आर्टेमिस मोहिमेतील Orion अंतराळ यान अंतराळवीरांसह अंतराळात झेपावले -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -2 एप्रिल
नासाच्या Artemis II मोहिमेतील चार अंतराळवीर Reid Wiseman ,Victor Glover ,Christina Koch आणि कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hansen दहा दिवसांच्या अंतराळ प्रवासासाठी चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले बुधवारी नासाच्या Kennedy Space Center Florida येथील 39 B ह्या उड्डाणस्थळा वरून Orion अंतराळयान ह्या चारही अंतराळवीरांसह SLS रॉकेटच्या साहाय्याने संध्याकाळी 6.35 वाजता (भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे) चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले
उड्डाणाआधी ह्या चारही अंतराळवीरांचे उड्डाणपूर्व आवश्यक चेकअप झाले त्यानंतर हे अंतराळवीर उड्डाणस्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप द्यायला त्यांचे नातेवाईक हजर होते नासाच्या मान्यवरांनी त्यांना उड्डाणाआधीच्या भावना काय आहेत आणि जेव्हा त्यांची निवड ह्या मोहिमेसाठी झाली होती तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया कशा होत्या हे विचारले तेव्हा सर्वांनीच आम्ही आनंदित आहोत आणि उड्डाणाच्या क्षणाची आतुरतेने वाट पहात असल्याचे सांगितले
Reid -"आमचे फोटो घेण्या साठी आलेले फोटोग्राफर,नागरिक आणि नातेवाईक ह्यांना पाहून माझा उत्साह आणखी वाढलाय मी प्रेरित झालोय आमच्यासाठी हा क्षण हा दिवस खूप महत्वाचा आहे माझी पत्नी नसल्यामुळे माझ्या दोन मुलीची माझ्यावर जबाबदारी आहे माझी निवड झाली तेव्हा काळजीत होतो पण मुलींनी आनंदानी सपोर्ट केल धीर दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला Moon Cake करून खायला दिला तो क्षण खूप सुंदर होता !' मी आश्वस्थ झालो त्या त्यांना निरोप द्यायला आल्या होत्या
Christina ह्यांना निरोप द्यायला त्यांचे पती आले होते "मला जेव्हा हि बातमी कळाली तेव्हा मी ठरवल पतीसोबत Bike Ride ला जायच आणि चंद्रोदयाच्या साक्षीन त्यांना हि बातमी सांगायची पण नेमक त्या दिवशी आकाशात धुक पसरल होत मी सांगितल तेव्हा ते Excited झाले आनंदाने ते म्हणाले चंद्र अजून तिथेच आहे !"
Victor ह्यांच्या पत्नी आणि चार मुली त्यांना निरोप द्यायला आल्या होत्या त्यांच्याही प्रतिक्रिया अशाच होत्या
Jeremy - ह्यांची पत्नी मुले हि बातमी ऐकताच आनंदित झाले अत्यंत उत्साहाने त्यांनी प्रेरित केल सगळेच त्यांना निरोप द्यायला आले होते सर्वच अंतराळवीर उड्डाणाआधीच्या Quarantine मध्ये होते सर्वानी एकमेकांशी काही वेळ संवाद साधला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत फोटो काढले त्या नंतर हे अंतराळवीर उड्डाणस्थळाकडे मार्गस्थ झाले
Orion अंतराळयानाचे अंतिम चेकअप झाल्यानंतर अंतराळवीरांनी यानात प्रवेश केला सर्व प्रक्रिया पार पडल्या आणि यानाचे SLS रॉकेट प्रज्वलित झाले काही क्षणातच अंतराळयान अंतराळात झेपावले उड्डाणाच्या 49मिनिटांनी SLS रॉकेटच्या वरच्या भागातील यंत्रणा कार्यान्वित झाली रॉकेट प्रज्वलित झाले आणि अंतराळवीरांनी नामकरण केलेले Integrity Orion अंतराळयान अंतराळात झेपावले आणि 46,000 मैल उंचीवरील पृथ्वीच्या कक्षेत यान प्रवेशले

