Tuesday 31 January 2023

नासा संस्थेत Day Of Remembarance साजरा

 A lei is seen on the Space Shuttle Columbia Memorial after a ceremony that was part of NASA's Day of Remembrance, Thursday, Jan. 28, 2021, at Arlington National Cemetery in Arlington, Va.

 नासा संस्था - 26 जानेवारी ह्या

दरवर्षी जानेवारी महिन्यात नासा संस्थेतील अंतराळ मोहिमेतील दिवंगत अंतराळवीर,संशोधक आणि इतर दिवंगत  अंतराळवीरांच्या स्मरणार्थ Day Of Remembrance साजरा केला जातो ह्या कार्यक्रमात ह्या दिवंगत अंतराळवीरांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जातो ह्या वर्षी 1 फेब्रुवारीला Columbia अंतराळयान दुर्घटनेला वीस वर्षे पूर्ण होतील ह्या कार्यक्रमात Apollo -1, Challenger आणि Columbia मोहिमेतील दिवंगत अंतराळवीरांचा सन्मान करण्यात आला  26 जानेवारीला पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात नासाचे Administrator Bill Nelson ,Deputy Administrator Pam Melroy आणि Associate Administrator Bob Cabana हजर होते

ह्या वेळी बोलताना Bill Nelson म्हणाले "दरवर्षी जानेवारी महिन्यात नासा संस्थेत Day of Remembrance साजरा होतो आपल्या देशातील,नासा संस्थेतील आणि सर्व जगभरातील अंतराळविश्वातील दिवंगत अंतराळवीर आणि संशोधक ज्यांनी अंतराळ मोहिमेत कार्यरत असताना आपला जीव गमावला त्यांच्या कर्तृत्वाच्या स्मृती जागृत करण्यासाठी,त्यांचा आणी त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी नासा संस्थेत हा दिवस साजरा होतो

आधी अपोलो-1 नंतर Challenger आणी Columbia अंतराळ यान दुर्घटनाग्रस्त झाले ह्या मोहिमेतील दिवंगत अंतराळवीर आणि नासा संस्थेतील इतर मोहिमेतील अंतराळवीर जे ट्रेनिंग दरम्यान आणि अंतराळात कार्यरत असताना जग सोडून गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ,त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करताना आम्हाला असा प्रश्न पडतो कि,ह्या अफाट ब्रम्हांडात आपल स्थान नेमके कुठे आहे ? ह्या निंमित्ताने आम्ही ह्या ब्रह्मांडातील आपल्या कल्पनेपलीकडील प्रचंड अंधकारातील अज्ञात गोष्टींंचा शोध लावण्यात आपण कुठवर पोहोचलो आहोत हे शोधण्याचा प्रयत्न करतो 

ह्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळ विश्वातील सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी अंतराळात भरारी मारली तेथे  विपरीत परीस्थितीत राहून अनेक आव्हानाला सामोरे जात तरंगत्या अवस्थेत राहून संशोधन केले हे करतानाच अचानकच ते स्वर्गापर्यंत पोहोचले ह्या दुर्दैवी घटनेने त्यांचे कुटुंबीय दुःखी झाले तसेच नासा संस्थाही ! त्यामुळेच नासा संस्थेत त्यांंचे स्थान सदैव आदरणीय आहे नासा संस्थेतील सर्वांच्या हृदयात त्यांचे नाव सदैव स्मरणात राहील 

आता ह्या दुर्दैवी घटनेला बराच काळ लोटला आहे नासा संस्था रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना अंतराळवीरांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देते त्यांची काळजी घेते ह्या अध्ययावत युगात अंतराळविश्वातील नवनवीन मोहिमांमध्ये अंतराळात मार्गक्रमण करताना नासा संस्था ह्या कर्तृत्ववान अंतराळवीरांच्या स्मृती मनात जाग्या ठेवते आधी ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्न करते आम्ही सुरक्षिततेची किंमत जाणतो आणि प्रत्येकांच्या सुरक्षिततेची जाबाबदारी घेतो ह्या अंतराळवीरांनी अत्यंत धैर्याने ह्या अंतराळ मोहीमेत सहभाग नोंदवला होता त्यांच्या अतुलनीय धैर्याचा,कर्तुत्वाचा आम्ही सन्मान करतो पृथ्वीवरील मानवासाठी,पृथ्वीसाठी उपयुक्त संशोधन करताना त्यांचा जीव गेला आम्ही त्यांना सलाम करतो "

 STS-107 Crew (top row l-r ): Mission Specialist 1 David M. Brown, Pilot William C. McCool, Payload Commander Michael P. Anderson (bottom row l-r): Mission Specialist 2 Kalpana Chawla, Commander Rick D. Husband, Mission Specialist 4 Laurel Blair Salton Clark, Payload Specialist 1 Ilan Ramon

Columbia अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर -Mission Specialist 1 David M. Brown, Pilot William C. McCool, Payload Commander Michael P. Anderson (bottom row l-r): Mission Specialist 2 Kalpana Chawla, Commander Rick D. Husband, Mission Specialist 4 Laurel Blair Salton Clark, Payload Specialist 1 Ilan Ramon
फोटो -नासा संस्था

 Columbia अंतराळयान दुर्घटनेला ह्या वर्षी वीस वर्षे पूर्ण होतील एक फेब्रुवारी 2003 मध्ये हे अंतराळयान दुर्घटनाग्रस्त झाले होते STS-107 -ह्या मोहिमेअंतर्गत  सात अंतराळवीर स्थानकात राहायला गेले होते स्थानकातील वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतायला अवघे 16 मिनिटे उरले असताना ह्या यानाचा नासा संस्थेतील मिशन कंट्रोलशी संपर्क तुटला आणि अचानक स्फोट होऊन अंतराळयानातील सातही अंतराळवीर हे जग सोडून गेले ह्या मोहिमेत भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलाही होती भारतात नेहमीच तिचे स्मरण केल्या जाते Columbia अंतराळयानाच्या launching च्या वेळी बाहेरील टाकीतुन पडलेल्या फोमच्या तुकड्यामुळे हि दुर्घटना घडली हा तुकडा अंतराळयानाच्या पंख्यात अडकला होता अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत शिरताना पंख्याचे एक होल उघडले आणि स्फोट झाला त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष Bush ह्यांनी ह्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले ",हि घटना दुर्दैवी आहे ! ह्या ब्रह्मांडातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टी शोधण्याची मानवी इच्छा त्यांना पृथ्वीबाहेरील अंधाऱ्या जगात घेऊन गेली ह्या पुढेही हे कार्य सुरु राहील !"अशी प्रतिक्रया त्यांनी दिली होती 

 STS-51L Crew (l-r): Mission Specialist Ellison S. Onizuka, Pilot Michael J. Smith, Payload Specialist Christa McAuliffe, Commander Francis R. “Dick” Scobee, Payload Specialist Gregory B. Jarvis, Mission Specialist Judith A. Resnik,  Mission Specialist Ronald E. McNair

  Challenger अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर - Mission Specialist Ellison S. Onizuka, Pilot Michael J. Smith, Payload Specialist  Christa McAuliffe, Commander Francis R. “Dick” Scobee, Payload Specialist Gregory B. Jarvis, Mission Specialist Judith A. Resnik, Mission Specialist Ronald E. McNair
फोटो -नासा संस्था

 Challenger 

26 जानेवारी 1986 रोजी सकाळी launching नंतर अवघ्या 73सेकंदात ह्या अंतराळ यानाचे बूस्टर इंजिन निकामी झाले आणि चॅलेंजर अंतराळयान तुटल्यामुळे स्फोट होऊन ह्या मोहिमेतील सर्व सात अंतराळवीरांचा अंत झाला

 Apollo 1 Crew (l-r): Virgil I. Grissom, Edward H. White, Roger B. Chaffee

Apollo 1 मोहिमेतील अंतराळवीर -Virgil I. Grissom, Edward H. White, Roger B. Chaffee
फोटो -नासा संस्था

