Thursday 27 June 2019

अंतराळवीर Oleg Kononenko,David Saint आणि Anne McClain पृथ्वीवर सुखरुप पोहोचले


NASA astronaut Anne McClain
 Astronaut Anne McClain पृथ्वीवर परतल्यावर तिला सोयूझ यानातून बाहेर आणताना -फोटो -नासा संस्था

नासा सस्था -25 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 59चे अंतराळवीर Anne McClain,सोयूझ कमांडर आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि कॅनडियन अंतराळवीर David -Saint-Jacques सोमवारी ठरलेल्या वेळी पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत
सोयूझ MS-11 हे अंतराळयान ह्या तिन अंतराळवीरांना घेऊन स्थानकातून निघाले आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर सोमवारी कझाकस्थानात 10.47p.m. ला सुखरूप पोहोचले (स्थानिक वेळ 25 जून -8.47 a.m.)
हे तिन अंतराळवीर 3 डिसेंबर 2018 ला अंतराळस्थानकात राहण्यासाठी गेले होते आणि सहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर आता पृथ्वीवर पोहोचले आहेत


 अंतराळवीर David Saint आणि Anne McClain Ellington येथे पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत करताना अधिकारी -फोटो -नासा संस्था

त्यांच्या 204 दिवसांच्या स्थानकातील वास्तव्यात त्यांनी तेथे सुरु असलेल्या संशोधनात भर टाकली ह्या दरम्यान अंतराळस्थानकातून त्यांनी पृथ्वीला 3,264 वेळा फेऱ्या मारल्या आणि 86,430,555 मैलाचा अंतराळ प्रवास केला
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी चारवेळा स्पेसवॉकही केला
नासाच्या Anne McClain ने दोनवेळा स्पेसवॉक केला आणि ह्या दोन स्पेसवॉक साठी तिने अंतराळात 13तास.8 मिनिटे काम केले हि तिची पहिलीच अंतराळवारी होती
अंतराळवीर David Saint ह्यांनी त्यांच्या पहिल्याच अंतराळ कारकिर्दीतील पहिल्याच स्पेसवॉक मध्ये 6 तास 29 मिनिटे अंतराळात व्यतीत केले


 Anne McClain विमानाने Ellington येथे पोहोचल्यावर तिचे जोशात स्वागत झाले -फोटो नासा संस्था

तर रशियन अंतराळवीर Oleg Kononenko ह्यांची हि चवथी अंतराळवारी होती ह्या अंतराळवारीत त्यांनी दोन स्पेसवॉक केले आणि त्या साठी त्यांनी अंतराळात 13तास 46 मिनिटे काम केले त्यांच्या अंतराळ करिअर मध्ये त्यांनी पाच स्पेसवॉक केले आणि ह्या दरम्यान अंतराळात 32तास 13m व्यतीत केले
पृथ्वीवर परतल्यानंतर पूर्वनियोजित मेडिकल चेकअप नंतर त्यांना नासा संस्थेच्या विमानाने त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात येईल


 अंतराळवीर David Saint Ellington येथे पोहोचल्यावर विमानातून उतरताना -फोटो- नासा संस्था

आता अंतराळस्थानकाची जबाबदारी अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovichinin सांभाळतील 20 जुलैला आणखी तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी जातील तोवर हे अंतराळवीर स्थानकात राहून त्यांचे संशोधन सुरु ठेवतील

Monday 24 June 2019

स्थानकातील शेवटच्या आठवड्यातील अनुभव Anne McClain ने केले शेअर

Anne McClain
                                      Anne McClain
नासा संस्था - 23 जून
अंतराळवीर व्हायच आणि अंतराळस्थानकात राहून संशोधन करताकरता अंतराळात भरारी मारायची हे Anne च लहानपणापासूनच स्वप्न अथक परिश्रम आणि प्रयत्नाने तीन हे स्वप्न पूर्ण केलय त्यासाठी तिला तीच आर्मी मधल करिअर कामी आल सहा साडेसहा महिन्यांच अंतराळस्थानकातील वास्तव्य संपवून आज ती पुन्हा पृथ्वीवर परततेय त्या आधीच्या स्थानकातील शेवटच्या आठवड्यातील तिच्या वास्तव्यातील भावनिक अनुभव तिने शेअर केलेत
पृथ्वीवर परतण्याआधीची तयारी सुरु आहे ह्या आठवड्यात भरपूर काम आहे Packing,cleaning ,sorting , studying दगदगीचा धावपळीचा आहे हा आठवडा आम्ही सारे इथे एकत्रित जमतो ते भीतीपोटी नाही तर मानवाच्या उज्वल भविष्यासाठी आगामी अंतराळ मोहीमांतील दूरवरच्या ग्रहावरील मानवी वास्तव्यासाठी आम्ही संशोधन करतोय आमच्या इथल्या वास्तव्यातील बरेच दिवस स्थानकाच्या maintenance साठी गेले इथला अनुभव विलक्षण होता आनंददायी होता

Astronaut Anne McClain checks out the new Astrobee hardware
 आंतराळस्थानकात आलेले नवीन Astrobee Robotic Hardware चेक करताना Anne -फोटो-नासा संस्था

खरच माझ्यासाठी हे अमेझिंग होत आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होत ! आधी मला अंतराळातील झिरो ग्रॅविटीत राहून काम करण आणि तिथल्या वातावरणाशी माझ्या मनाला आणि शरीराला जुळवून घेण खूप कठीण जाईल  अस वाटल होत पण किती सहजतेन जुळवून घेऊ शकले मी! आणि आधी अद्भुत अशक्य वाटणारी गोष्टही किती सहजतेन नॉर्मल झाली हळूहळू! म्हणून मी सगळ्यांना सांगते ,"तुमच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून पहा तुम्हाला अशक्य वाटणार द्येय साध्य करायच धाडस करा आणी पहा तुम्हालाही शक्य होईल ते! तुम्हीही आनंदित होऊन आश्चर्याने म्हणाल खरच मी हे केलय ?"
पृथ्वीप्रमाणेच इथला दिवस सुरु होत असला तरीही इथली परिस्थिती वेगळी असते आम्ही रोज आमच शरीर आरोग्य नॉर्मल आणि फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतो
एखादा बल्ब लावण्यासाठी कितीजण लागतीलअस विचारल तर तुम्ही म्हणाल एकजण हो खरय! पण  इथे लाईट फिटिंग साठी एक अंतराळवीर,स्थानकात चार टूल्स written procedure,up stream electric inhibits आणि पृथ्वीवरील दोन मिशन कंट्रोल सेंटरची मदत तर लागेलच आणि हे काम तरंगत,तोल सांभाळत कराव लागत हे काम अवघड असल तरी आम्ही त्याचा आनंद घेतो
हा माझा शेवटचा आठवडा मी रोज इथे कॉफीचा आस्वाद घेताना विचार करतेय अजून किती कप राहिलेत माझे? शेवटचे सहा दिवस फक्त !
आज पूर्ण दिवस आम्ही सोयूझ यानात practicing साठी घालवला आमचा स्पेस सूट घालून चेक केला तो फिट बसतोय ना ? कुठे लिकेज तर नाही ना ?ह्याची खात्री केली
आता पुन्हा पृथ्वीवर परतताना मला लाँचिंगच्या वेळेसचा अनुभव येईल तो थरारक,रोमांचक,अद्भुत अनुभव मी पुन्हा अनुभवेन अंतराळातील झिरो ग्रॅविटीत आल्यानंतर कोणीतरी अत्यंत फोर्सने आपल्याला पुढेमागे ढकलतय अस वाटत होत मला मी खाली पडतेय अस न वाटता आपण पृथ्वीला लटकतोय कि पृथ्वी आपल्याला? असा प्रश्न पडला होता अजूनही अंतराळातील ह्या अनाकलनीय,गूढ अज्ञात,निर्वात विशाल पोकळीतील कितीतरी मानवाला माहीत नसलेल्या गोष्टींचा शोध घ्यायचाय
लँडिंगच्या वेळेसचा अनुभव मला वॉशिंग मशीन मधल्या कपड्यांसारखा वाटतो मशीन मध्ये कपडे कसे वेगाने गोल,गोल फिरतात अगदी तशीच अवस्था अंतराळवीरांची यानात होते
Anne McClain म्हणाली होती की स्थानकातुन प्रुथ्वी खुप सुंदर,अदभूतआणी कलरफुल दिसते ते अलौकिक सौंदर्य शब्दात वर्णन करता न येणार! मला शक्य असत तर नक्कीच मी तुम्हाला ईथे आणुन ते दाखवल असत पण भविष्यात शास्त्रज्ञ ते शक्यही करून दाखवतील आणी सुदैवाने,योगायोगाने Anne च्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान नासा संस्थेने कमर्शियल स्पेस flight ची घोषणा केली आहे सद्या हि संधी फक्त शास्त्रज्ञ,सिनेनिर्माते ह्यांच्या साठी असली तरीही भविष्यात सामान्य हौशी नागरिकही अंतराळ प्रवास करू शकतील ह्यात शंका नाही

