Thursday 30 June 2022

Artemis चांद्रमोहीमे अंतर्गत CAPSTONE अंतराळयानाचे चंद्राच्या दिशेने यशस्वी उड्डाण

                       An image of CAPSTONE, launching aboard Rocket Lab’s Electron rocket from the Rocket Lab Launch Complex 1 on the Mahia Peninsula of New Zealand Tuesday, June 28, 2022.

नासाचे  CAPSTONE अंतराळयान चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी अंतराळात झेपावताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -28 जून  

अमेरिकेची बंद पडलेली चांद्रमोहीम पन्नास वर्षांनी पुन्हा सुरु झाली आहे आणि सध्या त्याची तयारी जोरात सुरु आहे ह्याच आर्टेमिस मोहीमेचा शुभारंभ मंगळवारी 28 जूनला नासाच्या CAPSTONE अंतराळयानाच्या यशस्वी उड्डाणाने झाला 

New Zealand Mahia Peninsula Rocket Lab मधील उड्डाण स्थळावरून 5.55a.m.(स्थानिक वेळ )वाजता CAPSTONE अंतराळयान चंद्राच्या दिशेने अंतराळप्रवास करण्यासाठी अंतराळात झेपावले आर्टेमिस मोहिमेतील भविष्यकालीन अंतराळयान,अंतराळवीर व अंतराळस्थानक ह्यांच्यासाठी सुरक्षित व योग्य जागा शोधण्यासाठी CAPSTONE अंतराळयान चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणार आहे

 CAPSTONE above the moon.

 नासाचे CAPSTONE अंतराळयान चंद्राच्या कक्षेत शिरल्यावर कक्षेत भ्रमण करतानाचे काल्पनिक चित्र -फोटो नासा संस्था 

CAPSTONE अंतराळयानाचा आकार मायक्रोवेव्ह ओव्हन एव्हढा असून त्याचे वजन 55पौंड आहे सध्या हे अंतराळयान पृथ्वीच्या अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणीय कक्षेत पोहोचले असून त्याला चंद्राच्या कक्षेत पोहोचायला चार महिने लागतील CAPSTONE अंतराळयान सहा महिने चंद्राभोवती भ्रमण करेल व आगामी 2024 मधील आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्यासाठी सुरक्षित व  योग्य जागा शोधेल शिवाय भविष्यकालीन  अंतराळस्थानकाच्या भ्रमणासाठी व स्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांसाठी चंद्राभोवतीची योग्य कक्षा शोधेल सध्या नासाचे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानाक जसे पृथ्वीच्या कक्षेत राहून पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे तशीच चंद्राभोवतीची कक्षा शोधण्याचे काम CAPSTONE अंतराळयान करणार आहे ह्याचा उपयोग भविष्यकालीन मंगळ मोहिमेसाठीही होईल 

CAPSTONE अंतराळयानाच्या यशस्वी Launching मुळे नासाचे Associate Administrator Jim Reuter आनंदित झाले आहेत ते म्हणतात "CAPSTONE अंतराळयान तयार करण्यासाठी यानाच्या टीमला सहा वर्षे लागली आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे हि शानदार यशस्वी सुरवात पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत आमची सर्व टीम आनंदी झाली आहे नासा आणि आमचे कमर्शियल पार्टनर ह्यांच्या यशाचे हे उत्कृष्ठ उदाहरण आहे आमच्यासाठी हि मोहीम महत्वाकांक्षी आहे आम्ही आता CAPSTONE चंद्राच्या कक्षेत शिरून कार्यरत झाल्यावर त्याचे काम पाहण्यास उत्सुक झालो आहोत हे भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील पहिले यशस्वी पाऊल आहे "

CAPSTONE चंद्राच्या NRHO (Near Rectilinear Halo Orbit ) ह्या कक्षेत भ्रमण करेल पण हे यान चंद्राभोवती गोलाकार न फिरता Halo आकारात फिरेल त्याचे चंद्राभोवतीचे अंतर देखील सतत बदलते राहील चंद्राच्या नॉर्थ पोल जवळ कमीतकमी 1000 मैल जवळील अंतरावर आणि जास्तीतजास्त 43.500 मैल दूर अंतरावरून CAPSTONE अंतराळयान चंद्राभोवती भ्रमण करेल ह्या यानाला चंद्राभोवती एक चक्कर पूर्ण करायला साडेसहा दिवस लागतील आजवर अशा आकारात एकाही अंतराळयानाने ग्रहाभोवती भ्रमण केले नाही पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यातील गुरुत्वाकर्षणीय बॅलन्स पॉईंट शोधून तेथेच हे अंतराळयान स्थिरावेल व चंद्राभोवती भ्रमण करेल त्या मुळे हे अंतराळयान चंद्राच्या प्रभाव कक्षेत किंवा पृथ्वीकडे खेचल्या जाणार नाही सहा महिने पर्यंत CAPSTONE अंतराळयान चंद्राच्या कक्षेत भ्रमण करून तेथील उपयुक्त माहिती पृथ्वीवर पाठवेल त्या नंतर नासा संस्थेतर्फे चंद्रावरील भूमीवर ह्या यानाला पाडून नष्ठ केल्या जाईल 

चार महिन्यांनी CAPSTONE अंतराळयान चंद्राच्या कक्षेत शिरून भ्रमण सुरु होईल तेव्हा नासा संस्थेतर्फे सामान्य हौशी नागरिकांना Eyes On The Solar System द्वारे ह्या यानाचे चंद्राभोवतीचे भ्रमण आभासी पद्धतीने पाहण्याची सुवर्णसंधी देण्यात येणार आहे

Wednesday 22 June 2022

नासाच्या Boeing Starliner Flight Test अंतर्गत दोन अंतराळवीर स्थानकात जाणार

NASA astronauts Suni Williams, left, Barry "Butch" Wilmore, center, and Mike Fincke, right, watch as a United Launch Alliance Atlas V rocket with Boeing’s CST-100 Starliner spacecraft aboard is rolled out to the launch pad.

नासाच्या Cape Canaveral Space Force Station मध्ये Boeing Starliner अंतराळयान आणि Atlas V Rocket चे निरीक्षण करताना अंतराळवीर Suni Williams अंतराळवीर Barry Butch Wilmore आणि अंतराळवीर Mike Finke -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 16 जून 

Boeing Starliner अंतराळ यानाच्या  Crew Flight Test मोहिमे अंतर्गत अंतराळ स्थानकात जाण्यासाठी नासा संस्थेने दोन अंतराळवीरांची निवड केली आहे ह्या मोहिमेत कमांडरपदी अंतराळवीर Barry Butch Williams आणि पायलटपदी अंतराळवीर Suni Williams ह्यांची निवड करण्यात आली आहे 

नासा संस्थेने 2020 मध्येच अंतराळवीर Barry Butch Wilmore ह्यांची कमांडरपदा करिता निवड केली होती आणि 2018 मध्ये ह्या मोहिमेच्या पायलटपदासाठी अंतराळवीर Nicole Mann ह्यांची निवड केली होती पण अंतराळवीर Nicole Mann ह्यांची Space X Crew - 5 मोहिमेसाठी निवड झाल्याने त्यांच्या जागी आता अंतराळवीर Suni Williams ह्यांची पायलटपदी निवड करण्यात आली आहे Suni Williams ह्यांनी ह्या आधी Test Pilot म्हणून काम केले आहे हे दोन्ही अंतराळवीर ह्या आधी नासाच्या अंतराळ मोहिमेत सहभागी झाले होते आणि त्यांनी त्या दरम्यान स्थानकात दीर्घकाळ वास्तव्य व संशोधन केले आहे

हे दोन्ही अंतराळवीर Flight Test मोहिमेद्वारे अंतराळ स्थानकात जातील तेथे ते दोन आठवडे वास्तव्य करतील आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या जरी नियोजित वास्तव्याचा कालावधी दोन आठवडे निश्चित केला असला तरीही आगामी काळात हे वास्तव्य सहा महिन्यांपर्यंत वाढू शकते आणि सध्या हे दोघे अंतराळवीर स्थानकात जाणार असले तरी नंतर त्यांच्या सोबत तिसऱ्या अंतराळवीराला पाठवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो नासाचे अंतराळवीर Mike Fincke ह्यांची देखील ह्या मोहिमेसाठी निवड झाली असून सध्या ते पायलटचे ट्रेनिंग घेत आहेत आणि गरज पडल्यास स्थानकात जाण्यासाठी सज्ज आहेत नासाच्या Cape Canaveral Space Force Station येथील उड्डाणस्थळावरून Atlas V Rocketच्या साहाय्याने Boeing Starliner अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह अंतराळात झेपावेल

Boeing Starliner यानाची ह्या आधीची Crew विरहित Flight Test यशस्वी झाल्यामुळे आता ह्या अंतराळयानातून अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार आहेत हि मोहीम यशस्वी झाल्यानंतर Boeing Starliner अंतराळयानाचा उपयोग भविष्यकालीन अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याआणण्या साठी केला जाईल शिवाय इतर मोहिमेसाठी आणि स्थानकात सामान नेण्यासाठी कार्गोशिप म्हणूनही ह्या अंतराळयानाचा उपयोग होईल

Saturday 18 June 2022

Artemis मोहिमेतील अंतराळवीरांच्या स्पेससूट आणी Space Walk सुट तयार करण्यासाठी दोन कंपन्यांची निवड

  Artist’s Illustration: Two suited crew members work on the lunar surface. One in the foreground lifts a rock to examine it while the other photographs the collection site in the background.

 भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील अंतराळवीरांनी चांद्रभूमीवर  परिधान केलेल्या Space Suitचे काल्पनिक फोटो -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -

नासाच्या भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि आर्टेमिस चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांसाठी Space Suit आणि Space walk suit बनविण्यासाठी नासा संस्थेने Axiom Space आणि Collins ह्या दोन कंपन्यांची निवड केली आहे ह्या दोन कंपन्यांना भविष्यकालीन चांद्र मोहिमेसाठी आणि अंतराळवीरांसाठी चांद्रभूमीवर उतरल्यानंतर आणि Space Walk साठी लागणारे Space Suit बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे 

गेल्या चाळीस वर्षांपासून अंतराळमोहिमेतील अंतराळवीर वापरत असलेले Space Suit आता जुने झाले आहेत ते वारंवार दुरुस्त करावे लागतात आताचा काळ प्रगत आहे अंतराळ विश्वात नवनवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्या जात आहे त्यामुळे आता अंतराळवीरांना देखील अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानयुक्त Space suit ची आवश्यकता भासत आहे त्या मुळेच नासा संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण Space Suit बनविण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली होती त्याला अनेक कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता

ह्या दोन्ही कंपन्या अंतराळवीरांसाठी आधीपेक्षा वेगळा नाविन्यपूर्ण आणि आवश्यक गरजांची पूर्तता करणारा Space Suit तयार करणार आहेत नासाच्या Houston येथील Johnson Space Center मधील Director Vanessa Wyche  म्हणतात ,"ह्या दोन कंपन्यांनी बनवलेल्या Space Suit मध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्या जाणार आहे त्या मुळे चांद्र मोहिमेतील अंतराळवीरांना चांद्र भूमीवर उतरल्यानंतर आणि भविष्य कालीन मोहिमेत तेथील संशोधन करताना यशाच्या मार्गावर नेण्यासाठी होईल आतापर्यंत अंतराळवीरांचे Space Suit गव्हर्मेंट व नासा संस्थेने डिझाईन केल्याप्रमाणे तयार केले जात होते आता नासा संस्था आणि व्यावसायिक कंपन्या मिळून हा Space Suit तयार करणार आहेत हि अंतराळविश्वातील नव्या युगाची सुरवात आहे "! नासाचा अंतराळवीरांसाठी सेफ ,सुटसुटीत आणि आवश्यक गरजांची पूर्तता करणारा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीयुक्त Space Suit तयार करणे हा उद्देश आहे

ह्या दोन्ही कंपन्यांची निवड xEVAS( Exploration Extravehicular Activity Services) अंतर्गत करण्यात आली आहे  ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत 2034 पर्यंतच्या कालावधीत अंताळवीरांच्या आवश्यक गरजांची पूर्तता करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त Space Suit तयार करणे आवश्यक आहे त्या साठी 3.5अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे कंपनी स्वत: हा खर्च करेल 

ह्या Space Suit चे डिझाईन नासा संस्थेतील इंजिनीअर्सची टीम आणि Expert करतील त्या मध्ये अंतराळवीरांसाठी सुरक्षित यंत्रणा त्यांना Space Walk साठी लागणारे Tools आणि इतर आवश्यक बाबींचा त्यात समावेश असेल शिवाय तो सूट सुटसुटीत असावा पृथ्वी प्रमाणेच परग्रहावरील भूमीवर अंतराळवीरांना तो Space Suit घालून सहजतेने वावरता यायला हवे ह्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर Space Suit बनविण्याची परवानगी देण्यात येईल शिवाय नासा संस्थेच्या आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल सर्व अपेक्षांची पूर्ती झाल्यानंतर नासा संस्थेत Space Suit ची  चाचणी होईल आणि त्या नंतर त्यावर अंतिम शिक्का मोर्तब होईल आधी पृथ्वीवर ट्रेनिंग दरम्यान अंतराळवीर हा Space Suit वापरतील त्या नंतर अंतराळस्थानकातील अंतराळवीर Space Walk च्या वेळी आणि अंतराळ प्रवासात वापरतील त्या नंतर हा Space Suit Artemis III मोहिमेतील अंतराळवीर वापरतील 

ह्या Space Suit बनविताना नासा संस्था ह्या दोन्ही भागीदारांना आवश्यक ती मदत करेल ह्या Space Suit वर दोन्ही कंपन्यांचा मालकी हक्क असेल पण नासा त्याचा व्यावसायिक वापर करू शकेल ह्या दोन कंपन्यांची निवड झाल्या नंतर नासा संस्थेतील प्रमुख आणि संस्था प्रमुख ह्यांची मिटिंग झाली आणि त्या वेळी त्यांनी ह्या Space Suit निर्मिती बद्दल माहिती दिली आम्ही  तयार केलेला नवीन Space Suit आवश्यक बाबीची पूर्तता करेल तो सुटसुटीत,हलका, सेफ आणि नाविन्यपूर्ण असेल आणि विशेष म्हणजे अंतराळवीरांच्या मापाचा असेल असे सांगितले तो तयार करताना त्यांच्या शरीरयष्टीचा,उंचीचा विचार केल्या जाईल आणि तो घालून अंतराळवीर सहजतेने परग्रहावर फिरू शकतील 

 

Thursday 9 June 2022

Blue Origin च्या NS-21 मोहिमेचे सहा प्रवासी अंतराळपर्यटन करून परतले

 

 New Shepard NS -21 चे अंतराळप्रवासी Victor Vescovo,Victor Correa Hespanha ,Katya Echazarreata , Jaison Robinson, Hamish Harding आणि Evan Dick

Blue Origin- 4 जुन

Blue Origin च्या NS - 21अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत चार जुनला सहा अंतराळ प्रवासी अंतराळ प्रवास करून परतले हे प्रवासी 20 मे ला अंतराळ पर्यटनास जाणार होते पण ऊड्डानपुर्व चाचणीच्या वेळी New Shepard अंतराळ यान आणी Rocket मधील यंत्रणा अपेक्षेप्रमाणे कार्यरत न झाल्याने हे ऊड्डाण लांबले होते चार जुनला Blue Origin च्या West Texas ह्या ऊड्डाणस्थळावरुन  सकाळी 9.25 a.m.(EDT)ला New Shepard यान Rocketच्या सहाय्याने सहा प्रवाशांनासह अंतराळात झेपावले ह्या सहा प्रवाशांमध्ये Evan Dick,Katya Echazarreta,Hamish Harding,Victor Correa Hespanha ,Jaison Robinson,Victor Vescovo ह्यांचा समावेश होता ह्या सर्व प्रवाशांना ऊड्डाणपुर्व ट्रेनिंग देण्यात आले होते

आवश्यक चेकअप नंतर हे सर्व प्रवासी जेव्हा यानात बसले तेव्हा ते ऊड्डाणाची आतुरतेने वाट पहात होते खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी संवाद साधत होते Katya म्हणाली, "मी सात वर्षाची असल्यापासून मला अंतराळात जायचे होते ते स्वप्न आता पुर्ण होत आहे माझी आई माझी जबरदस्त फॅन आहे आता अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर परतल्यानंतर मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे " रॉकेट प्रज्वलित झाल्यानंतर अंतराळयान काही मिनिटातच आकाशात पोहोचले तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला काही वेळाने यान रॉकेट पासून वेगळे झाले आणि अंतराळ प्रवास सुरु झाला यानाने पृथ्वी आणि अंतराळाची सिमारेषा  पार करताच सर्वांनी बेल्ट सोडून झिरो ग्रॅव्हीटीतील वजन रहित अवस्थेत तरंगण्याचा अनुभव घेतला

 NS-21 Astronauts Katya Echazarreta and Jaison Robinson at apogee. (June 4, 2022)

 अंतराळप्रवासा दरम्यान तरंगण्याचा अनुभव घेताना आणि Blue Origin संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना अंतराळ प्रवाशी -फोटो -Blue Origin 

ह्या अंतराळप्रवासा दरम्यान सर्वांनी Blue Origin संस्थेशी लाईव्ह संपर्क साधुन त्यांना हि सुवर्णसंधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले काही मिनिटांचा पृथ्वी ते अंतराळ ह्या अविस्मरणीय प्रवासाचा आनंद लुटून हे प्रवासी Parachute च्या सहाय्याने पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांच्या तोंडून Beautiful ! Amazing ! अशा प्रतिक्रया उमटल्या परतल्यानंतर सर्वांनीच हा अनुभव अविस्मरणीय होता! खूप आनंदायी होता आम्हाला पुन्हा जायला आवडेल कारण हा प्रवास खूप कमी वेळाचा होता असे सांगितले Jaison Robinson म्हणाले यानाच्या मोठ्या खिडकीतून अंतराळातील अंधारातून तारे,ग्रह जवळून पाहताना,खाली पृथ्वीकडे पाहतानाचा अनुभव विलक्षण होता पृथ्वीच अलौकिक सृष्ठी सौन्दर्य पाहायला मिळाल शाळेत पृथ्वी गोल आहे हे शिकवल होत पण अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना ती खरच गोलाकार आहे हे प्रत्यक्षात पाहायला मिळाल हे सारच अद्भुत आहे ! आम्हाला हि संधी दिल्याबद्दल Blue Origin टीमचे आभार

Blue Origin चे Vice President Phil Joyee ह्यांनी ह्या पाचव्या यशस्वी ऊड्डाणानंतर आनंद व्यक्त केला ते म्हणाले हे यश Blue Originच्या संपूर्ण टिमचे आहे त्यांचे अथक परीश्नम,मेहनत आणी कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे हे शक्य झाले ह्या आधी चार मोहिमेतील प्रवासी अंतराळ पर्यटन करून आले आणि आता आगामी काळातील प्रत्येक अंतराळपर्यटन मोहिमेद्वारे सहा प्रवाशांना आम्ही अंतराळ पर्यटन घडवणार आहोत ह्या अंतराळप्रवासामुळे प्रवाशांना आकाशातील ग्रहतारे जवळुन पहाण्याची संधी मिळेल आपल्या पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाण्याचा अविस्मरणीय आनंद देखील मिळेल पृथीवरून अंतराळात पोहोचताच एका क्षणात त्यांचे आयुष्य बदलते तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीत ते तरंगण्याचा अद्भुत अनुभव घेतात त्या मुळे हौशी पर्यटक अंतराळपर्यटन करण्यास उत्सुक असतात ह्या अंतराळप्रवासाचे लाईव्ह प्रसारण Blue Origin च्या Website वरून करण्यात आले होते