16 जानेवारी 1978 साली निवड झालेल्या पहिल्या सहा महिला Astronauts फोटो -नासा संस्था
डावीकडून उभ्या -Kathryn Sullivan,Shannon W Lucid,Anna Fischer,Judith Resnik
खाली बसलेल्या -Saily K Ride आणि M Rhea Seddon
नासा संस्था -17 जानेवारी
नासाच्या अंतराळमहिमेतील महिलांच्या प्रवेशाला सोळा जानेवारीला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्या आधी नासा संस्थेत अंतराळ मोहिमेसाठी महिलांना संधी दिल्या गेली नव्हती सोळा जानेवारी 1978 साली नासाची APOLLO मोहीम संपण्यात आली आणि नासा संस्थेने त्याच वेळेस अंतराळ वीरांच्या मोहिमेत महत्वपूर्ण बदलाचा निर्णय घेतला होता ह्या नवीन पर्वातील मोहिमेत नासा संस्थेने अंतराळवीरांच्या निवडीतही बदल करण्याचे ठरवले
ह्या नव्या पर्वातील पहिल्याच अंतराळ मोहिमेत नासाने Space Shuttle चा उपयोग करण्याचे ठरविले त्या मुळे सहा Mission Specialist , Pilot आणि Commander ह्यांना अंतराळात पाठवणे शक्य झाले ह्याचवेळी पहिल्यांदाच महिलांनाही संधी देण्याचे ठरले तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिक ,इंजिनीअर्स ह्यांनाही ह्या अंतराळ मोहिमेत सहभागी करण्यात आले आणि भिन्न वंशीय आफ्रिकन अशियन अमेरिकनांनाही संधी देण्यात आली
ह्या आधीच्या नऊ वर्षातील मोहिमेत निवड झालेल्या अंतराळवीरांची टीम वेगळी होती त्यात फक्त अनुभवी मिलिटरी जेट पायलट आणि अंतराळ शास्त्रज्ञांनाच प्राधान्य देण्यात आले होते
आताची रेकॉर्डब्रेकर अंतराळवीरांगना Peggy Whitson ने नासाच्या ह्या अंतराळ मोहिमेतील बदलाच्या वेळेस नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केले होते आणि Iowa Wesleyan College मध्ये Bsc Chemistry आणि Biology साठी प्रवेश घेतला होता त्यांना ह्या नव्या बदलांचा फायदा मिळाला सगळ्यात जास्त काळ अंतराळात राहून जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचे रेकॉर्डब्रेक यश चाळीस वर्षांपूर्वीच्या ह्या बदलामुळेच शक्य झाले हे सारे श्रेय नासा संस्थेचे आहे असे Peggy Whitson म्हणतात
तेव्हा अंतराळ मोहिमेतील महिलांची संख्या अवघी दहा टक्के होती आणि चाळीस वर्षांनी आता ती चौतीस टक्क्यांपर्यंत आलीय 2013 मध्ये अंतराळवीरांच्या टीम मध्ये महिला व पुरुष अंतराळवीरांची संख्या समान होती नासा संस्थेत आता आफ्रिकन,अमेरिकन , Pacific Islander ,Hispanic ह्यांची एकूण संख्या चोवीस टक्के आहे ह्या वैविध्याचा नासा संस्थेला अभिमान वाटतो आणि ह्या पुढेही ह्या भिन्नवंशीय लोकांना नासा संधी देईल ह्या साऱयांनी वेगवेगळ्या देशातून नसांमध्ये सहभागी होऊन अभिमानास्पद यश मिळवले आणि नासाच्या यशात भर टाकली आहे असे नासाचे अधिकारी म्हणतात
नुकतेच नासा संस्थेने प्रगतीचे आणखी एक पाऊल पुढे टाकत अमेरिकेतील Luciana Vega ह्या अकरा वर्षीय मुलीला नासा मोहिमेत सहभागी केले आहे नासाच्या Latest Doll ची अचूकता तपासण्यासाठी तिची मदत घेण्यात आली आतापर्यंतच्या अंतराळवीरापेक्षा ती वयाने सर्वात लहान आहे कदाचित ती पुढे मंगळ मोहिमेत सहभागी होऊन विक्रमही नोंदवेल असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात