Blue Origin च्या NS -30 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवाशी -फोटो -Blue Origin
Blue Origin - 25 फेब्रुवारी
Blue Originच्या New Shepard अंतराळ यानाने मानवी अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत आजवर नऊ वेळा धाडसी नागरिकांना अंतराळ प्रवास घडवला आहे आणि आता दहाव्यांदा Blue ओरीजिन ने NS-30 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा धाडसी अंतराळ प्रवाशांना 25 फेब्रुवारीला अंतराळ पर्यटन घडवले आहे
Blue ओरिजिन च्या NS -30 ह्या मोहिमेत Lane Bess, Jesus Calleja,Elaine Chia Hyde,Dr.Richard Scott, भारतीय वंशाचे Tushar Shah आणी एका धाडसी प्रवाशाचा समावेश होता हे सहाही अंतराळ प्रवासी 25 तारखेला मंगळवारी Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून सकाळी 9.30 वाजता अंतराळ पर्यटनासाठी निघाले ह्या सर्व अंतराळ प्रवाशांना घेऊन New Shepard अंतराळयान रॉकेटच्या साहाय्याने अंतराळ पर्यटनासाठी अंतराळात झेपावले
New Shepard अंतराळयान उड्डाणानंतर काही मिनिटातच अंतराळात पोहोचले आणि अंतराळातील पृथ्वी आणि अंतराळ ह्यांची सीमारेषा असलेली karman line भेदून अंतराळात प्रवेशले अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच ह्या अंतराळ प्रवाशांनी आनंदाने जल्लोष केला आणी अंतराळयानात तरंगण्याचा अद्भुत आनंद अनुभवला त्या वेळी सर्वांच्या तोंडून ,"Oh! My God! Awesome! Space Is So Black ! Amazing Feeling! Earth Is So Beautiful !" अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या आणि अवघ्या दहाबारा मिनिटांचा अंतराळ पर्यटनाचा हा अद्भुत अनुभव घेऊन हे सर्व प्रवासी पृथ्वीवर परतले
त्यांच्या स्वागताला त्यांचे नातेवाईक व Blue Origin संस्थेचे Vice President Phil Joyce हजार होते ते म्हणाले ," आमच्या ह्या अंतराळ पर्यटन मोहिमेमुळे जगभरातील उद्योजक,सायंटिस्ट,डॉक्टर्स आणि धाडसी नागरिकांना अंतराळ पर्यटन करता येते अंतराळातून पृथ्वीकडे पाहण्याचा आनंद घेता येतो,अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीचा अनुभव घेता येतो अंतराळ पर्यटनानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या आनंदित प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला आवडतात त्या आम्हाला प्रेरित करतात आम्ही धाडसी नागरिकांना पृथ्वीवरून अंतराळ प्रवासासाठीचा मार्ग तयार करतो
Lane Bess दुसऱ्यांदा अंतराळ पर्यटनासाठी गेले होते 19 डिसेंबर 2021मध्ये NS -19 मोहिमे अंतर्गत ते अंतराळ पर्यटनासाठी गेले होते मी दुसऱ्यांदा अंतराळ पर्यटनासाठी गेलो होतो हा अद्भुत आनंद,हा अनुभव पुन्हा:पुन्हा घ्यावासा वाटतो जगाकडे बघण्याचा दृष्ठीकोन बदलतो पृथ्वी सौन्दर्य अलौकिक आहे पायलट असलेल्या Elaine ह्यांना लहानपणापासूनच Space Program पाहण्याची आवड होती त्यांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न होते त्या म्हणतात मी पायलट असल्यामुळे आजवर अनेकदा आकाशात भरारी मारली आहे आकाशातील ग्रह तारे पाहिले आहेत मला तिथे जायची इच्छा होती लहानपणी अंतराळविश्व मला भुरळ पाडायच म्हणूनच मी पायलट झाले तिथे प्रत्यक्षात जाऊन पाहण्याच अनुभवण्याच,उड्डाण करण्याच माझ स्वप्न होत ते आज पूर्ण झालय! हा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो
सर्वांनीच अंतराळातून पृथ्वीच सौन्दर्य अलौकिक दिसत आणि तिथून पृथ्वीकडे पाहताना विचारांची दिशा बदलते वेगळा दृष्ठीकोन मिळतो असे सांगितले आम्हाला ह्या क्षणी आमच्या भावना व्यक्त करताना शब्द सुचत नाहीत आम्ही खूप आनंदी झालो आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली

ह्या सहाही अंतराळ प्रवाशांना ते अंतराळपर्यटनाहून परतल्यावर ते अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वैशिष्ठ असलेले गौरव चिन्ह कोरलेला Patch देण्यात आला

