उन्हाळा संपून जुलै महिना आला तरीही विदर्भात वरून उन्हाचा प्रकोप होतोय तर दुसरीकडे पाणी टंचाईन जनता त्रस्त झालीय साऱ्यांचाच जीव उन्हान त्रासलाय विदर्भातले उन्हाळ्याचे शेवटचे दिवस नवतपाचे असतात म्हणजे ह्या नउ दिवसात पारा शेवटचे टोक गाठतो चंद्रपूर ,नागपूर इथे तो ४७.५ सेल्सिअस च्याही वर जातो आणि त्या खालोखाल इतर शहरातही पारा ४५ अंशाच्याही वर जातो ह्या वर्षी ६ जून हा दिवस सर्वात जास्त उष्ण तापमानाचा दिवस म्हणून नोंद झालीय तर २००७ साली तापमान ४८. सेल्सिअस वर गेल होत नवतपाचे नउ दिवस संपल्या नंतरही विदर्भात उन्हाचा तडाखा होताच त्यातून पावसाच आगमनही लांबलय म्हणूनच लोक आतुरतेन पावसाची वाट पहाताहेत शेवटचे नवतपाचे दिवस आणि उन्हाळ्याचे एकदोन महिने सोडले तर ह्या वर्षीचा उन्हाळा त्या मानाने सुसह्य होता कारण पावसान ह्या वर्षी अधून मधून हजेरी लावली होती हिवाळा संपता,संपता तर गारपिटीन कहर केला शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं नष्ट झाली पण ह्याच गारपीटीन पाणी पातळी वाढली नंतर जरास जास्त उन तापल कि पावसान थोडाफार शिडकावा करत वातावरणात गारवा आणला म्हणूनच पहिल्या पावसाचा नेहमीचा नवखा आनंद ह्या वेळेस जरा कमीच जाणवेल अस वाटत असताना पावसान चांगलीच दडी मारलीय एव्हाना जून महिना संपून जुलै महिना सुरु झालाय आणि यवतमाळ येथे पावसान जूनमध्ये फक्त दोनतीनदा हजेरी लावलीय अशीच परिस्थिती इतरत्रही आहे त्या मुळे पाऊस आला नाहीतर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही एव्हाना ऑगस्टचा पहिला आठवडा संपत आला तरीही यवतमाळ मध्ये पाणी टंचाई सुरु आहे पाणी तीन दिवसांनी सोडण्यात येतेय त्याचे कारण धरण ४५%भरले असल्याचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले विशेष म्हणजे पाऊस रोजच थोडयाफार प्रमाणात पडत आहे लोक आता पाणी टंचाईन त्रासलेत
मागच्या वर्षी भीषण दुष्काळान नदी,नाले कोरडे पडले जमिनीच्या खालच पाणी आटलं शेतातली फळ,पिक पाण्याविना करपली गुर,ढोर पाण्याविना मृत्युमुखी पडली ,पाणी टंचाईन जनता हैराण झाली काही ठिकाणी आठ ,पंधरा दिवसातून तर काही ठिकाणी तीनचार दिवसातून पाणी सोडल गेल काही ठीकाणची पाण्याची भीषण दाहकता टी.वी.चानल्स वरून पाहताना मने हेलावली लोक मिळेल तिथल गढूळ डबक्यातल घाण पाणी तेही फक्त एक तांब्या बुडेल इतक घेत होते तर काही बायका रेल्वे थांबताच रेल्वेच्या डब्यातल पाणी घागरीन भरत होते पण नंतर पावसान कृपा केली अन तो धो,धो बरसला इतका कि,नदी नाले दुधडी भरून वाहू लागले धरणे भरली .लोक आनंदित झाले आता शेती छान पिकेल पाण्याचा प्रश्नही मिटेल अस वाटत असतानाच अतिवृष्टी झाली नदयांना पूर आला धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली पूराच पाणी गावात शिरलं नदीकाठची माणस,दुकान घर,गाडी ,सार पूरान गिळंकृत केल त्यातून थोडफार सावरता,सावरता विदर्भात दोन तीनदा पूर आला धरणाची दार उघडावी लागल्यान गावात पुन्हा पाणी शिरल आधी कोरडा दुष्काळ मग ओला दुष्काळ ह्याला तोंड देत पुन्हा शेती बहरली ,पाणी साठा वाढला पण मध्यंतरी पुन्हा गारपिटीन हाहा:कार माजवला आणि धरणात पाणी साठा भरपूर असतानाही योग्य नियोजना अभावी पाणी टंचाई निर्माण झाली दरम्यान सिंचन घोटाळा उघड झाला राजीनामा नाटय रंगल आणि आता निवडणूक पार पडून नवीन सरकार सत्तेत आलय मोदींनी पाणी स्वच्छतेला प्राधान्य दिलय ,कामही सुरु झालय आता तरी पाणी टंचाई संपेल का ? नियमित पाणीपुरवठा होईल का ? जनतेला पडणारे हे प्रश्न !
