Friday 28 November 2014
यवतमाळ येथील डुमणापूर मंदिरात बायकांना गाभारयात प्रवेश बंद
यवतमाळ येथील डूमणापूर येथे मारुतीचे पुरातन मंदिर आहे गावापासून दूर व बाग बागीच्यामुळे हे मंदिर पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे इतके दिवस बायकांना मारुतीच्या दर्शनासाठी मूर्तीपुढे जाऊन नमस्कार करता येत होता पण आता मात्र मारुतीच्या मंदिरात बायकांना गाभारयात अर्थात बाहेरूनच दर्शन घेण्यास बंदी केली असून तसा बोर्डच लागलेला तिथले पुजारी दाखवतात बायकांना नमस्कार घ्यायचा असेल तर समोरच्या ओटयावर चढून घ्यावे लागते भाजप सरकार सत्तेवर येताच एकीकडे पंतप्रधान नरेंद्रमोदी सर्व देशांना भेटी देऊन देश प्रगतीपथावर नेत आहेत , भारताने यशस्वी मंगळ मोहीम राबवुन मंगळयानाने तिथले फोटो पाठवुन प्रत्यक्ष कामाला सुरवात केलेली असताना आणि विशेष म्हणजे भारतीय वंशाच्याच कल्पना चावला व सुनिता विल्यम्स ह्या दोघींनी अंतराळात प्रवेश करूनही अजूनही यवतमाळ येथे स्त्री,पुरुष भेदभाव केल्या जातोय.
Saturday 8 November 2014
दिवाळी मालिकेतली
यंदा निवडणूक निकालामुळे उशिराने पण दिवाळी नेहमीच्याच उत्साहात ,दिव्यांच्या प्रकाशात तेजाळली, झेंडूच्या फुलान सजली .धनत्रयोदशी लक्ष्मीपूजनान पवित्र झालेल्या वातावरणात ,नरकचतुर्दशीच्या सुगंधीत उटण्याच्या पहाट स्नानान वातावरणात प्रसंन्नता आणत दिवाळी पाडवा,भाऊबीजे पर्यंत सर्वत्र साजरी झाली. प्रदूषणकारी फटाके विरहीत दिवाळी साजरी करण्याचा कलावंतानी दिलेला संदेश झुगारत हजारो रुपयाचे मोठ्या आवाजाचे फटाके उडवल्या गेले आणि त्यांच्या आतषबाजीत सारी गाव,शहर न्हाऊन निघाली.
घराघरातून टी वि. प्रेक्षकांना फराळा सोबतच मालिकेतील कलावंतांची पडद्यावरची व पडद्यामागची दिवाळी पाहायला मिळाली.काही कलावंतांना शुटींग मुळे घरी जाता न आल्याने सेटवरच दिवाळी साजरी करावी लागली कलाकारांच्या मुलाखती ,आठवणी आणि विनोदी मालिकेमुळे प्रेक्षकांची दिवाळी मनोरंजनात्मक झाली.
प्रेक्षकांना ह्या दिवाळीची सुंदर भेट " रेखाच्या मुलाखतीची" मिळाली रेखान तिच्या आयुष्यातील आजवर न सांगितलेले सुरेख क्षण प्रेक्षकांपुढे उलगडले रेखा एकांत प्रिय आहे तिला शांतता आवडते ती आपल्या सौंदर्याची आरोग्याची विशेष काळजी घेते व्यायाम,आहारावर नियंत्रण ठेवते एकांतात विचार करताना आपल्या आंतरमनाचा आवाज ऐकते त्यालाच ती देवाचा आवाज मानते सिनेमात काम करण तिला आपल्या श्वासा इतक महत्वाच वाटत तिला खुबसुरतच्या रिमेक मधला सोनमचा अभिनय आवडला.रेखा म्हणते आजची तरुण पिढी talented,अपडेटेड आहे मग तो सिनेकलावंत असो की पत्रकार त्यांना सार माहित असत त्यांना पैसे प्रसिद्धी मिळवण जमत कारण आज टी वि.मोबाइल ,इंटरनेट मुळे ते जगात कोठेही पोहोचु शकतात पण पूर्वी तस नव्हत काम मिळण ,भूमिका साकारण्या आधी त्याचा अभ्यास करण ,माहिती मिळवण नृत्य शिकण सारच खूप कठीण होत विशेषत: उमरावजानच्या वेळेस.जवळपास तासभर रंगलेली हि मुलाखत रसिकांना रिझवून गेली.
त्या नंतर बाजी मारली ती" झी" वाहिनीवरील "चला हवा येऊ द्या" ह्या विनोदी मालिकेन निलेश साबळेच्या सुरेख सूत्र संचालनान नटलेल्या आणि भाऊ कदम,सागर कारंडे ,कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे ह्यांच्या विनोदी अभिनयात सादर झालेल्या धमाल विनोदी कार्यक्रमान प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळवून दिली झी वरच्या" होणार सून मी ह्या घरची" ,"जावई विकत घेणे आहे" ,"जुळून येती रेशीम गाठी ", "अस्मिता "आणि "कारे दुरावा" ह्या मालिकेतील सासवा, सुना ,नायक नायिका व इतर कलावंतांनी "दिवाळी विशेष "भागात हजेरी लावली आणि धमाल उडवून दिली "रोहिणी हट्टंगडीना" विचारलेल्या एका मिश्किल प्रश्नाचा धागा पकडत तेव्हढ्याच मिश्किलीने उत्तर देत त्या म्हणाल्या कि मी तरुणपणी म्हातारी होते आता म्हातारपणी तरुण होतेय .,"उषा नाडकर्णींनी" सांगितलं कि लोक त्यांच्या सासुगीरी मुळे त्यांच्याशी बोलायला घाबरतात पण प्रत्यक्षात मात्र त्या खडूस नाहीत त्यांनीही त्यांच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना बालपणीच्या उनाड आठवणी जागवत कार्यक्रमात रंगत आणली व सारयांना भरपूर हसवलं तर "चला हवा येऊ द्या" च्या नाटिकेतील" नाठाळ सुनेला" वटणीवर कस आणायचं हे त्यातल्या साध्या भोळ्या सासूला शिकवताना धमाल उडवून दिली त्यांच्या स्टेज नृत्याबद्दल सांगताना त्यांनी ४ थ्या वर्षानंतर एकदम ६४ व्या वर्षी स्टेज वर डान्स केल्याच सांगितलं " लीना भागवत" ह्यांनी बरयाच विनोदी मालिकेत काम केल्याने त्यांना सहजतेन विनोद करता येतो हे " होणार सून मी ह्या घरची" मधून पाहतोच आहोत त्यांनी आणि " सुकन्या कुलकर्णींनी" आपल्या आयुष्यातील खरया नवऱ्याच्या गमतीदार गमतीजमती सांगत लोकांना हसवत ठेवलं " तेजश्री व शशांक केतकर" ह्यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या तेव्हा प्रत्यक्षात जानव्ही खूप बोलघेवडी आणि बोल्ड आहे तर शशांक मितभाषी असल्याच सांगितलं "सविता प्रभूणेन" प्रत्यक्षातला "राया" साधा दिसतो पण खोडकर आहे अस सांगितलं " रमेश भाटकर " ह्यांनी कविता वाचून दाखवली तर " वर्षा उसगावकर" हिनही दिवाळीची आठवण सांगत नृत्य सदर केल.
सर्वात धमाल "विनोदी वार्तापत्र व गावाकडच्या दिवाळीचा" विनोदी कार्यक्रम पाहताना आली "जुळुन येती रेशीमगाठी" तल्या" सुकन्याला "भरत गणेशपुरे' ह्यांनी जरा सुनेशी सासुसारख वागा कारण तमाम सासुवर्ग तुमच्यावर नाराज असल्याच सांगत "का रे दुरावातल्या" सासऱ्याला छळ करताना उपाशी ठेऊन ,पाणी भरताना,पायरया चढायला लावताना त्यांना व्यायाम होतो व पैसे न देता काटकसरीचा धडा मिळतो अशी कोपर खळी मारत गावातल्यांच्या वतीन बक्षीस देऊ केल तर सागर कारंडेन रोहिणी हट्टंगडीना तुमच्या कडे खूप सासवा आहेत त्यात माझ्याही सासूला ठेऊन घ्या ती मला खूप छळते म्हणत सारयांना हसवत ठेवलं ह्या हसवणुकीत भर टाकत जानव्हीला, "तुला आई आठवते,बाबा आठवतात ,पिंट्या आठवतो ऑफिस आठवत ,बॉसही आठवतात मग श्री अन सासरच कस विसरल ? " आता खूप दिवस झालेत तुला आठवत नाही म्हणून मी एक औषध देतो ते सासरच्यांना दे म्हणजे सासरचेही पूर्वीच विसरतील अस सांगत प्रेक्षकांना मनमुराद हसवलं तर प्राजक्ता माळी च्या लकबीची नक्कल करत ती बदलण्याचा दिलेला सल्ला ती पुणेकर आहे हे कळताच त्या लकबीच कौतुक केल . अस्मितातल्या मयुरी वाघला कोड्यात टाकणारी उत्तरे विचारून पेचात टाकल थोडक्यात "चला हवा येऊ द्या" चा धमाल विनोदी " हास्य दिवाळी' विशेष प्रेक्षकांना सलग तासभर हसवत ठेवत त्यांची मनमुराद , भरभरून दाद मिळवून गेला पण ह्या कार्यक्रमातील भाउ कदम ,सागर कारंडे ,कुशल बद्रिके ,भरत गणेशपुरे ह्यांना हसवण्याची अंगभूत कला अवगत असताना स्रीवेष धारण करून बाष्कळ विनोद करण्याची गरज का भासावी? बालगंधर्वांनी स्री वेष धारण करून भूमिका केल्या कारण त्या काळात स्रीया नाटकात काम करत नसत आता स्री कलावंतांची वानवा नाही लठ्ठपणा ,स्रीवेश ,बाष्कळ विनोदाशिवाय निखळ विनोदी मालिका होऊ शकते "चला हवा येऊ द्या" ची थीम चांगली असूनही ह्या कलावंतांना स्री वेषात पाहण प्रेक्षकांना आवडत नाही कलर्स वाहिनीवरील कपिल शर्माच्या COMEDY NIGHTS मध्येही असगर अलीला सतत स्री वेषात दाखवलं जात हे टाळायला हव.
सीमा रमेश देव ह्या जोडीची मुलाखतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली पडद्यावरच्या साधी माणस सारखीच ह्या जोडीतले नवराबायकोचे साधेपण ,त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीतल्या आठवणी भाजी बाजारातील सीमा देव ह्यांचे चाहते व त्यांचा संघर्ष ऐकताना त्यांना सहजासहजी यश मिळाल नाही हे जाणवलं.

Wednesday 5 November 2014
सोने स्थीर चांदी स्वस्त
सद्या सोने चांदीच्या दरात चढ उतार होत असून सोने २६ हजाराच्या आसपास स्थिरावले आहे आतंरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे भाव उतरल्याने व सेन्सेक्सच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून सोन्याचा दर २६०००च्याही खाली आला आहे सेन्सेक्सचे दर २८०००पर्यंत गेल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत बरयाच वर्षानंतर सेन्सेक्सने २८०००पर्यंत उसळी मारल्यामुळे शेअर बाजारात आंनदाचे वातावरण आहे त्या मुळे सोन्यात पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांना जाणकार सोने विक्रीचा सल्ला देत आहेत आणि त्या मुळेही सोन्याचे दर उतरत आहेत शिवाय आतंराष्ट्रीय बाजरात सोन्याची विक्री होत असून त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून सोन्याचे दर कमी होत आहेत.
कच्या तेलाचे दर गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच इतक्या खाली आल्याचे जाणकार सांगतात कच्या तेलाचे दर आणखी कमी झाल्यास व रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत स्थिर राहिला तर सोन्याचे भाव डिसेंबर अखेरीस २४००० पर्यंत खाली येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
सोन्यापाठोपाठ चांदीही स्वस्त

चांदीचे दरही सोन्या पाठोपाठ कमी होत असून दिवाळीच्या दिवसात ४०-४१ हजारावर असलेले चांदीचे दर दिवाळी संपताच गेल्या दोन दिवसापासून ३९ ते ४० हजार पर्यंत उतरले आहेत तर आज चांदी ३५०००रु. पर्यंत उतरली असून चांदीचे दरही कमी होत आहेत चांदी अजूनही स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
Subscribe to:
Posts (Atom)