नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार नेदरलंड मधील "मार्स वन या संस्थेतर्फे मंगळावर मानव पाठविण्याची मोहीम आखण्यात आली असून तिथे जाण्यास उत्सुक असणारया नागरिकाचे अर्ज जगभरातून मागविण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून जगभरातून ५००च्या वर नागरिकांनी अर्ज भरून प्रतिसाद दिला विशेष म्हणजे अंतिम चाचणीनंतर निवड झालेल्या १०० नागरिकांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे त्यात दोन महिला व एक पुरुष आहे निवड झालेल्यात ५०पुरुष व ५०महिला असून सर्वात जास्त संख्या अमेरिकन नागरिकांची आहे त्या नंतर युरोप आशिया आफ्रिका आणि आशियाना मधील नागरिकांचा समावेश आहे
फोटो twitter वरून प्राप्त
सुरवातीला २०२४मध्ये चौघांना मंगळावर पाठवण्यात येणार असून त्यासाठी त्यांना ७वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार आहे मंगळावर मानव वस्ती करू शकेल का?ह्याचा प्रयोग ह्या मोहिमेद्वारे करण्यात येईल