पूर्वी मुंबईतल्या चाळ संस्कृतीतली पाणी टंचाई सिनेमातून प्रतिबिंबित व्हायची आता सगळीकडेच पाणी टंचाईचा प्रश्न उदभवलाय काही ठिकाणी आठ दिवसातून काही ठिकाणी पंधरा दिवसातून पाणी सोडल्या जातय अस अकोला,लातूर,सोलापूर आणि इतर शहरी लोकांनी सांगितलं पूर्वी सोलापुरात सकाळ संध्याकाळ पूर्ण दाबान व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायचा रंगपंचमी,ग्रहणात,ग्रहण संपल्यावर पाणी सोडल्या जायचं पण आता लोक पाणी टंचाईचा सामना करताहेत अकोल्यात बायका आठ दिवसाच पाणी साठवून ठेवतात त्या ऐवजी दररोज पाणी सोडा अस त्याचं म्हणण आहे कारण अस जास्त दिवस साठवलेलं पाणी आरोग्याला अहितकारक असत यंदा यवतमाळातही पाणी प्रश्न चांगलाच पेटला इथे वर्षभर एकदिवसा आड पाणी येत कधी तीनचार दिवसातून कमी दाबाने तर कधी केव्हाही अनियमित वेळी पाणी सोडल्या गेल्यान बायकांनी संतप्त मोर्चा काढून " आता अधिकारयांनाच पाणी पाजू " असा इशारा दिला तेव्हा जिल्हाधिकारी आणि संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीन बैठक घेवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलली अनियमित पाणी पुरवठयाच कारण कधी भारनियमन ,कधी फुटलेली जलवाहिनी ,खराब झालेले व्हाल्व आणि वाढत्या लोकसंखेच्या तुलनेत कमी पडणारया पाण्याच्या टाक्या अस देण्यात येत पावसाळ्यापूर्वी ह्या अडचणींच निवारण होण आवश्यक आहे कारण यवतमाळ येथे बाहेर धो धो पाऊस कोसळत असताना आणि धरणाचे दरवाजे उघडले असताना घरात मात्र नळाला पाणी नाही आणि आल तर थेंब,थेंब अशी परिस्थिती कित्येकदा होती फार पूर्वी यवतमाळात दुष्काळ होता पण वसंतराव नाईकांनी हरित क्रांती केली आणि पाणीप्रश्न सुटला खरोखरच २५-३० वर्षापूर्वी इथे पाण्याचा सुकाळ होता दररोज खूप फोर्सने पाणी यायचं ते वरपर्यंत चढायच टिल्लू पंप तर तेव्हा नव्हतेच आता लोकसंख्या वाढलीय ,दोनतीनदा दुष्काळही पडला,तेव्हा जिल्ह्यात अनेक धरण बांधल्या गेली यवतमाळ शहराला निळोना धरणाचे पाणी पुरवल्या जाते बेम्बळा प्रकल्प नुसताच गाजतोय दिग्रस मध्ये अरुणावती धरण होण्याआधी घरापुढे खडडा करून त्यात उतरून पाणी भराव लागे कारण पाणी खूप कमी दाबान येई पण अजूनही पाणी टंचाई असतेच घावंडा नदीला पूर येउन पाणी गावात शिरत विशेष म्हणजे धरणग्रस्तांना अजूनही योग्य मोबदला न मिळाल्यान संघर्ष करत ते न्यायालयात गेलेत .
पाणी टंचाईची समस्या आता जागतिक झालीय ग़्लोबल वार्मिंग ,वाढती लोकसंख्या आणि जमिनीखालची आटत चाललेली पाणी पातळी ही कारण वैज्ञानिक सांगताहेत वाढलेल्या उष्णतेन हिमालयातील बर्फ वितळू लागलाय आणि समुद्रातल पाणी बाष्फीभवना मुळे आटतय जाणकारांच्या मते तर तिसर युद्ध झाल तर ते पाण्यासाठी होईल म्हणूनच ह्या प्रश्नाकडे गांभीर्यान पाहिल जातय.
पाणी टंचाईची समस्या आता जागतिक झालीय ग़्लोबल वार्मिंग ,वाढती लोकसंख्या आणि जमिनीखालची आटत चाललेली पाणी पातळी ही कारण वैज्ञानिक सांगताहेत वाढलेल्या उष्णतेन हिमालयातील बर्फ वितळू लागलाय आणि समुद्रातल पाणी बाष्फीभवना मुळे आटतय जाणकारांच्या मते तर तिसर युद्ध झाल तर ते पाण्यासाठी होईल म्हणूनच ह्या प्रश्नाकडे गांभीर्यान पाहिल जातय.
पाणी टंचाई वर उपाय म्हणून "Rain Water Harvesting" हि संकल्पना राबवल्या जातेय छतावरच पाणी पावसाळ्यात पाईप द्वारे जमिनीखाली टाकीत साठवून पंपाद्वारे फिल्टर करून त्याचा उपयोग सांडपाण्यासाठी करता येउ शकतो "चेंबूर इथल्या "मैसूर हौसिंग को ऑ. सोसायटीत" हा प्रकल्प बरयाच वर्षापासून यशस्वी पणे राबवल्या जातोय .
पाऊस नियमित यावा या साठी वृक्ष संवर्धन हि संकल्पना राबवल्या जातेय पण घरगुती वृक्ष वाढीवर भर न देता जंगलातली अवैध वृक्षतोड रोखणे आवश्यक आहे कारण घरातील वृक्ष लागवड ऐछ्चीक असते त्यावर कर लावला जातो पण जंगलात बिनधास्तपणे अवैध वृक्षतोड होते त्या कडे लक्ष दिल्या जात नाही शिवाय शहराबाहेर रस्ता रुंदीकरणाच्या वेळेस जर झाड तोडले गेले तर त्याच्या मागे दुसरे झाड लावणे बंधनकार केले जात नाही विशेष म्हणजे जंगलातील झाडे तोडल्यान ती ओसाड होतात आणि जंगली प्राणी शहरात शिरतात ह्या वर्षी वाघाने{बिबट्या}कित्येक ठिकाणी शहरात शिरून धुमाकूळ घातला होता.
पाण्याची शुद्धताही तितकीच महत्वाची आहे कित्येकदा पाणी गढूळ असत ,काही ठिकाणी पाण्यात नारू ,जंतू निघण्याचे प्रकार घडतात मागे यवतमाळ येथील "सायखेडा धरण"व काही गावात फ्लोराईड युक्त दुषित पाणी पुरवठ्याने तिथल्या लोकांची हाडे व दात खराब झाले होते म्हणूनच पाणी पुरवठयासाठी योग्य नियोजन पावसाळा येण्यापूर्वी करणे आवश्यक आहे नवीन वस्त्यांमध्ये पाणीटाक्या बांधून नळाद्वारे पाणी सोडण्याची सोय करावी कारण नियमित नळ कनेक्शन असणारयांच पाणी कपात करून त्यांना दिल जात तर काही जण मधेच जलवाहिनी फोडून तिथूनच पाणी भरतात त्या मुळेही पाणी कमी फोर्सने व थेंब,थेंब येते शिवाय रखडलेले प्रकल्प सुरु करणे ,नदीकाठी बंधारा बांधून नदीतला गाळ पावसाळ्या पूर्वी साफ करणही आवश्यक आहेच