 Apollo - 1-27 जानेवारी 1967 

अंतराळवीर Gus Grissom ,पहिला अमेरिकन अंतराळवीर Space Walker Ed White आणी ,Roger Chaffee   Pre -Launch  चाचणीसाठी launch Pad वर बसले होते तेव्हा त्यांच्या Apollo Capsule मध्ये अचानक बिघाड होऊन आग लागली आणि त्यातच त्यांचा अंत झाला होता ह्या अपघातातून बोध घेत नंतर सुरक्षेच्या दृष्ठीने अंतराळयानाचे डिझाईन आणि इंजिनिअरिंग मध्ये बदल करण्यात आला होता त्या मुळेच नंतर Apollo यानातून चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले 

Friday 20 January 2023

सोयूझ यानातील बिघाडामुळे Space X crew Dragon पाच अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतण्याची शक्यता

 The Soyuz MS-22 crew ship is pictured on Oct. 8, 2002, in the foreground docked to the Rassvet module as the International Space Station orbited 264 miles above Europe.

 Soyuz MS-22 अंतराळयान स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानकाच्या Prichal Docking Module शी जोडल्या गेल्या नंतर - फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 20 जानेवारी

सध्या अंतराळस्थानकात सात अंतराळवीर वास्तव्य करत आहेत नासाचे चार अंतराळवीर Space X Crew Dragon Endurance मधून आणि रशियन अंतराळवीर Soyuz M.S-22 ह्या अंतराळ यानातून स्थानकात पोहोचले होते Endurance आणी Soyuz अंतराळयान सध्या स्थानकातच आहेत अंतराळवीर त्यातूनच पृथ्वीवर परत येणार आहेत 

मागच्या महिन्यात रशियाच्या Soyuz MS-22 ह्या अंतराळ यानातील Coolant System मध्ये बिघाड झाल्याचे अंतराळवीरांच्या लक्षात आले होते आता त्यातून लीकेज होत आहे ह्या अंतराळयानातुन रशियन अंतराळवीरांना परत आणताना Heat Problem येऊ शकतो अंतराळवीरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू शकते त्या मुळे आता रशियन अंतराळवीर Frank Rubio हे परतताना Space X Crew Dragon Endurance मधील चार अंतराळवीरांसोबत येण्याची शक्यता आहे 

रशियन अंतराळ संस्थां ह्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी 20 फेब्रुवारीला सॊयुझ MS-23 हे अंतराळवीर विरहित यान स्थानकात पाठवणार आहे पण काही कारणाने समस्या उद्भवल्यास आणी  अंतराळयान स्थानकात पोहोचू शकले नाही  तर Frank Rubio यांना Endurance अंतराळ यानातुन चार अंतराळवीरांसह परत आणण्याचा निर्णय नासा संस्था आणि Space -X ह्यांनी घेतला आहे Space X Crew Dragon मध्ये भरपूर जागा असल्यामुळे गरज पडल्यास त्यातून सात अंतराळवीर अंतराळप्रवास करू शकतात 

त्या साठी Soyuz यानातील Frank Rubio ह्यांचे Seat Liner काढून Endurance Dragon मध्ये बसविण्यात येणार आहे नासाचे अंतराळवीर Josh Cassada आणी  Nicole Mann ह्यांनी   Endurance Dragon मध्ये Seat Liner बसविण्यासाठी आवश्यक Tool आणण्याचे आणि Soyuz यानातून Frank Rubio ह्यांचे Seat Liner काढून आणण्याचे काम पूर्ण केले आहे 

त्या मुळे आता Space X Crew Dragon -Endurance मधून चार ऐवजी पाच अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार आहेत आणि पृथ्वीवर परतणार आहेत 

Soyuz-MS-23 स्थानकात पोहोचल्यावर अंतराळवीर Prokopyev आणि अंतराळवीर Petelin ह्यांचे Soyuz MS-22 मधील  Seat Liner, Soyuz MS-23  ह्या यानात बसविले जाईल अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

Wednesday 11 January 2023

अंतराळ विश्वातील नावीन्यपूर्ण संकल्पनांची प्रायोगिक संशोधनासाठी निवड

 NIAC graphic banner.

 

 नासा संस्था- 10 जानेवारी

कल्पना करा जीथे  Pellet beam propulsion system द्वारे जलद गतीने ईतर जगाचा प्रवास करता येईल चंद्रावरील भविष्यकालीन मानवी वसाहतीत पाईपलाईन मधून ऑक्सीजन पुरवठा केल्या जाईल मंगळ ग्रहावर घर बांधताना भिंतीसाठी विटा एकावर एक रचुन जोडण्याची गरज भासणार नाही त्या विटा आपोआपच  एकावर एक रचल्या जातील आणी स्वयंचलित यंत्रणेने जोडल्या जातील 

नासा संस्थेने ह्या अभिनव कल्पनांच्या प्रोयोगिक संशोधनाला मान्यता दिली आहे त्या साठी नासा संस्थेने नऊ राज्यातील 14 जणांची निवड केली आहे नासा संस्थेच्या N.I.AC (NASA Innovative Advance Concept) ह्या मोहिमे अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो नासा संस्था अशा अवकाश तंत्रज्ञानांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांना आवश्यक ती आर्थिक मदत करते निवडक दहा कल्पक संशोधकांना आधी नासा संस्थेतर्फे 175,000$ चा निधी देण्यात येणार आहे 

नासा संस्थेचे Administrator Bill Nelson म्हणतात,नासा संस्था नेहमी अशक्य ते शक्य करण्याचे धाडस करते अशा अभिनव संकल्पना संशोधीत करण्याचे धाडस केल्यामुळेच जे आज अशक्य वाटते ते भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकते अशा दूरदर्शी विचारवंतांच्या कल्पना अविष्कारा मुळे भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अद्ययावत अवकाश तंत्रज्ञान निर्मितीचे दालन उघडते 

नासाच्या N.I.AC उपक्रमा अंतर्गत अशा बुद्धिमान संशोधक,इंजिनीअर्सना आर्थिक साहाय्य केले जाते आणि आवश्यक ती टेक्निकल मदतही दिल्या जाते त्या मुळेच आता स्वप्नवत अशक्य वाटणाऱ्या ह्या संकल्पना संशोधित होतील आणि  सत्यात उतरतील ह्या उपक्रमा अंतर्गत संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या साहित्यात सेन्सर्स,उपकरणे ,उत्पादन तंत्र ,ऊर्जा प्रणाली व इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे 

वॉशिंग्टन येथील Quinn Marley ह्यांनी सादर केलेल्या संकल्पनेत शनीचा सर्वात मोठा चंद्र Titan वर पृथ्वीवरील Sea Plane सारखी एक बोट तेथील रसायनशास्त्र संशोधित करू शकेल Titan वर अत्यंत दाट वातावरण आहे आणि गुरुत्वाकरणही अत्यंत कमी आहे त्या मुळे त्या वातावरणात उड्डाण करणे सोपे नाही पण त्या बोटीत एक जड अद्ययावत उपकरण बसविलेले असल्यामुळे तेथे उड्डाण करणे सोपे होईल हे Sea Plane तेथील सरोवरात देखील प्रवास करेल 

Cambridge येथील MIT मधील Marry Knapp यांनी हजारो एकसारख्या लहान उपग्रहांचा समावेश असलेल्या नाविन्यपूर्ण अवकाश वेधशाळेची संकल्पना सादर केली आहे हे उपग्रह ब्रह्मांडातील दूरवरच्या खोल अंतरंगातील सखोल निरीक्षण नोंदवतील तेथील उत्सर्जित होणारी कॉस्मिक किरणे आणी त्यातून निर्माण होणाऱ्या रेडिओ लहरींच्या तीव्रतांची नोंद करतील ह्याचा फायदा भविष्यकालीन मंगळ आणि इतर मोहिमेत पृथ्वीपासून दूरवरच्या मानवाला अज्ञात असलेल्या सौरमाले बाहेरच्या पृथ्वीसारख्या ग्रह ताऱ्यांचा शोध घेण्यासाठीही होईल 

NASA चे N.I.AC चे Program Executive Michael LaPointe म्हणतात,ह्या नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या संशोधनाचा हा प्रारंभिक टप्पा नासा संस्थेतील संशोधकांना भविष्यकालीन अंतराळ मोहिमांमध्ये प्रत्यक्षात आणण्यास मदत करू शकेल मात्र सध्या ह्या संकल्पनेच्या प्रायोगिक संशोधनाला मान्यता मिळाली आहे ह्या संशोधनाला नासा संस्थेची अधिकृत मान्यता मात्र मिळणार नाही

