Tuesday 7 February 2012

भुरट्या चोरापासून सावधान राहा

                      हल्ली सगळकडे चोरयाच,चोरया सुरु आहेत इतक्या कि हे चोरांचेच युग सुरु आहे कि काय? असे वाटावे. घरी, दारी, रस्त्यात  बसमध्ये रेल्वेत ,कोठेही,कधीही  केव्हाही सर्रास चोरया होत आहेत नागरिकांना असुरक्षित वातावरणात जगावे लागत आहे बँकेतून पैसे काढताना, बँकेत पैसे भरताना सहजतेने चोर चोरी करतात .चोर ,दरोडेखोर ,लुटारू ,भुरटे चोर इतके सक्रीय झालेत कि महिलांना मंगळसूत्र  घालून फिरणे कठीण झाले आहे दररोज हजारो महिलांचे मंगळसूत्र दागिने चोरीला जात आहेत   विशेषत: त्याच त्याच भागातून चोरी होत असताना चोर सापडत कसे नाहीत?त्या मंगळसूत्राचे पुढे  काय होते ? कोणालाच कळत नाही.
                    आता तर रस्त्यावरील प्लास्टिक  गोळा करणारे व इतर वस्तू उचलणारया बायका व लहान मुले आपण घरी असताना देखील घरात घुसून दुपारच्या वेळेस घरातील आवारात चोरया करतात अशाच एका  बाईला पकडल्यावर मी एकदा येऊन मंगळसूत्रच चोरून नेते म्हणून धमकावण्याचा प्रकार एका घरात घडला चोर एवढे निर्भय कसे झालेत ? म्हणूनच आता चोरांना पकडून  तुरुंगात  डांबून  त्यांना खडी फोडायला  पाठवावे म्हणजेच नागरिक  निर्भयपणे फिरू शकतील. एकीकडे सोन्याचा भाव गगनाला भिडलेला असताना दुसरीकडे मात्र मंगळसूत्र जे कष्टाने केलेले असते ते एका क्षणात चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यास आळा बसावा अशी नागरिकांची मागणी आहे .


Friday 3 February 2012

यवतमाळात होते दगडाने मोजमाप

         यवतमाळातील भाजी मार्केट मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भाजी मोजण्यासाठी दगडाचा वापर होतोय .पूर्वी वजनकाटे अस्तित्वात नव्हते.अश्मयुगात दगडाचा शोध लागला व त्याचीच भांडी,वजन वगेरेचा वापर चलनासाठी होऊ लागला.पण आताच्या कॉम्प्युटरच्या युगात भाजीवाले देखील हायटेक झालेत .मोबाइल क्रांती मुळे तर त्यांच्या हातात मोबाइल आलेत .मग तो गवंडी ,कामगार ,पेंटर कोणीही असो भाजी वाले तरी त्याला अपवाद कसे असतील ? अशावेळी मोजमाप करण्यासाठी वजनाचा वापर होणे आवश्यक असताना व कायद्याने बंधनकारक असताना देखील जवळपास बहुताउंश भाजी विक्रेते भाजी मोजण्यासाठी दगड ,लोखंडाचा वापर करतात .कित्येकदा तर भाजी मोजण्यासाठी भाजीचाच वापर होतो त्यात मोठे वांगे ,बटाटे किंवा तत्सम वस्तूचा समावेश असतो.
                       अशा वेळेस भाजी मोजण्यासाठी वजनाचा आग्रह धरल्यास छोटे वजन चोरीला गेल्याचे सांगितले जाते .त्यात १०० ग्राम,२०० ग्राम कधी कधी तर २५०ग्रामचे वजन देखील चोरीला गेलेले असते विशेष म्हणजे सर्वच भाजीवाल्यांची हि मापे चोरीला कशी जातात व ती पुन्हा का घेतल्या जात नाहीत ? हे एक कोडच आहे . दगडांनी मोजून भाजी घेण्यास नकार दिल्यास "आम्ही फसवत नाही तर आमचे माप बरोबर आहे कोठेही मोजून बघा " असे उत्तर मिळते कारण सगळ्यांचीच मापे चोरीला जातात मग ग्राहक तरी काय करणार नाविलाजास्तव भाजी घेणेच त्यांच्या हाती असते विशेष म्हणजे इतर वेळेस सक्रीय असणारे वजनमाप नियंत्रण अधिकारी मात्र ह्या बाबतीत कानाडोळा करतात ग्राहकांची फसवणूक थांबवायची असल्यास ग्राहकांनी तर जागरूकता दख्वायला हवीच शिवाय वजनमाप अधिकारयांना ह्या कडे लक्ष देण्यास भाग पाडल्यास ह्या प्रकाराला आळा बसेल .