Sunday 23 June 2019

Anne McClain तिच्या दोन सहकारी अंतराळवीरांसोबत उद्या पृथ्वीवर परतणार


Expedition 58/59 crew members gather inside the Zvezda service module for a crew portrait.
Anne McClain अंतराळवीर Oleg Kononenko आणि David Saint स्थानकातील Zvezda Service Module मध्ये एकत्रित -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 58-59 ची flight engineer Anne McClain,flight engineer David Saint,रशियाचे अंतराळवीर आणि सोयूझ कमांडर Oleg Kononenko हे तिघेहीआता त्यांचा अंतराळस्थानकातील मुक्काम आटोपून उद्या  24 जूनला पृथ्वीवर परतणार आहेत सोमवारी दुपारी अंतराळस्थानकातून Soyuz MS -11 ह्या अंतराळ यानाने ते पृथ्वीच्या प्रवासास निघतील आणि तीन तासांच्या अंतराळप्रवासानंतर ते पृथ्वीवर पोहोचतील
त्यांचे सोयूझ MS -11 हे अंतराळयान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचेल हे तिन्ही अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर उतरतील
अंतराळ स्थानकातून निघण्याआधी स्थानकात कमांडर change ceremony पार पडेल तेव्हा सध्याचे कमांडर Oleg Kononenko स्थानकाच्या कमांडर पदाची जबाबदारी अंतराळवीर Alexey Ovchinin ह्यांच्या हाती सोपवतील त्या नंतर Farewell ceremony होईल आणि अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेतील

The six-member Expedition 59 crew gathers for a portrait
   निघण्याआधी शेवटच्या आठवठ्यात स्थानकात एकत्रित जमलेले अंतराळवीर -फोटो नासा संस्था

(Anne McClainने  हा फोटो काढ़तानाचा अनुभव ट्विटर वरून शेअर केलाय ती म्हणते," हा फोटो घेण्यासाठी आम्हाला कितीतरीवेळा takes,retakes घ्यावे लागले तेव्हा कोठे आमच्या प्रत्येकात 60deg चा कोन तयार झाला आणि हवी तशी पोज मिळाली!" )

पृथ्वीवर पोहोचल्यानंतर Helicopter ने ह्या तीनही अंतराळवीरांना कझाकस्थानातील Karaganda येथील
 recovery staging area मध्ये नेण्यात येईल तिथे त्यांचे शारीरिक चेकअप होईल
त्यानंतर Anne McClain आणि David Saint हे दोघे नासाच्या विमानाने Houston येथे जातील आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko हे दुसऱ्या विमानाने त्यांच्या रशियातील Star City मधील त्यांच्या घरी पोहोचतील
 कमांडर Ovchinin ,अंतराळवीर Nick Hague आणि Christina Koch हे आता अंतराळस्थानकाची जबाबदारी सांभाळतील आणि त्यांचे संशोधन सुरु ठेवतील
वीस जुलैला नासाचे आणखी तीन अंतराळवीर Andrew Morgan,Alexandar Skvortsov आणि luca Parmintano स्थानकात राहण्यासाठी जातील
ह्या तिन्ही अंतराळवीरांच्या पृथ्वीवरील लँडिंग,अंतराळ प्रवास आणि स्थानकातील अंतिम क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा टी वी वरून करण्यात येणार आहे

Saturday 15 June 2019

Curiosity मंगळयानाने शोधली मंगळावरील चिकणमाती



NASA's Curiosity Mars rover took this selfie on May 12, 2019
 मंगळावर कार्यरत Curiosity Mars Rover चिकणमातीयुक्त भागातील उत्खननादरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -
नासाने 2012 साली मंगळावर पाठवलेल्या Curiosity मंगळ यानाला मंगळावरील चिकणमातीयुक्त भाग सापडला आहे
मंगळावरील भूपृष्ठाच्या सुरु असलेल्या खोदकामादरम्यान Clay bearing unit ह्या भागात नावाप्रमाणेच भरपूर प्रमाणात चिकणमाती सापडली आहे आतापर्यंतच्या खोदकामात सापडलेल्या खडकाळ भागापेक्षाही हा भाग भरपूर मोठा असून तिथे चिकणमातीचे भांडारच सापडले आहे
Curiosity मंगळयान मंगळ ग्रहावरील Aberlady आणि Kilmarie ह्या दोन भागातील पर्वत रांगांच्या खालील भागात रोबोटिक आर्मच्या साहाय्याने उत्खनन करत असताना चिकणमातीचे हे भांडार सापडले मंगळयानाने पृथ्वीवर पाठवलेल्या सेल्फीमुळे शास्त्रज्ञांना हा भाग दिसला Curiosity यानाने ह्या भागातील मातीच्या नमुन्यांचे फोटो पृथ्वी वर पाठवले आहेत
2012 साली मंगळावर गेलेल्या Curiosity मंगळयानाच्या मंगळावरील दिनगणनेनुसार 2405व्या दिवशी हा शोध लागला नासाच्या अंतराळ एजन्सीतील शास्त्रज्ञांच्या मते हा भाग पर्वतरांगातील खालील भागात आहे
गेल्या सात वर्षांपासून Curiosity मंगळ ग्रहावर अब्जावधी वर्षांपूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात होती का? तिथे पाणी आणि सजीवांना जिवंत राहण्यासाठी योग्य वातावरण होते का? सजीव सृष्टी असल्यास ती कशी होती ह्याचे अवशेष रूपातील पुरावे संशोधित करत आहे त्यासाठी भूपृष्ठाखाली उत्खनन करण्यात येत आहे आणि आतापर्यंत केलेल्या संशोधनात मंगळावर डोंगरदऱ्या,त्यातील आटलेले पाण्याचे स्रोत,नदीचा प्रवाह बर्फाच्या स्वरूपातील सूक्ष्म गोठलेल्या पाण्याचे अस्तित्व आढळले आहे
आणि आता तिथे चिकणमातीचे भांडारच सापडल्याने मंगळावर सजीवसृष्टी अस्तित्वात होती ह्याला आणखी सबळ पुरावा सापडला आहे कारण चिकणमाती तयार होण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते
नदी,नाले दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून येणारा गाळ,पाणी आणि माती ह्यांच्या मिश्रणातून चिकणमाती तयार होते आणि पाणी जीवनासाठी आवश्यक आहे आणि ह्याच चिकणमातीच्या थरावर थर साचून डोंगर तयार झाले असावेत
 Curiosity च्या CheMin (Chemistry &Mineralogy ) ह्या अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने हा शोध घेण्यात आला ह्या शिवाय ह्या उत्खननादरम्यान Hematite हे मिनरलही सापडले आहे ते अत्यंत कमी प्रमाणात सापडले असले तरी ह्या आधी केलेल्या मंगळावरील उत्तरेकडील Vera Rubin Ridge ह्या भागातील  उत्खननादरम्यान मात्र हे मिनरल आणि Iron Oxide जास्त प्रमाणात सापडले आहे ह्या आधी Gale Crater ह्या भागात पुरेशा प्रमाणात पाण्याचे अस्तित्वही असल्याचे पुरावे सापडले होते आता त्यावर संशोधन सुरु आहे