Wednesday 27 February 2013

अशोक शिंदे ( प्रतिभावंत सिने अभिनेते )

                                                                                                    
अशोक शिंदे
        रेशीम गाठी ,पवळा,सासर माहेर ,अशी असावी सासू ह्या सारख्या अगणित सिनेमातून ,नाटकातून
आणि छोट्या पडद्यावरच्या कित्येक सिरीयल्स मधून विशेषत: बंदिनी ,घरकुल मुळे घराघरात परिचित झालेले सिने नाट्य  कलावंत अशोक शिंदे यांची भूमिका बरयाच वाहिन्यां वरून प्रसारित होणारया सिरियल मध्ये असतेच. मी मुक्त वार्ताहर म्हणून त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते गंधाली ह्या चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त होते त्या दिवशी ते दिवस भराचे शुटींग आटोपून रात्रीच्या मुक्कामाला पुण्याला आले होते व  लगेचच सकाळी परत चित्रीकरण स्थळी जाणार होते. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला विशेष म्हणजे त्यांच्या सोबत मोहन वाघ ,रमेश भाटकर वै. प्रभूती तिथे होत्या त्यांची गप्पांची मस्त मैफल रंगली होती तरी देखील त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून मिळालेल्या निवांत  क्षणातून  वेळ काढून मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानले व मुलाखतीला सुरवात केली
                              मुळचे सातारयाचे असलेले अशोक शिंदे यांचे कुटुंबीय नंतर पुण्यात स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शाळा कॉलेजातून नाटकातून कामेही केलेली त्या मुळे लहानपणीच अभिनयात कारकीर्द करायचं नक्की केलेलं असल तरी घरच्यांचा मात्र थोडासा विरोध होता कारण आधी शिक्षण पूर्ण कर मग काय ते कर अस त्याचं ठाम मत होत त्यांनीही त्या मताचा आदर ठेवत त्या काळात फक्त आभ्यासावर लक्ष केंद्रित करत आधी इंजिनीयरच शिक्षण पूर्ण केल ते बी.ई इलेक्ट्रानिक्स आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाटलं.
           नंतर मात्र त्यांनी मिळेल ती नाटक केली तेव्हा त्यांच्या सोबत मोहन जोशी होते आम्ही दोघे तेव्हा
पुण्यातली जवळ जवळ सगळी नाटकं करायचो काही वेळेस तर कमी पैशात सुद्धा नाटकं केली नंतर मुंबईत आलो.पेइंग गेस्ट म्हणून राहिलो अर्थातच खूप संघर्ष करावा लागलाच अस अशोक शिंदे सांगतात.
षड्यंत्र नाटकातील प्रसंग
            अशोक शिंदेना पहिला ब्रेक जयश्री गडकरींनी दिला खरेतर त्यांचा पहिला सिनेमा "पवळा" नावाचा होता त्यात मोहन जोशी ,श्वेता नगरकर ,बाळ धुरी वै. मडळी होती त्यात त्यांनी" पठ्ठे बापुरावा ची" भूमिका साकारली होती पण तो सिनेमा रिलीज झाला नाही मग त्यांनी " सासर माहेर हा सिनेमा केला पण
त्या आधी "रेशम गाठी" रिलीज झाला तसा पहिला ब्रेक त्यांना जयश्री गडकरींनी अशी" असावी सासू"मधून दिला.
                    लहानपणीचा स्टेजवरचा निरागस आनंद आणि संघर्षा नंतरचा सफलतेचा आनंद शब्दातीत होता अस ते आपल्या पहिल्या ब्रेक नंतरच्या अनुभवा बद्दल सांगतात नंतर सिनेमे मिळत गेले "वाहवा "होत गेली मग पुंन्हा त्यांना मागे वळून पहाव लागलच नाही.अजूनही त्यांची घोडदौड चालूच आहे.
          एकाच वेळी सिनेमा सिरियल्स ह्यात कामे करताना दोन्हीचा मेळ साधताना त्यांची तारांबळ उडते सकाळी सिनेमाच सुटिंग ,दुपारी सिरियल्स मग पुन्हा रात्री सिनेमा असा त्यांचा दिवसभरचा भरगच्च कार्यक्रम असतो सध्या टी वी वरच्या बऱ्याच चानल्स वरच्या सिरियल्स मध्ये ते कामे करताहेत.
त्यांच्या फिगर मेंटेनस बद्दल सांगताना त्यांनी सांगितलं , ते सकाळी सहसा जेवत नाहीत नुसती फळे खातात ज्यूस पीत नाहीत कारण त्यात शुगर असते रात्री एकदाच जेवतात शिवाय ते रोज सकाळी अर्धा तास रनिंग आणि अर्धा तास चालण्याचा व्यायाम करतात मग ते कोठेही असले तरी नियम मोडत नाहीत
               अभिनय करताना काही खास तयारी करावी लागते का अस विचारल्यावर ते म्हणतात आता अभिनय त्यांच्या अंगवळणी पडलाय वेळेवर स्क्रिप्ट हाती येते कधी एक तास आधी तर कधी अगदी वेळेवर पण लहानपणापासून काम केल्याने अडचण येत नाही.तुम्ही इंजिनियर आहात म्हणजे बुद्धिमान आहातच त्या मुळे संवाद लक्षात ठेवण सोप जात असेल शिवाय तुम्ही कुठल्याही व्यक्तिरेखेत फिट्ट बसता मग तो साधा सरळ नायक असो कि क्रूर खलनायक अस मी सांगितलं
त्या वर ते हसून Thanks म्हणतात.
         तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका करता कधी साधी सरळ तर कधी खलनायकी ढंगाची क्रूर कधी आनंदी तर कधी दु:खी! मग भाव भावनांचा हा मेळ कसा काय साधता? कारण थोडा वेळ तरी त्याचा परिणाम मनावर राहातच असेल ना ! अस मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं ,ते स्विच ऑन स्विच ऑफ पद्धतीने काम करतात.
नाटक,सिनेमा आणि सिरिअल्स यातलं त्यांच आवडत माध्यम नाटक आहे कारण ते लाईव असत त्यांना हिंदीतही काम करायचय पण ते योग्य संधीची वाट पाहताहेत
बरोबर आहे मराठीतले गुणी कलावंत हिंदीत फुटकळ भूमिका करताना पाहून लोकांना वाईट वाटत अस सांगताच त्यांनी नाना पाटेकरची आठवण करून दिली
त्यांच्या जीवनातली अविस्मरणीय घटना सांगताना त्यांनी मी वाईट गोष्टी चटकन विसरतो व चांगलच लक्षात ठेवतो अस सांगितलं.
            काल रात्री बारा वाजता ह्या सिनेमाची आठवण ते सांगतात "मी ती घटना कधीच विसरू शकत नाही
त्या सिनेमात मी ,मधु कांबीकर ,अलका कुबल वै, मंडळी होती. मी त्यात खलनायकाची भूमिका केली होती मी त्यात वाईट प्रवृत्तीचा आमदार असतो व अलका कुबल माझी बायको असते ती साधी सरळ व खूप चांगली असते मी तिचा सतत छळणारा व त्रास देणारा नवरा असतो मधु कांबीकर खलनायिका असते मी अलका कुबलला फसवतो अस त्यात दाखवण्यात आल होत त्या मुळे अलका कुबल वेडी होते .त्या सिनेमाच्या प्रीमियरला मी गेलो होतो बायकांची चिक्कार गर्दी होती सिनेमा सुटल्यावर काही जणीच माझ्याकडे लक्ष गेल त्यांनी अश्या काही नजरेन माझ्या कडे पाहिलं कि बस्स! आणि त्या एकमेकीला सांगू लागल्या," हाच बघ तो दुष्ट बायकोला छळणारा ह्याच्या मुळेच ती वेडी झाली" आणि त्या मला चक्क शिव्या देऊ लागल्या मला वाईट वाटल पण त्या वेळेस माझ्या सोबत रणजीत सिंह मोहिते पाटील होते ते म्हणाले अरे, हीच तर तुझ्या यशाची खरी पावती आहे ." !
अशोक शिंदे आपल्या अभिनय कारकिर्दी वर समाधानी तृप्त आहेत पण अजूनही त्यांना ह्या फिल्ड मध्ये खूप काही चांगल कारावस वाटतंय शिवाय समाजसेवाही करायचीय.
              अशोक शिंदेंचा प्रेमविवाह झालाय त्यांना दोन मुलीही आहेत आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून
ते आपला मोकळा वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत व आई वडिलांसोबत घालवतात अगदी घरकुल मधल्या अनिरुद्ध सारखाच कर्त्यव्यदक्ष प्रेमळ मुलगा ,पती आणि पिता पण त्या सिरियल मध्ये स्वभावाच्या अनेक छटा त्यांनी यशस्वीपणे पेलल्यात. त्याचे " संसार मांडते मी ", " शिर्डी के साईबाबा " आणि इतर अनेक सिनेमे,सिरीयल्स व अनेक नाटके तेव्हा येण्याच्या मार्गावर होते आतापर्यंत अशोक शिंदे यांचे जवळपास दोनशेच्या वर सिनेमे प्रदर्शित झाले आहेत .
            सध्या बरयाच चानल्स वरून त्यांच्या सिरियल्स सुरु आहेत विशेषत; स्वप्नांच्या पलीकडले हि स्टार वाहिनी वर प्रसारित होणारी डेलीसोप त्यांचे षड्यंत्र हे नाटक यवतमाळ येथे येऊन गेले तेव्हाही त्यांना भेटण्याचा योग आला त्यांनीहि आवर्जून आठवण ठेवून विचारपूस केली त्यांचा त्या नाटकातला खलनायक पाहून खरोखरच त्यांच्या अभिनयाची चुणूक दिसली.
                     त्यांच्यातला विनय,दुसरयाना मान देण्याची निगर्वी वृत्ती हेच तर त्यांच्या यशाच रहस्य आहे
पहिल्याच क्षणी साधेपणामुळे ते समोरच्याचे मन जिंकतात आपल्यातल्या मोठेपणाचा जराही गर्व त्यांच्या ठाई दिसत नाही. नुकताच त्यांचा नवा सिनेमा "विशेष म्हणजे ही माझी मिसेस " प्रदर्शित झालाय.
                        "स्टार प्रवाह" ह्या वाहिनी वर सध्या त्यांची "लगोरी "ही नवी मालिका पण  सुरु झालीय
त्यात ते आधुनिक प्रेमळ पित्याची भूमिका साकारत आहेत.
                 
 yojana.duddalwar@gmail.