Sunday 1 January 2023

Persevrance मंगळयानाने दिल्या पृथ्वीवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Martian New Year – NASA Mars Exploration Perseverance मंगळ यानाने पृथ्वीवासीयांना पाठवलेल्या शुभेच्छा !-फोटो नासा संस्था

नासा संस्था- 1 जानेवारी

Perseverance मंगळयान सध्या मंगळावरील Jezoro Crater ह्या भागात संशोधीत नमुन्यांच्या ट्यूब जमिनीवर व्यवस्थित ठेवण्याचे काम करण्यात व्यस्त आहे त्यातून वेळ काढून ह्या मंगळयानाने पृथ्वीवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ह्या शुभेच्छा नवीन वर्ष सुरू होण्याआधीच दिल्या आहेत कारण मंगळावरील नवीन वर्ष 26 डिसेंबरला सुरू होत असल्याने Perseverance यानाने Twitter वरून सर्वांना 
 
                                                  "HAPPY MARS NEW YEAR!" 
                                                              अशा शुभेच्छा दिल्या आहेत 
आपल्या प्रमाणे जगातील बहुसंख्य देश Gregorian calendar प्रमाणे वर्षगणना करतात आणि एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात करतात
पण मंगळावरील वर्षगणना वेगळी आहे जगभरातील शास्त्रज्ञांनी 1955 सालापासुन 26 डिसेंबरला मंगळावरील वर्षगणना सुरू केली त्या दिवशी मंगळग्रहावरील ऊत्तर गोलार्धात दिवस आणी रात्रीची वेळ सारखी असल्याने हा दिवस प्रमाण मानुन त्यांनी हा निर्णय घेतला मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे आहे  मंगळावर पृथ्वीप्रमणे तीन ऋतु नसतात तर चार असतात हिवाळा,वसंत,ऊन्हाळा आणी शरद ऋतू त्या मुळे त्यांना ह्या काळात तेथील वातावरणात संशोधन करणे सोयीचे वाटले 

त्या मुळेच पृथ्वी आणी मंगळावरील दिवसात फरक आहे मंगळावरील एक दिवस पृथ्वीपेक्षा 39 मीनीटे 35 सेकंदानी जास्त आहे मंगळावरील एका दिवसाला सौर दिवस किंवा एक सोल म्हणतात मंगळावरील एका वर्षात 668 सोल म्हणजे पृथ्वीवरील 687 दिवस असतात पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे मंगळाच्या दुप्पट असते शास्त्रज्ञांच्या वर्षगणने नुसार यंदा मंगळाने 36 व्या वर्षात पदार्पण केले आहे 
 
मंगळग्रह सुर्यापासुन लांब अंतरावर आहे शिवाय मंगळाचा आकार लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे सूर्याभोवती फिरण्याची कक्षाही बदलते  सूर्याभोवती प्रदक्षीणेसाठी मंगळाला पृथ्वीच्या दुप्पट वेळ लागतो आणि मंगळाला चंद्रही नाही त्या मुळे महिन्यांचे मोजमाप नाही 
पृथ्वीवरील वातावरणाचा थर दाट आहे पण मंगळावरील वातावरण विरळ आहे पृथ्वी गोल आहे आणी पृथ्वीचे सुर्यापासुनचे अंतर मंगळापेक्षा कमी आहे  त्या मुळे सुर्यप्रदक्षिणेसाठी पृथ्वीला कमी वेळ लागतो शिवाय पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आहे 

शास्त्रज्ञांच्या मते ब्रम्हांडात पृथ्वी आणी मंगळग्रहाची निर्मिती एकाच वेळी झाली दोन्ही ग्रहावर सजीव सृष्ठीसाठी अनुकूल वातावरण होते पण कालांतराने मंगळावरील सजीव सृष्ठी नष्ठ झाली दोन्ही ग्रहातील वातावरणातील फरकामुळे नवीन वर्षारंभ वेगळा आहे