Tuesday 18 June 2013

भाजीचे भाव पावसामुळे कडाडले

              सततच्या पावसाने यवतमाळ येथे भाजी मार्केट मध्ये चिखल साचलेला होता तर पावसामुळे रस्ते बंद असल्याने बाजारात भाजी खूप कमी प्रमाणात विक्रीस आली आणि पावसाला उघाड मिळताच मार्केटमध्ये रविवारी भाजी घेण्याकरता लोकांनी गर्दी केली त्या मुळे आधीच कमी प्रमाणात आलेली भाजी संध्याकाळपर्यंत संपत आली होती भाजीचे भाव देखील खूप वाढलेले होते
              एरवी पाच ते दहा रुपये पाव किलौने मिळणारी भाजी वीस,ते तीस रुपये पाव किलौने विकल्या जात होती बाजारात कच्ची कैरी,व आंबे मात्र भरपूर प्रमाणात विक्रीला आले होते आंब्याचे भाव उतरलेले होते तर कच्या कैरयांचे भाव मात्र वाढलेले होते

Saturday 15 June 2013

यवतमाळ येथे सततधार पाऊस

               यवतमाळ येथे गेल्या चार पाच दिवसा पासून सतत धार पाऊस सुरु असून वातावरण ढगाळलेले आहे. उन्हाळ्यात उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना त्या मुळे दिलासा मिळाला असून शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहेत विशेष म्हणजे उन्हाळ्यात उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता मात्र सूर्य अभावानेच दर्शन देत आहे  ह्या उन्हाळ्यात पारा गेल्या साठ वर्षाचा रेकार्ड मोडत काही ठिकाणी ४८ . सेल्शिअस तर काही ठिकाणी त्याच्याही वर पोहोचला होता. त्या मुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती काही ठिकाणी तो लवकर बरसला पण यवतमाळ येथे तो उशिराने सुरु झाला सुरवातीला पावसाच्या तुरळक सारी बरसल्या पण गेल्या चार,पाच दिवसापासून पाऊस जो सुरु आहे तो काही थांबण्याचे नाव घेईना कधी रात्रीतून,तर कधी दिवसा मध्येच पाऊस मुसळधार कोसळत आहे.
                           
पाणी पुरवठा मात्र अजूनही दोन दिवसा आडच
                     ह्या आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी देखील पाणी पुरवठा मात्र अजूनही सुरळीत झाला नाही उन्ह्यळ्यात थेंब ,थेंब येणारे पाणी बरया पैकी फोर्सने येत असले तरीही ते दोन दिवसांनी आणि उशिराने येत आहे गेल्या दोन.चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाले दुथडी भरून वाहत आहेत अडान नदीलाही पूर आला असून बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे तर अप्पर पूस धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत
                    जुन महिन्याच्या पहिल्याच पावसाने आर्णी येथिल अरुणावती नदीला पूर आला असून आर्णी तालुक्याचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे त्या मुळे तुळजापूर यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प होती काही जणांच्या घरात व तळमजल्यावरील दुकानात पाणी शिरल्याने लोकांची दाणादाण उडाली त्या मुळे त्या लोकांनी शाळेमध्ये आश्रय घेतला.
                     दिग्रस मधेही सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यावर पाणी साचले आहे तर काही नवीन वस्त्यामधेहि पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांनातोंड द्यावे लागत आहे