती,पाहिलं असेल?त्यांची छोटी बॉम्बच्या आवाजाला घाबरली असेल का ?आणि ती तिथेच होती कि परत केरळला परतली असेल मला भेटलेले ते जवान त्यांच काय झाल असेल? असतील की ----मनात नको त्या शंका येतात तिचा उत्साही चेहरा आठवतो नवीनच केलेलं मंगळसूत्र दाखवणारी ती आठवते ,आम्ही आमच्या लग्नाला तुम्हाला नक्की बोलावू म्हणणारे ते दोघे पायलट आठवतात,त्याचं लग्न झाल असेल ?
                    नुकताच कारगिल विजयदिन साजरा झाला तेव्हा हे सार आठवलं सुदैवान आताही पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे केलाय त्याला सकारात्मक  प्रतिसाद देत पाकिस्तान सीमेकडून घूसखोरी करत निरपराध नागरिक, सैनिकाचे बळी घेतोच आहे मोदींनी दिल्ली कटरा रेल्वेचा शुभारंभ केलाय काश्मीर मधेही पॉवरप्लांटच ओपनिंग केलय आता पुन्हा एकदा काश्मिरी जनता आनंदित आशावादी झालीय ह्या पंधरा वर्षात काश्मीर सुधारलय पुन्हा पर्यटकांनी बहरलय भारत अत्याधुनिक संरक्षक  शस्त्रांस्त्रांनी  सुसज्य  झालाय ,सुरक्षित बंकर्स बनवले गेलेत पण अतिरेकी कारवाया मात्र सुरूच आहेत दिल्ली,मुंबई ,हैद्राबाद पुणे शहरात बॉम्बस्पोट झाले.  चीनही सीमेपलीकडून सीमेलगतच्या" डेमच्याक" मध्ये घुसखोरी करतोय अशी बातमी पाहण्यात आली पण
                 आता नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्न सोडवण्याला ,सुरक्षेला प्राधान्य दिलय.  पाहूयात आता तरी धगधगत काश्मीर शांत होतंय का ? शूर जवानांच बलिदान कामी येतंय का ?        
                                                                                                                    yojana.duddalwar@gmail.com

Wednesday 16 July 2014

यवतमाळ येथे पाऊस

             गेल्या दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळकरांना अखेर पावसाने दिलासा मिळाला असून सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर पर्यंत सतत पाऊस पडत होता
         
पांणी पुरवठा मात्र चार दिवसांनीच
उशिराने का होईना आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली असली तरी गृहिणींना मात्र अजूनही पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागत असून गेल्या कित्येक वर्षापासून एक दिवसाआड  होणारा पाणीपुरवठा आता चार दिवसांनी होत असल्याने महिलांची तारांबळ उडत आहे चार दिवसांनी जास्ती वेळ पाणी सोडण्यापेक्षा तेच पाणी नेहमीप्रमाणे एक दिवसाआड  सोडण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे कारण एव्हढे पाणी साठवून ठेवताना त्यांची दमछाक तर होतेच शिवाय पाणी साठवण्यासाठी साधनेही कमी पडतात

Tanker चे पाणी गढूळ
पाणी पुरवठा चार दिवसांनी होत असल्यामुळे पाणी कमी पडल्यास Tanker चे पाणी आणल्यास ते अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त असते ते पाणी वापरणे आरोग्यास हानिकारक असल्याने नागरिक ते वापरू शकत नाहीत विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात येतेय पण अजूनही पाणी सोडल्या गेले नाही त्या मुळे नागरिक संतप्त झालेत. त्या मुळे संबंधीत अधिकाऱ्यांनी ह्याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी नागरिकांची मागणी आहे
यवतमाळ येथे पावसाची  सततधार 
यवतमाळ येथे थोडया विश्रांती नंतर शनिवार दुपारनंतर सोमवार पर्यंत सतत पाऊस पडत आहे कधी रिमझिम तर कधी जोरात पाऊस पडत आहे पावसाचा जोर शनिवारपासून मंगळवार सकाळपर्यंत अजूनही सुरु आहे गेल्या दोन महिन्यापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणारे शेतकरी नागरिक ह्या पावसाने आनंदित  झाले असले तरी पाणी साठयात अजूनही समाधान कारक वाढ न झाल्याने पाणी पुरवठा मात्र चार दिवसांनी होत आहे त्या मुळे बाहेर पाऊस पण नळाला मात्र पाणी नाही अशी इथली स्थिती आहे नागरिक पाणी टंचाईने त्रासलेले असून कधी पाणीपुरवठा नियमित होतोय याची वाट  पाहत आहेत
पावसामुळे भाजीपाला महागला 
आधी पाऊस नसल्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाला महाग होता विशेषत: कोथिंबीर ,कोबी,आले,मिरचीचे भाव वाढलेले होतेच आता पावसामुळे भाजी मार्केट मध्ये न आल्याने भाजीचे भाव वाढलेले आहेत एका भाजीवाल्याकडे भाजीचे भाव विचारले असता कोथिंबीर ८०रु. पाव किलौ व इतर भाजीपाल्याचे भाव देखील त्याच प्रमाणात वाढलेले होते फुल कोबी ४०रु ,कांदा बटाटा ,मेथी ,मिरची पालक यांचेही भाव ४०रु पाव ह्या प्रमाणात वाढलेले आहेत त्या मुळे पाऊस आला तरी पाणी पुरवठा चार दीवसांनी आणि भाजीचे भाव आवक्या बाहेर वाढल्याने आधीच महागाईने त्रासलेल्या गृहिणींना मात्र पावसा मुळे दिलासा मिळाला नाही
            

Wednesday 9 July 2014

वारी चालली पंढरपुरा

                   दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वारकरी लाखोंच्या संख्येन पंढरपुरात दाखल झालेत ह्या वर्षी वारीतून काहीजणांनी पर्यावरणाच्या संतुलनाचा संदेश देत वारीच्या वाटेवर वृक्षारोपण करत प्लास्टिक वापरू नका असे आवाहन केले तर काहींनी पथनाट्यातून जनजागृती अभियान राबविले वारीतील गोंधळी,भारुडकार वासुदेव ,नकलाकार ह्यांनी आपल्या कला सादर करून वारीत रंगत आणली काही टाळकरयांनी टाळ मृदुंगाच्या सहाय्याने आपली वेगळी कला सादर केली काहींनी फुगडी खेळत वारीत मार्ग क्रमण केले त्यात बबनराव पाचपुते, हर्षवर्धन पाटील ह्यांचाही समावेश होता वारीचा इतिवृत्तांत वारीचा मुक्काम त्यांचे खाणेपिणे ,काहीठिकाणी मैलोनमैल चालूनही वारीतल्या महिलांनी केलेला चुलीवरचा स्वयंपाक तोही साधासुधा नाही तर हजारोंच्या संख्येत केलेल्या पुरणपोळ्या T. V. वरील मराठी वाहिनीचे पत्रकार लोकांपर्यंत पोहोचवत होते
       ह्या वर्षी पावसान एकदोनदाच हजेरी लावल्यान उन्हाची तीव्रता होती तरीही वारीतील अबालवृद्ध न थकता पायी चालत पंढरपुरला जात होते वारीत सर्व थरातील लोक सामील झाले होते वारीत शेवटच्या मुक्कामात पाऊस आला तेव्हा थोडी तारांबळ उडाली तरीही हव्या असलेल्या पावसाचा आनंद लुटत वारकरी पंढरीकडे निघाले  
         वारीतील सुसूत्रता ,एकोपा आणि ,शिस्त ह्याच दर्शन ठिकठिकाणच्या रिंगण सोहळ्याच्या वेळेस पाहायला मिळाले शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम सोलापूर इथे तीन दिवस होता तेथील भाविकांनी त्यांना जेवण दिले ह्या पालखीकडे मात्र t.v. वाहिनीच्या पत्रकारांचे लक्ष गेलेले दिसले नाही गेल्या अनेक वर्षापासून शेगावची पालखी सोलापुरात्त विसावते 
   
  पंढरपुरात लोखोंच्या संख्येत भाविक दाखल
आषाढी एकादशी निमित्य आज पंढरपूर येथे जवळपास सहा सात लाख भाविक आले असून चंद्रभागेचा काठ भाविकांनी फुलून गेलाय.ह्या वर्षी पावसाअभावी चंद्रभागेत पाणी कमी असल्याने उजनी येथून पाणी सोडण्याची मागणी होती  वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपुरातील जुन्या दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून नदीत पाणी सोडण्यात आले  त्या मूळे वारकऱ्यांना नदीत स्नान करता आले गर्दीमुळे नदी माणसांनी गजबजली सार पंढरपुरच माणसांनी भरून गेलय आणि विठूनामाच्या गजरात न्हावून निघालय 
    
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न पण पूजेआधी मुख्य मंत्र्यांची केली अडवणूक
आज पहाटेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नींच्या हस्ते विठोबाची महापूजा करण्यात आली पण पूजेला उशीर झाला कारण वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंड्यातात्या कराडकर ह्यांनी गोहात्त्या बंदी चा कायदा करावा त्या शिवाय त्यांना पूजा करू दिल्या जाणार नाही अशी भूमिका घेतली तसा इशारा त्यांनी आधीच दिला होता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तसा कायदा आहे लवकरच त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले तेव्हा त्यांना आत सोडण्यात आले. ह्या वर्षी पहिल्या पूजेचा मान शेळके दाम्पत्यांना मिळाला 
    
दर्शनाला लांबच लांब रांगा
दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून दर्शन रांग सहा Km पर्यंत पोहोचली आहे काही भाविक आदल्या दिवसापासून रांगेत उभे होते एका मिनिटाला तीस,चाळीस भाविक दर्शन घेत असून मुखदर्शनासाठी वेगळी रांग लावण्यात आली आहे. मंदिरात व मंदिराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून त्या साठी सोलापूरहून ३००० ग्रामीण पोलिस बोलावण्यात आले आहेत काही सामाजिक संघटना वारकरयांसाठी लागेल ती मदत देण्यास हजर आहेत.  वारकरयांसाठी मंदिर प्रशासनातर्फे बुंदीच्या लाडवाचा प्रसाद तयार केला असून काही भाविकांनी बाहेर गावाहून शेंगदाण्याचे लाडू करून पाठवले आहेत पंढरपूर नगरपरिषद देखील नागरिकांच्या सोयी,सुविधेसाठी प्रयत्न करत आहे.