Perseverance मंगळ यानाने पृथ्वीवासीयांना पाठवलेल्या शुभेच्छा !-फोटो नासा संस्था
नासा संस्था- 1 जानेवारी
Perseverance मंगळयान सध्या मंगळावरील Jezoro Crater ह्या भागात संशोधीत नमुन्यांच्या ट्यूब जमिनीवर व्यवस्थित ठेवण्याचे काम करण्यात व्यस्त आहे त्यातून वेळ काढून ह्या मंगळयानाने पृथ्वीवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ह्या शुभेच्छा नवीन वर्ष सुरू होण्याआधीच दिल्या आहेत कारण मंगळावरील नवीन वर्ष 26 डिसेंबरला सुरू होत असल्याने Perseverance यानाने Twitter वरून सर्वांना
"HAPPY MARS NEW YEAR!"
अशा शुभेच्छा दिल्या आहेत
आपल्या प्रमाणे जगातील बहुसंख्य देश Gregorian calendar प्रमाणे वर्षगणना करतात आणि एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात करतात
पण मंगळावरील वर्षगणना वेगळी आहे जगभरातील शास्त्रज्ञांनी 1955 सालापासुन 26 डिसेंबरला मंगळावरील वर्षगणना सुरू केली त्या दिवशी मंगळग्रहावरील ऊत्तर गोलार्धात दिवस आणी रात्रीची वेळ सारखी असल्याने हा दिवस प्रमाण मानुन त्यांनी हा निर्णय घेतला मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे आहे मंगळावर पृथ्वीप्रमणे तीन ऋतु नसतात तर चार असतात हिवाळा,वसंत,ऊन्हाळा आणी शरद ऋतू त्या मुळे त्यांना ह्या काळात तेथील वातावरणात संशोधन करणे सोयीचे वाटले
त्या मुळेच पृथ्वी आणी मंगळावरील दिवसात फरक आहे मंगळावरील एक दिवस
पृथ्वीपेक्षा 39 मीनीटे 35 सेकंदानी जास्त आहे मंगळावरील एका दिवसाला सौर
दिवस किंवा एक सोल म्हणतात मंगळावरील एका वर्षात 668 सोल म्हणजे पृथ्वीवरील
687 दिवस असतात पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे मंगळाच्या दुप्पट असते
शास्त्रज्ञांच्या वर्षगणने नुसार यंदा मंगळाने 36 व्या वर्षात पदार्पण केले
आहे
मंगळग्रह सुर्यापासुन लांब अंतरावर आहे शिवाय मंगळाचा आकार
लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे सूर्याभोवती फिरण्याची कक्षाही बदलते
सूर्याभोवती प्रदक्षीणेसाठी मंगळाला पृथ्वीच्या दुप्पट वेळ लागतो आणि
मंगळाला चंद्रही नाही त्या मुळे महिन्यांचे मोजमाप नाही
पृथ्वीवरील वातावरणाचा थर दाट आहे पण मंगळावरील वातावरण विरळ आहे
पृथ्वी गोल आहे आणी पृथ्वीचे सुर्यापासुनचे अंतर मंगळापेक्षा कमी आहे त्या
मुळे सुर्यप्रदक्षिणेसाठी पृथ्वीला कमी वेळ लागतो शिवाय पृथ्वीभोवती
फिरणारा चंद्र आहे
शास्त्रज्ञांच्या मते ब्रम्हांडात पृथ्वी आणी मंगळग्रहाची निर्मिती एकाच वेळी झाली दोन्ही ग्रहावर सजीव सृष्ठीसाठी अनुकूल वातावरण होते पण कालांतराने मंगळावरील सजीव सृष्ठी नष्ठ झाली दोन्ही ग्रहातील वातावरणातील फरकामुळे नवीन वर्षारंभ वेगळा आहे
No comments:
Post a Comment