Tuesday 27 January 2015

सोलापुरात साचले जागोजागी कचऱ्याचे ढीग


सध्या सोलापुरात कोठेही जा रस्त्यावर  कचरयांचे ढीग साचलेले दिसतात काही वर्षापूर्वी स्वच्छ व सुंदर असलेले सोलापूर आता जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे अस्वछ व असुंदर दिसत आहे इथल्या रहिवाशांनी कचरा उचलल्या जात नसल्यामुळे केलेल्या सतततच्या तक्रारीची दखल घेत मनापानी घंटागाडी च्या  contracter ला दंड ठोठवला त्या  मुळे घंटा गाडीवाल्यांनी कचरा उचलणे बंद केले आहे परिणामी रस्त्यावर कचरा साचला आहे त्या मुळे सर्वत्र दुर्गंधी व डासांचा त्रास  वाढला आहे तरी मनापानी ह्याची दखल घेउन त्वरित कचरा उचलावा  ७०-८०च्या दशकात सोलापुरात नियमित कचरा तर उचलल्या जात होताच शिवाय रस्ता झाडण्यासाठी बायका येत आणि रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड केल्या जात होता
 आताही तसेच करावे व कचरा उचलण्यासाठी नियमित गाडयांची व ट्रकची व्यवस्था करावी व कचरा उचलावा अशी नागरिकांची मागणी आहे

 
अखेर नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल 
  नागरिकांच्या तक्रारीची दाखल घेत उचलला जाणारा कचरा .(4 th Feb)
फोटो सौजन्य -सुप्रीत रायचुरकर -सोलापूर 
फोटो सौजन्य -सुप्रीत रायचुरकर -सोलापूर 




















Friday 9 January 2015

यवतमाळ बंदला संमिश्र प्रतिसाद

यवतमाळ येथे गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेत होत असलेल्या पक्षपाता मुळे  व अतिक्रमणामुळे ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांना पर्यायी जागा मिळावी ह्या मागणीसाठी गुरवारी दि. ८ जानेवारीला बंद पुकारण्यात आला होता सुरवातीला सुरु असलेली काही दुकाने नेताजी चौकात एका बसवर दगडफेक झाल्यामुळे बंद करण्यात आली बंदमुळे पोलिस यंत्रणा शहर सुरक्षेत व्यस्त असल्याने एक दिवसापुरती अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले  दुपार नंतर काही व्यावसायीकांनी दुकाने उघडली रस्त्यावरची भाजीवाल्यांची दुकानेही संद्याकाळी उघडी होती
येथील जिनाच्या गणपती मंदिरात" तिळी चतुर्थी"  (तिलकुंद चतुर्थी) असल्याने  भाविकांनी गर्दी केली होती खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली होती
अतिक्रमण हटाव मोहीम नेहमीचीच 
यवतमाळ येथे नेहमीच अतिक्रमण मोहीम राबविण्यात येते पण पुन्हा थोड्याच दिवसात" जैसे थे" परिस्थिती निर्माण होते आणि लाखो रुपये खर्चून केलेल्या अतिक्रमण मोहिमेला अर्थ उरत नाही अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात यवतमाळ येथील दत्त चौकातील भाजीवाल्यांचे अतिक्रमण व दुकाने मागे हटवण्यात आली होती भाजी वाल्यांसाठी व्यापारी संकुलात तळमजल्यावर व बाजूला जागाही उपलब्ध करून देण्यात आली पण तरीही भाजीवाले यवतमाळ येथील सर्वच प्रमुख रस्त्यावर गाडया उभ्या करतात कारण त्यांच्या म्हणण्या नुसार त्यांना दुकानाचे रोजचे भाडे देणे परवडत नाही शिवाय रस्त्यावरून जाणारया नागरिकांना ताजी भाजी दिसताच ते ती विकत घेतात व आमचा धंदा होतो
दुसरीकडे आजुबाजूच्या व्यावसायीकांना ,तिथून येणारया जाण्यारया  नागरिकांना व वाहनांना ह्या भाजीवाल्यांचा त्रास होतो शिवाय एकदा हटवलेली दुकाने पुन्हा थाटली जातात मग ह्या मोहिमेला काय अर्थ उरतो? दत्त चौकात भाजी व फळ विक्रेते रोज आपली गाडी उभी करतात थोडया वेळाने पोलिस येतात आणि भाजीवाल्यांना हाकलतात पण पोलिस जाताच पुन्हा भाजीवाले आपल्या गाडया तिथेच उभ्या करतात हे चित्र दत्त चौकात नागरिकांना नेहमीच दिसते एकदा अतिक्रमण हटवल्या नंतर पुन्हा तेथे पक्के बांधकाम कसे होते हा प्रश्न नागरिकांना नेहमीच पडतो शिवाय अतिक्रमण हटवताना भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक ध्यावी  अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत