Friday 23 May 2014

यवतमाळ येथे अजूनही पाणी टंचाई


                    सध्या यवतमाळ येथे पाणी टंचाईने जनता विशेषत: महिलावर्ग त्रस्त झाली आहे येथे गेल्या अनेक वर्षापासून एकदिवसाआढ पाणी सोडल्या जाते यावतमाळची जनता सहनशील असल्याने भरपूर प्रमाणात पाऊस पडूनही दररोज पाणी सोडल्या गेले नाही  सध्या विदर्भात उन्हाची तीव्रता वाढलीय त्यात पाणी प्रश्नही पेटलाय काही भागातील महिलांनी तर पाणी पुरवठा विभागात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी वेळेवर व व्यवस्थित सोडले नाही तर तुम्हालाच आता पाणी पाजावे लागेल असा दमही भरला पण तरीही कधी पाइप लाइन फुटल्यामुळे ,कधी भारनियमामुळे टाकीत पाणी भरल्या न गेल्याने तर कधी व्हाल्व बिघडल्यामुळे पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात विशेष म्हणजे ह्या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडला पुरामुळे घरे,दुकाने शेतीच अतोनात नुकसान झाले धरणाची दारे उघडावी लागली त्या मुळे धरणात यवतमाळ करांना वर्षभर पुरेल इतका पाणी साठा होता ,अजूनही आहे कारण ह्या वर्षी मधून अधून सतत पावसाने हजेरी लावली नुकत्याच झालेल्या गारपिटीने तर हाहाकार माजवत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले पण पाणीसाठ्यात वाढ झाली तरीही पाणी टंचाई का?
                         तीस वर्षा पूर्वी यवतमाळात पाण्याचा सुकाळ होता दररोज भरपूर पाणी सोडल्या जायचे पाणी थोडेसेच भरले की पुरायचे पाणी जास्त दाबाने येत असल्याने वरच्या मजल्या वरही पाणी यायचे त्या मुळे टिल्लू पंप वापरात नव्हते दरम्यान अरुणावती प्रकल्प व इतर धरणे झाली पण लोकसंखेच्या तुलनेत पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले नाही पुरेशा पाणी टाक्या बांधल्या गेल्या नाहीत मागच्या काही वर्षात यवतमाळात दुष्काळही  पडला तरीही पाणी प्रश्न व्यवस्थित हाताळला गेला नाही सध्या मोदी सरकारचे वारे वहात आहेत पण यवतमाळ कर म्हणतात आम्हाला विशेष फरक पडला नाही कारण गेली अनेक वर्ष भावना गवळीच सत्तेत आहेत 
                           आतातरी पाऊस सुरु होण्याआधी पाणी प्रश्न त्वरेने सोडवावा अशी जनतेची मागणी आहे सध्या पाणी उशिराने खूप कमी दाबाने एक दिवसाआड सोडल्या जातेय ते दररोज जास्त दाबाने सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे 

Saturday 10 May 2014

बाजारात हापूस दाखल पण चव मात्र आंबट

                                              यवतमाळ येथील बाजारात सध्या भरपूर प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले आहेत त्यात बेगनपल्ली,लालबाग,दशेरी, केसर नीलम,हापूस ह्या जातीच्या आंब्याचा समावेश आहे रसाचे गावरानी आंबे मात्र तुलनेने खूप कमी प्रमाणात मिळत आहेत कारण ह्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसा मुळे  व गारपिटीमुळे अनेक ठिकाणच्या आंब्याच्या झाडावरचा बहर गळून गेला.ज्यांच्या झाडावरचे आंबे राहिले त्यांनी आंब्याचा दर वाढवला असून ते ८० ते १०० रुपये किलो ह्या भावाने विकल्या जात आहेत शिवाय आंबे विकत घेताना गोड चव असणारे आंबे{नमुना }घरी आणल्यावर मात्र आंबट व पातळ रसाचे निघतात .गेल्या चारपाच वर्षात तसेही गावरानी गोड चवीचे दाट रसाचे आंबे यवतमाळच्या बाजारातून मिळेनासेच झालेत ,हीच गोष्ट बाकीच्याही आंब्याच्या बाबतीत घडतेय त्या मुळे  ह्या वर्षी आंबे सर्रास आंबट निघत आहेत .
                                              हापूस आंब्यातही होतेय फसवणूक 
                           सध्या बाजारात हापूस आंबेही विक्रीसाठी आले असून त्यात कर्नाटक ,हैद्राबाद आणि कोकण येथून हापूस विक्रीसाठी आले असल्याचे विक्रेते सांगतात हे आंबेही सर्रास आंबट निघत असून नमुना दाखवतानाची चव कधी गोड तर कधी सपक ,कडवट लागते शिवाय त्याचा रस किंचित कडवट आंबट ,सपक असून हे आंबे खरोखरच हापूस आहेत का ? असा प्रश्न पडतो ह्या बाबतीत फळवाल्या कडे विचारणा केल्यावर ते म्हणतात कि बाजारात असेच आंबे मिळतात आम्ही तरी काय करणार . सध्या कृत्रिम रित्या आंबे पिकवल्या जात असल्याच्या बातम्या दूरदर्शन वरील वाहिन्या वरून दाखवल्या जात आहेत येथील आंब्यांची चव पाहता हे हापूस आंबे देखील calcium carbide ने पिकवल्या जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय ह्या आंब्यांचा भाव देखील खूप असून कर्नाटक हापूस १२०-१६० रुपये किलो तर कोकण हापूस ६००रुपये डझन प्रमाणे विकल्या जात असून ग्राहकांची फसवणूक होत आहे तरी संबंधितानी ह्या कडे लक्ष द्यावे आणि नागरिकांनी देखील आंबे विकत घेताना  नीट पाहून घ्यावेत.