Tuesday 12 June 2012

मेळाव्याची दुसरी बाजू

                          सध्या प्रत्येक जातीत मेळावे भरू लागलेत आर्य वैश्य समाजाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उपवर व उपवधू यांना आयुष्याचा जोडीदार योग्य रीतीने निवडता यावा म्हणून मेळाव्याची सुरवात झाली सुरवातीला त्याचा उद्देश चांगलाच होता मेळाव्यात तेव्हा ज्यांची लग्ने जमत नसत व जे आर्थिक दृष्ट्या गरीब असत अशीच मुलेमुली येत आप्पासाहेब आसेगावकर ह्यांनी पहिला मेळावा भरवला तेव्हा माझे वडील आमंत्रित होते तेव्हा मेळाव्याच स्वरूप चांगलच होत मेळाव्यातच तेव्हा गरीब मुलामुलीचे लग्न लावून दिल्या जात होत पण हळू हळू मेळाव्याची ख्याती पसरली त्यात थोडीफार चांगली मुले,मुली यायला लागली तेव्हा ह्या समाजकारणा कडे राजकारण्याचे लक्ष गेले आणि मेळाव्याचे अर्थकारण पण वाढले समाजकारण,अर्थकारण आणी राजकारण ह्या तिनी गोष्टी साध्य होतायत म्हटल्यावर मेळाव्याची गर्दी वाढू लागली आणि आता तर मेळावा इतका हायटेक झालाय कि लोक मेळाव्याकडे आपसूकच आकर्षित होऊ लागलेत
                             मग काय विचारता मेळावा समिती स्थापन झाली मग वर्गणी गोळा करण ओघान आलच त्यासाठी जास्त पैसे देणारे मोठे झाले त्यांना अध्यक्ष पद मिळू लागले जे जास्तीत जास्त वर्गणी देतील ते व्यासपिठावर दिसू लागले,पुस्तकात त्यांची नावे झळकू लागली उपवर,उपवधू यांची नावे द्या ,वर्गणी द्या म्हणून आग्रह होऊ लागला ज्यांची मुले मुली लग्नाची होती त्यांचे ठीक होते पण ज्यांचे कोणीही लग्नाचे नव्हते त्यांच्यावर भुर्दंड पडू लागला लोक ओरडतात हे लक्षात आल्यावर समाजातल्याच काहीना हाताशी धरून प्रत्येकाने मेळाव्यात यायलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण केली जाऊ लागली जे येत नाहीत व ज्यांना आपल्या मुलांची नावे द्यायची नाहीत त्यांची नावे त्यांना माहित नसताना घेण्यात आली त्या बद्दल विचारल्यास त्यांची लग्ने जमू न देणे व लग्न जमवायचे असेल तर ते मेळाव्यातच जमवावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्यात येतेय ह्यामुळे मेळाव्याचा मूळ उद्देश तर दूर जातोच शिवाय त्या मुला,मुलींचे लग्नही लांबते ह्याची जाणीव ठेवायला हवी शिवाय मेळाव्यात जमा झालेल्या पैश्यांचा हिशोब विचारल्यास त्याचे उत्तर तर दिल्या जात नाहीच उलट ज्यांनी हिशोब  विचारला त्यांना सामुदायिक एकी करून एकटे पाडले जाते त्यांच्या मुलांची लग्ने अडकवली जातात कारण त्यांच्या पर्यंत कोणाला पोहचूच दिल्या जात नाही आता तर अशी परिस्थिती निर्माण झालीय कि मेळाव्यात याल तरच लग्न जमेल नाही तर नाही त्या मुळे नाइलाजास्तव समाज बांधव आपल्या मुलांना घेऊन मेळाव्यात जातात पण तिथे लग्न जमेलच असे नाही मेळाव्यात मेळावा पाहण्यासाठी व वेगवेगळी गावे पाहायला मिळतात म्हणूनही लोकांची खूप गर्दी जमते मग चहा,जेवण,नास्ता,मेकअप व ह्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टीच बाजारीकरण होत,भरपूर कमाई होते शिवाय तरुणाई स्टेजवरच्या ramp walk ला भुलते पण आजच मेळाव्याच स्वरूप पाहता त्याला आधुनिक भाजीमंडईच स्वरूप आल अस म्हटल्यास वावग ठरू नये कारण मुलगी कितीही उच्च शिक्षित असली नोकरी करणारी असली तरीही तिला एकतर मेळाव्यात आणा नाहीतर मुलाच्या गावी आणुन दाखवा असा आग्रह करण्यात येतो
                            नोकरदार मुल मुली रजा घेवून मेळाव्याला हजेरी लावतात एकाच वेळेस खूप मुले,मुली एकत्र पाहायला मिळतात हि जमेची बाजू असली तरी त्याची दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी मुल,मुली लवकर निर्णय घेत नाहीत मुल जी चांगली असतात त्यांच्या मागे रांग लागते ती चढून बसतात दर वर्षी एक मेळावा झाला कि दुसरा असे पाच,सहा मेळावे तरी भरतातच मग पुढच्यावेळेस बघू अस करत करत आणि मेळाव्यांना हजेरी लावता लावता वर्षानुवर्षे निघून जातात आणि वयही मग कोणाशीही कित्येकदा तर आपल्याच गावातील मुला मुलीशी लग्न करावे लागते मग मेळाव्याने साधते काय ? हा प्रश्न पडतो मेळावे मेळावे फिरून ज्यांची लग्ने जमली नाहीत त्यांच काय! ह्याला जबाबदार कोण? मेळाव्यात जाउन आज अनेकांची लग्ने अड्कलीत.त्यांना नको त्या मनस्तापाला तोंड द्यावे लागतेय शिवाय चांगल्या मुलींना केवळ मेळाव्या मुळे वय वाढल्याने नकार दिला जातो म्हणजे सुंदर हुशार मुलींचे सहजा सहजी जुळणारे लग्न मेळाव्याने लांबते,अडते आणि ते होईल कि नाही इथपर्यंत अनिश्चिती येते त्यांना नैराश्य येत मग साहजिकच प्रश्न पडतो मेळावा हवाच कशासाठी ? शिवाय मेळाव्यामुळे मुलाचंही वय वाढतच पण हि मुल आपल्याच वयाच्या मुलीशी लग्न करायला तयार नसतात आपल्या पेक्षा दहा वर्षांनी लहान असलेली मुलगी त्यांना चालते मग ती दिसायला चांगली नसली तरी चालते चांगल्या मुली वय वाढल्याने अविवाहित राहतात त्यात त्यांचा दोष नसतोच कितीतरी सुंदर मुलामुलींची वय ४०-४५ पर्यंत वाढलीत  त्यांची नोंद matrimonial site वर केलेली असूनही त्याचं लग्न लांबल ते लांबलच
                 विशेष म्हणजे ज्यांना मेळाव्याची गरज नसते,ज्यांची नावे त्यांना न माहित होता घेतल्या गेलेली असतात त्यांचे काय?उगाचच त्यांची काहीही चूक नसताना बदनामी सहन करावी लागते त्याचं मौल्यवान आयुष्य वाया जात.मेळाव्यात मध्यस्थ सक्रीय होतात सारेच लग्न जमवण्यात रस घेतातच असे नाही काही जण जमणारे लग्न कसे मोडेल हे पाहतात त्यात काही नातेवाइक तर काही हितचिंतक म्हणवून घेणारे हितशत्रूही असतात   दरवर्षी अशी कितीतरी लग्ने मोडतात दर वर्षी मेळावे मेळावे फिरण्यापेक्षा जिथे चांगले मुले मुली आहेत तिथे जाउन पाहिल्यास वयही वाढणार नाही व वेळ आणि पैसाही वाचेल शिवाय योग्य वयात योग्य जोडीदार मिळेल.
               मेळावा भरवायचा आहे न जरूर भरवा पण जबरदस्तीने वर्गणी मागू नका खरे समाजकारणी आणा ज्यांना खरेच गरज आहे त्यांना आणा ज्यांना गरज नाही त्यांना येण्यास भाग पडू नका अन्यथा मेळावे बंद पडण्यास वेळ लागणार नाही.शिवाय जातीतून मेळाव्यातच यायला पाहिजे अशी सक्ती झाल्यास त्या विरुद्ध न घाबरता आवाज उठवणे केव्हाही योग्यच
मेळाव्यात नेऊन वय वाढवलेल्यांचा मग पुन्हा वेगळा मेळावा भरवून स्वत:चा फायदा उठवल्या जातोय लग्न जमत नाहीतच म्हणून मेळावा मुलांची लग्न जमवण्यासाठी भरवले जातात ना? आणि मूळ उद्देश लग्न जमवणे आहे ना? मग त्या साठी मेळाव्यातच यायचा आग्रह का ? हेच काम मेळाव्याच्या बाहेरही होऊ शकते त्या साठी इच्छाशक्ती आणि खरे समाजकारणी हवेत मेळाव्यांमुळे आज मुलामुलींची तिशी पस्तिशी उलटलीय हे कटू सत्य आहे

Saturday 9 June 2012

कचऱ्याचा निचरा

                                   असा  करा कचऱ्याचा  निचरा
       सध्या    कचऱ्याची समस्या जागतिक झालीय कचऱ्याचा निचरा कसा करावा? हा प्रश्न निर्माण झालाय  जिथे कचरा घंटागाडी द्वारे किंवा ट्रकद्वारे गोळा केल्या जातो तिथे हा प्रश्न काही प्रमाणात सुटतो पण जिथे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचतात तीथे हा प्रश्न गंभीर बनतो रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते कचरा इतरत्र उडून घाण पसरते जिथे उघड्या नाल्या आहेत तिथे नाल्यात कचऱ्यामुळे नाल्या तुंबतात त्यात डुकरे लोळतात नाल्यातील घाणपाणी रस्त्यावर पसरते घाणीमुळे डासांचा त्रास वाढतो  डासांमुळे मलेरिया डेंगू ,हत्तीरोग या सारखे अनेक रोग होतात म्हणुन रस्त्यावरचा कचरा नगरपालिके मार्फत उचलण्यास बाध्य करावे लवकरच पावसाळा सुरु होईल आणी कचऱ्याचा त्रास वाढेल म्हणून नागरीकांनी हे काही उपाय योजावेत  नागरीकांनी स्वतःस शिस्त लावून घ्यावी रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये कचरा घंटा गाडीतच टाकावा
                आणी कचऱ्याचा प्रश्न सुटावाम्हणून  घरच्याघरी कचऱ्याचा  असा निचरा करावा .
घरी जुना माठ  असल्यास किंवा एखादे जुने पोते असल्यास त्यात थोडी माती भरावी मातीत गांडूळ असल्यास टाकावे त्यात रोज भाजीचा कचरा ,खराब  झालेले अन्न  पूजेचे  निर्माल्य आणी इतर कचरा टाकावा .त्यात मधून मधून पाणी टाकावे कचऱ्याने माठ किंवा पोते भरत आले की त्यात पुन्हा माती टाकून त्याचे तोंड बंद करावे दोन तीन महिन्यात उत्तम खत तयार होते हे खत झाडांना टाकल्यास छान व भरपूर फुले ,फळे येतात जर अंगणात भरपूर जागा असल्यास एखाद्या कोपरयात  खड्डा खणून त्यात खत करता येऊ शकेल  हा झाला ओल्या कचऱ्याचा निचरा
        वाळलेला कचरा ,जुने कागद ,पाला पाचोळा एखाद्या जुन्या पत्र्याच्या डब्यात किंवा आंगणातल्या
एका कोपरयात जाळून टाकावा म्हणजे काही प्रमाणात  कचऱ्याचा  प्रश्न सुटेल व घरच्या घरी खत तर मिळेलच शिवाय आपले घर स्वच्छ आणी सुंदर दिसेल व आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल .