सीमेवर घुसखोरी करणाऱया अतिरेक्यांशी लढताना शहिद झालेल्या वीरपुत्र भास्कर पांतोड ह्या जवानाची वीरपत्ञी म्हणून जगताना वाट्याला आलेलं एकाकीपणाच दु:ख मनात साठवून व मुलांच्या भवितव्याचा विचार करून सैनिक विध्यार्थिनी वसतिगृहात अधीक्षिका ह्या पदावर काम करणारया सुरेखा पांतोड म्हणजे एक स्वावलंबी कर्तुत्व.
अकोला जिल्ह्यातल्या मिर्झापूर येथील सुरेखा नवलकर याचं देवळी च्या भास्कर पांतोडशी लग्न झालंतेव्हा त्यांच्या लष्करातल्या नोकरीला सात वर्षे झाली होती त्यांनी लग्नाआधी आपल्या लष्करातल्या नोकरीची त्यांना कल्पना दिली होती तेव्हा वेगळ्या क्षेत्रातल्या देशसेवा करणारया ह्यातरुणाला घरच्या सारयांनी पसंत केल होत छोटयाश्या खेडयातून राजधानी सारख्या मोठया शहरात गावापासून दूर लष्करी वसाहतीमध्ये आल्या नंतरच नव जग त्यांना आकर्षून गेल पण जेमतेम दोन वर्ष होत नाहीत तोच त्यांच्या पतीची बदली डेहराडूनला झाली पुढे मुलगा लहान असल्यामुळे त्या सासरीच थांबल्या अन भास्कर पांतोडची बदली श्रीनगरला झालीमग मात्र सुरेखाताईनां तिकडे जाता आले नाही ते अगदी शेवटपर्यंत.सासरच कुटुंब मोठ होत कामात वेळ जाई पण मन मात्र पतीकडे धाव घेई.
त्यातून लग्नाआधी त्यांच्या पतीन तिथली परिस्थिती सांगितलेली सीमेवर ड्यूटी असताना जवानांना हिमवादळाला तोंड देत बर्फात कडेकपारीत शत्रूवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवताना घरदार,जेवणखाण ह्याची शुद्ध नसते कित्येकदा उपाशी रहाव लागत सतत बर्फात राहून हातापायांची त्वचा थंडीत गारठते,खराब होते तर कधी पायाखालचा बर्फ कधी खचेल अनजवान आत गाडले जातील ह्याचा नेम नसतो एखाद्या बेसावध क्षणी शत्रूची गोळी शरीराचा नेम कधी घेईल ह्याचा नेम नसतो हे सार आठवल कि मन बैचेन होई .
म्हणूनच मन रमवण्यासाठी त्यांनी पंचायत समिती मार्फत चालवल्या जाण्यारया बाल वाडीत शिक्षिका म्हणून नोकरी सुरु केली त्यासाठी त्या रोज वणीला जा ये करीत एक दीड वर्षानंतर त्यांची देवळीला बदली झाली दर वर्षी सुट्टीत जेव्हा त्यांचे पती घरी येत तेव्हा मिळालेल्या पगारातून साठवलेल्या पैशातून मुलांच्या शिक्षणासाठी अकोल्याला त्यांनी घर बांधायचं ठरवलं तस ते बांधलही वास्तूच्या वेळेस ते आले तेव्हा दूरदर्शनवर सैनिकांच्या जीवनातल्या अनिश्चीततेविषयी तिथल्या परस्थिती विषयी विचारल होत पण अशा वेळी ते हसून उगाचच सांगत कि आम्ही खूप मजेत आहोत तस घाबरण्यासारख काही नाही पण सुरेखाताईनां तिथली सत्य परिस्थिती त्यांना होणारा त्रास माहीत होता तेव्हाच अतिरेक्यांचा जोर वाढला होता दरम्यान भास्कर पांतोड यांचा लष्करी सेवेचा पंधरा वर्षांचा बॉंड संपत आलेला होता ते चौदावे वर्ष होते आता लवकरच लष्करा तर्फे दिल जाणार रोजगाराच प्रशिक्षण घेऊन घरी परतायचं अस त्यांनी ठरवलं होत दरम्यान त्यांना दुसरी मुलगी झाली तेव्हा ते तिला पहायला आले सुट्टी संपवून नोकरीवर रुजू होतानाची आठवण सांगताना सुरेखाताई सांगतात कि ,त्यांनीजाताना त्यांना व त्यांच्या मित्रांना देण्यासाठी करंज्या केल्या होत्या तेव्हा तू आधी मुलांना दे माझा विचार करू नकोस ह्या पुढे तुला मुलासाठीच सार करायचंय अस सांगितल तेव्हा त्यांना खूप खटकल अन खरच तस झाल हे सांगताना सुरेखाताईनां अश्रू आवरत नाहीत जावून जेमतेम पंधरा दिवसही होत नाहीत तोच जम्मू काश्मिरात ऑपरेशन विजय राबवतानाच्या मोहिमेत अतिरेक्यांशी लढताना ते धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूची तार सुट्टीमुळे चार पाच दिवसांनी पोहोचली त्या मुळे दिल्लीत त्यांच्या अंत्य संस्कारात कोणीही जाऊ शकले नाही ह्याची त्यांना खंत वाटते सुरवातीला कोणालाच हे खरे वाटत नव्हत पण जेव्हा लष्करी अधिकारी त्याचं सामान घेवून घरी आले तेव्हा मात्र वास्तवाची जाणीव झाली दुर्दैवाची गोष्ठ म्हणजे त्याचं व्यवस्थित पोहचल्याच पत्र देखील सार झाल्यावर येवून पोहोचल.
आता पर्यंत सुट्टीत गाठभेट व्हायची जवळ तान्ही मुलगी भरल्या कुटुंबात आलेलं एकटेपण जीवनाचा साथीदार अर्ध्यावर साथ सोडून गेलेला जीवन अंधारून गेलेलं ते दिवस खूप कठीण होते लष्करातून त्वरित मदत मिळाली जिथे जिथे त्यांच्या पतीच पोष्टिंग झाल होत त्या,त्या ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु झाला जिल्हा सैनिक कल्याण केंद्रातल्या अधिकारयानी पैशाची योग्य गुंतवणूक,आवश्यक पत्र व्यवहारासाठी मोलाची मदत केल्याची त्या आवर्जून सांगतात त्याच काळात त्यांना आपल्या पायावर उभ रहाव अस वाटू लागल सैनिक कल्याण केंद्रामार्फत नोकरी विषयक माहिती मिळाली आणि पुण्याच्या सैनिक कल्याण केंद्रामार्फत लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर नगरच्या सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात अधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली सुरवातीला आपल्यापेक्षा उच्चपदस्थ अधिकारयासोबत बोलताना भीती वाटे पण तिथल्या मुलांच्या वसतीगृहातले अधीक्षक व इतर सहकारयानी सांगितल की ,आपण सारे एकाच कुटुंबातले आहोत तेव्हा त्यांनी दिलेल्या धीरामुळे आत्मविश्वास वाढला पण मुलांना सासरी सोडून जाव लागल जीवनातल एकटेपण अन काहींची व्यंगात्मक टीका ह्या मुले नैराश्य यायच आपण कष्ट केले पाहिजेत हे जाणवायचं हळू हळू कामाची माहिती होत गेली धान्य स्वस्त दरात व चांगल कस खरेदी करायचं मुलींचे पैसे बँकेत जमा कसे करायचे हे त्या शिकल्या.
जवळपास चार वर्षाच्या नोकरी नंतर त्यांची बदली यवतमाळला झाली इथल्या सैनिक विध्यार्थिनी वस्ती गृहातल काम त्या सांभाळतात अपंग व शहीद जवानांच्या मुलींना प्राधान्य देवून उर्वरित जागा इतरांना दिल्या जातात त्यांना मात्र पैसे ध्यावे लागतात नुकताच २००२मध्ये त्यांना वीरपत्नी म्हणून शासनातर्फे ताम्रपट मिळालाय दरवर्षी १ ऑक्टोबरला होणारया रायझिंग डे ला त्यांना बोलवल्या जाते व सन्मानपत्र दिल्या जाते नुकतेच २३ ऑगस्ट ला त्यांचे दिवंगत पती शहीद जवान भास्कर पांतोड ह्यांच्या स्मरणार्थ& विदर्भ संधानिक विकास मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या बहूऊदेशिय सभागृहाचे देवळी येथे राष्ट्रवादी चे मंत्री आर आर पाटील ह्यांच्या हस्ते उद्घघाटन झाल(सद्या ते गृहमंत्री आहेत )
देशासाठी बलिदान देणारया शहीद जवानाची ही वीरपत्नी देखील जीवनाची लढाई तेवढ्याच धैर्याने लढतेय.