अंतराळवीर Reid Wiseman ह्यांनी अंतराळात प्रवेशताच यानातून घेतलेला पृथ्वीचा फोटो -फोटो नासा संस्था
24 तासांनी स्वयंचलित यंत्रणेने अंतराळयान कार्यान्वित झाले यानाला सौरऊर्जा मिळावी ह्या साठी यानाचे चार सौरपॅनल उघडले गेले आणि पृथ्वीवरील नासा संस्थेतील आर्टेमिस मोहिमेतील इंजिनीअर्स व शास्त्रज्ञांच्या टीमच्या लाईव्ह संपर्कात यानातील सर्व यंत्रणेची चाचणी सुरु झाली अंतराळवीरांनी पृथ्वीवरील संपर्काविना आणि स्वयंचलित यंत्रणेविना अंतराळयान हाताळून अंतराळप्रवास सुरु केला त्या नंतर पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करून पाहिली शिवाय पृथ्वीवरील वातावरणात प्रवेश केल्यानंतरच्या पूर्वनिर्धारित प्रक्रियांची चाचणी घेतली

Orion अंतराळ यानातून नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीर -फोटो- नासा संस्था
ह्या सर्व यंत्रणा सुरळीत कार्यान्वित होत असल्याची खात्री झाल्यावर अंतराळवीरांनी यानातील दिनचर्या म्हणजेच झोप,व्यायामाच्या साधनांचा वापर करून व्यायाम,जेवण आणि इतर गोष्टी करून पाहिल्या आणि त्याचे प्रात्यक्षिक नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात पृथ्वीवासीयांना दाखवले दुसऱ्या दिवशी अंतराळवीरांनी काही तास झोपही घेतली तेव्हा नासाच्या Huston येथील संस्थेतील आर्टेमिस टीममधील प्रमुखांनी त्यांना स्थानिक वेळेनुसार 1(p.m.)वाजता "Freddy Jones Band " मधील "In a Day Dream" हे गाणे वाजवून झोपेतून उठविले
आता सहा एप्रिलला हे चारही अंतराळवीर चंद्राच्या कक्षेतील भ्रमणा दरम्यान यानातील अत्याधुनिक High Resolution कॅमेऱ्याद्वारे चंद्रावरील वातावरणातील व चंद्रभूमीवरील दूरवरच्या मानवाला न दिसणाऱ्या अज्ञात अशा अंधारातील भूभागाचे संशोधित फोटो घेतील त्या भागात मानवी आरोग्यासाठी पोषक वातावरण व पाण्याची शक्यता असलेल्या उंच सखल भूभाग डोंगरकडा दऱ्याखोऱ्यांचा भाग शोधतील हे अंतराळवीर तेथे पोहोचतील तेव्हा एरव्ही अंधारात असलेल्या ह्या भागात थोडासा प्रकाश पडलेला असेल त्या मुळे हे फोटो सावलीच्या स्वरूपात दिसतील
हि मोहीम संपल्यावर Orion अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतेल पृथ्वीच्या कक्षेत शिरताच अमेरिकेतील पॅसिफिक महासागराच्या San Diego येथील समुद्राच्या खाडीत हे यान खाली उतरेल
आर्टेमिस मोहिमेतील Orion अंतराळयानाच्या ह्या यशस्वीतेनंतर नासाच्या Washington येथील Associate Administrator Lori Glaze म्हणतात,"आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे 1972 नंतर च्या अपोलो मोहिमेनंतर आज Orion चंद्रयान ह्या चार अंतराळवीरांसह चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले हे अंतराळयान त्यातील अत्याधुनिक यंत्रणा हे सार नवीन आहे हि टेस्ट मोहीम अंतराळवीरांसाठी आणि आमच्यासाठी अत्यंत जोखमीची आणि कसोटीची आहे प्रत्येक टप्प्यावर सतर्कतेने संशोधित माहिती मिळवत आहोत येणारे दिवस अंतराळवीरांसाठी खडतर आणि वैशिष्टपूर्ण आहेत ह्या सर्व माहितीचा उपयोग भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांच्या तेथील वास्तव्यासाठी आणि मानवाच्या वास्तव्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्या मुळे ह्या आर्टेमिस टेस्ट मोहिमेतील Orion यानाच्या यशस्वीतेचा हा क्षण आम्ही अभिमानाने जगभरातील नागरिकांसोबत साजरा करत आहोत