Peggy Whitson आणि Shane Kimbrough लाईव्ह संवाद साधताना
नासा संस्था -17 मार्च
अमेरिकेतील Virginia येथील विद्यार्थ्यांनी नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Peggy Whitson आणि Shane Kimbrough ह्यांच्याशी 17 मार्चला लाईव्ह संवाद साधला Clay Center for Arts & Science Charleston आणि U.S.Sen Joe Manchin (West Virginia ) ह्यांच्या संयुक्त विध्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
तेव्हा Shane Kimbrough आणि Peggy Whitson ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली
विध्यार्थी - अंतराळस्थानकातून पृथ्वीवरच्या वातावरणात परतल्यानंतर अंतराळवीरांची प्रकृती पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी किती दिवस लागतात ?
Peggy - अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मुळे अंतराळवीरांना बरयाच समस्या येतात तिथे बरयाचशा हालचाली आपोआपच होतात त्या मुळे काही स्नायु वापरलेच जात नाहीत म्हणुन अंतराळवीर स्थानकात असलेल्या ट्रेडमील वर रोज दोन तास व्यायाम करतात पृथ्वीवर परतल्यानंतर इथल्या वातावरणाशी adjust व्हायला जवळपास 45 दिवस लागतात
विध्यार्थी - अंतराळ स्थानकातील बदलत्या उजेड आणि अंधाराच्या वेळेमुळे अंतराळवीरांच्या झोपेवर काय परिणाम होतो ?
Peggy - अंतराळ स्थानकातील crew quarter मध्ये पृथीवरून पाठवलेल्या नवीन lighting system चा वापर केल्या जातो पृथ्वीवर नाईट शिफ्ट मध्ये काम करणारे कर्मचारी किंवा ज्यांना निद्रानाश आहे अशा लोकांसाठी ह्या सिस्टमचा वापर केल्या जातो ह्या सिस्टमचा वापर करून अंतराळवीर हवा तेव्हा उजेड आणि हवा तेव्हा अंधार करून त्यांची झोप adjust करतात
विध्यार्थी -ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱया तरुणींना तुम्ही काय सल्ला द्याल त्या साठी काय करावं लागत ?
Peggy - तरुणींनी अवश्य इथे याव हे क्षेत्र आव्हानात्मक आहे त्या साठी आवश्यक ती डिग्री मिळवून त्या साठी आवश्यक तो संघर्ष करून त्यांनी आपल द्येय साध्य जरूर कराव
विध्यार्थी -तुमचे Scientific आणि पर्सनल द्येय काय आहे
Peggy - सध्या अंतराळ स्थानकात तीनशेच्या वर सायंटिफिक विषयांवर संशोधन सुरु आहेत त्या मुळेच इथे असेपर्यंत जास्तीतजास्त वेळ मला संशोधन पूर्ण करण्यासाठी द्यायचाय आणि पर्सनली म्हणाल तर मी ह्या पेक्षा वेगळा जॉब केला नाही त्या मुळे हेच काम मला आवडीने करायचेय इथे सुरु असलेले संशोधन नासाच्या शास्त्रज्ञांनी निवडलेल्या व संशोधित केलेल्या प्रयोगांवरच केल जात अंतराळवीर स्थानकात सखोल संशोधन करतात
विध्यार्थी - खाजगी स्पेस क्राफ्ट मुळे काय फायदा झाला ?
Peggy -नक्कीच खूप फायदा होतोय! स्पेस क्राफ्ट मुळे अंतराळ स्थानकात अंतराळवीरांना संशोधनासाठी लागणार सामान त्यांना तिथे निवासासाठी लागणार सामान आणि अंतराळस्थानकासाठी लागणार सामानही पृथ्वीवरून स्थानकात पोहोचत इथे सतत कार्गो स्पेस क्राफ्टची ये जा सुरु असते भविष्यात अस एखाद स्पेस क्राफ्ट मला चालवायला मिळालं तर नक्कीच आवडेल
विध्यार्थी -अंतराळ स्थानकात आग लागली तर काय करतात ?
Peggy- आधी तर असा आगीचा प्रसंग ओढवला तर सर्वजण स्वत: आगीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात त्या साठी आवश्यक तो मास्क घालतात इमर्जन्सी व्हेइकलचा वापर करतात पॉवर बंद करतात आणि आग विझवण्यासाठी आग विझवणारी उपकरण वापरतात कधी जर लॅपटॉप किंवा इतर उपकरणातील बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली तर Mist Fire Extingujisher चा वापर करतात
विध्यार्थी - पृथ्वीवरील कोणती गोष्ट( Shane) मिस करतात ? अंतराळ स्थानकातील त्यांचं सगळ्यात जास्त आवडणार काम कोणत ?
Shane - फॅमिली आणि फ्रेंड्स ह्यांना सगळ्यात जास्त मिस करतोय आणि अर्थातच जेवण, पण ते तितकस महत्वाच नाहीय !
अंतराळ स्थानकात सुरु असलेले वैज्ञानिक व रोबोटिक प्रयोग करायला आवडत जेव्हा स्पेस क्राफ्ट अंतराळात पोहोचत तेव्हा ते रोबोटिक आर्मने स्थानकाला जोडाव लागत ते काम आवडत आणि स्पेस walk करायलाही आवडत आता लवकरच ते स्पेस walk करणार आहेत
शेवटी अमेरिकेचे सिनेटर Joe Manchin ह्यांनी Shane Kimbrough व Peggy Whitson ह्या दोन्ही अंतराळवीरांचे विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधण्यासाठी वेळ दिल्या बद्दल आभार मानून ते पृथ्वीवर सुखरूप परत यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता केली