शुक्रवार ३१ जानेवारीला पंढरपूर येथे दोन दिवसीय नाटय संमेलन पार पडले जेष्ठ नाटककार श्री अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ९४ व्या नात्य संमेलनास सुरवात झाली संमेलन स्थळाला जेष्ठ साहित्यीक क.श ना नवरे तर चंद्रभागेच्या विस्तीर्ण मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचाला कै. विनय आपटे यांचे नाव देण्यात आले होते पोलिसांच्या रखुमाई सभागृहाला सतीश तारे असे नामकरण करण्यात आले होते. सकाळी सात वाजता टिळक स्मारक मैदानातून नाट्य दिंडीला सुरवात झाली दिडीत रांगोळीच्या पायघडया,घोडे ,उंट ,शाळेतील ३ हजारावर विध्यार्थि ,शंभर जणांचे वारकरी पथक , लेझीम पथक सामील झाले होते दिंडीतील लोककलाकारांनी ऐतिहासिक पात्र वठवून दिंडीत सहभाग नोंदवला होता तर काहींनी कार्टून च्या भूमिकेत ,लोकांशी हस्तांदोलन करीत लोकांचे लक्ष वेधून घेतले मावळत्या संमेलनाध्यक्षा सोबतच मान्यवरांचा दिंडीत सहभाग होता.
संमेलनाचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते झाले या वेळी नाटय संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे ,सांस्कृतिक राज्य मंत्री संजय देवतळे ,खासदार रामदास आठवले ,नाटय परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी ,सचिव दीपक कारंजीकर , कोषाध्यक्ष लता नार्वेकर,स्वागताध्यक्ष भारत भालके , राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थितीत होते व्यासपीठावर ,जेष्ठ नाट्यकर्मी ,फैयाज,लालनसारंग आदींचा समावेश होता.
या वेळी जेष्ठ नाट्यकर्मी बाळ कर्वे ,जयंत सावरकर ,फैयाज ,लालन सारंग ,झाडीपट्टी कलावंत परशुराम खुणे ह्यांचा सत्कार करण्यात आला ह्याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बक्षीस मिळालेल्या "टपाल "ह्या चित्रपटातील " सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री " पुरस्कार विजेती "वीणा जामकर" सर्वोत्कृष्ठ "अभिनेता मोहन आगाशे ", सुरेश शेलार यांचाही सत्कार करण्यात आला या वेळी मावळते अध्यक्ष मोहन आगाशे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे पदक प्रदान करण्यात आले.
मोहन आगाशे पंढरपूरच्या स्वागताने भारावून गेले. ते म्हणाले लग्नाची वरात व नाटय दिंडी ह्यात फरक असतो ,नाटय परिषदेत दर वर्षी आम्हाला अध्यक्ष म्हणून बसवतात व दुसरया वर्षी त्याला उठवतात य़ा वेळी आगाशे यांनी नाट्याध्यक्ष अरुण काकडे यांच्या हाती सूत्रे सोपवून त्यांना पगडी प्रदान केली.
ह्या नाटय संमेलनात तब्बल १५२ व्यावसायिक सिने नाटय कलावंत उपस्थित होते एरव्ही कार्तिकी व आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या टाळ मृदुन्गाने दुमदुमणारी पंढरी जेष्ठ नाटककार लेखक ,दिक्दर्शक ह्यांच्या उपस्थितीने दुमदुमली आणि रोज दूरदर्शनवरून, मालिकेतून दिसणारे कलावंत प्रत्यक्ष पंढरपुरात दाखल झालेत म्हटल्यावर लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली काहींनी आत प्रवेश मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली.
ह्या नाटय संमेलनास जब्बार पटेल ,रोहिणी हट्टंगडी ,रमेश भाटकर ,अशोक शिंदे ,फैयाज ,लालन सारंग ,मुक्ता बर्वे ,सुनील बर्वे ,शुभांगी गोखले ,सुहिता थत्ते ,सोनाली खरे ,मैथिली जावकर रीमा लागू आदी सोबतच अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
नाटय संमेलनाच्या पूर्व संध्येला "गाढवाच लग्न " हे धमाल विनोदी नाटक सादर झाल्याच मोहन जोशी ह्यांनी सागितलं ते पुढे म्हणाले ह्या नाटकाला पंढरपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला मुक्ता बर्वे ,रमेश भाटकर,रीमा लागू वै कलाकारांनी आम्ही काकडे काकांच्या प्रेमाखातर येथे आलो आहोत त्यांनी लेखी भाषणात मांडलेले मुद्दे अभ्यासु वृत्तीचे व छान आहेत आणि ते नक्कीच ते मुद्दे पूर्णत्वास नेतील अशी आशा व्यक्त केली मुक्ता म्हणाली कि त्यांनी प्रयोगिक व समांतर रंगभूमीच्या मागण्यांकडे लक्ष ध्यावे सूत्र संचलन पुष्कर श्रोत्री व सुधीर गाडगीळ ह्यांनी केले
नाटय परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले कि ,अजितदादा पवार यांनी जाहीर केलेला पाच कोटीचा निधी अध्याप आम्हाला मिळालेला नाही विशेष म्हणजे ह्याच कार्यक्रमात संजय देवतळे यांनी जोशिंच्या हातात ३ कोटी ७५ लाखाचा निधी व २५ लाख नाट्य संमेलनासाठीचा चेक दिला व त्याचा विनियोग योग्य कामासाठी करावा व कशासाठी वापरणार त्याचा तपशील व आराखडा सादर करावा असे सांगितले
ह्या वेळी संजय देवतळे ,रामदास आठवले ,सुशील कुमार शिंदे ह्यांची भाषणे झाली रामदास आठवले यांनी चारोळ्या सादर करीत भाषणात रंगत आणली ते म्हणाले कि ,लोक म्हणतात नाट्य संमेलनात नेत्यांनी लुडबुड करू नये पण तुमचे नाटक ,सिनेमे राजकारण्याचे पात्र असल्याशिवाय पूर्ण होत नाही मग नाटय संमेलन तरी कसे अपवाद असेल त्या मुळे आम्ही ती करणारच मोहन आगाशे म्हणाले कि आम्हाला एका वर्षासाठी बसवतात व नंतर उठवतात पण आमच्या पक्षात एकदा बसवले कि उठवतच नाहीत पुन्हा,पुन्हा बसवतात तुमचा अभिनय नाटकी असतो पण आमचा अभिनय न्याचरल असतो नाटय कलावंत व पडद्या मागचे कलावंत ह्यांचे मानधन वाढवण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली हर्षवर्धन पाटील ह्या संमेलनास उशिराने पोहोचले ते म्हणाले कि नाटकात सर्वच पात्रे एकदम एन्ट्री घेत नाहीत म्हणून मी उशिराने आलो.
नाट्यसंमेलनाचे उदघाटक केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून गतस्मृतीला उजाळा देत प्रायोगिक रंगभूमी ,दलित रंगभूमी ,बाल रंगभूमी नाट्यलेखक ,नाट्यस्पर्धा नाट्यशिबीर ,व काही तेलगु भाषिक कवी लेखक ह्यांचाही आवर्जून उल्लेख केला प्रायोगिक रंगभूमी नवी वाट चोखाळते ,त्यांच्यात प्रस्थापितांना धडक देण्याची ,नवे काही घडविण्याची क्षमता असते असेही ते म्हणाले रंगभूमीचे तंत्रज्ञान कसे बदलत गेले हे सांगताना त्यांनी पूर्वी मागचे पडदे बदलून दृश्य साकारत .पण" अश्रूंची झाली फुले " ह्या नाटकापासून फिरत्या रंगमंचाची सोय झाली त्या नंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नाटय इतिहासाचा आढावा घेतला सोलापूर जिल्ह्यातील हे तिसरे नाटय संमेलन असून पहिले संमेलन १९५७ साली डिसेंबर महिन्यात "भागवत थियेटर " मध्ये केशवराव दाते ,बाबुराव पेंढारकर व उद्योजक रतनचंद दोशी ह्यांच्या उपस्थितीत पार पडले होते नंतरचे २००८ सालचे नाटय संमेलन राजेशाही थाटात पार पडले होते आणि आताच हे तिसरे संमेलन पंढरपूर येथे होत आहे.
सुशीलकुमार शिंदे ह्यांनी शाळेत,संगमेश्वर कॉलेजात असताना नाटकातून कामे केली त्याची आठवण सांगताना ते म्हणाले ,केवळ सरांमुळे तोंडाला रंग लावून मी मुंबईची माणसे मध्ये "शांतेच पात्र "रंगवल मग काही काळ" घराबाहेर ,मोरूची मावशी ,करायला गेलो एक ,मंतरलेले दिवस लग्नाची बेडी "अशी अनेक नाटके केली मोरूच्या मावशीच्या भूमिकेच बक्षिसही पटकावल त्या मुळे मी जर राजकारणात गेलो नसतो तर नक्कीच अभिनेता होऊन मोहन जोशी विरोधात उभे असतो.सोलापूरचा नाटय इतिहास सांगतांना शिंदे म्हणाले सोलापुरातल्या जुन्या विठ्ठल मंदिरात संगीत नाटकाचे प्रयोग होत ." १९५७ मध्ये गंधर्व नाटक मंडळी "सोलापुरात महिनाभर मुक्कामास होती त्यांच्या पडत्या काळात "भागवत थियेटर" मध्ये झालेल्या त्यांच्या प्रयोगांना सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच"पृथ्वीराज कपूरच्या पृथ्वी थियेटरचाही "मुक्काम सोलापुरात होता त्यांनाही सोलापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
एकदा गणपतराव जोशी यांनी "ह्यम्लेट"च्या नाटक प्रयोगात चुकून तुकारामाचा संवाद म्हटला तो उशिरा त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माफी मागत पैसे परत देण्याची तयारी दाखविली पण लोकांनी पैसे परत घेण्यास नकार दिला इथल्या लक्ष्मी विष्णू मिल ,हरीभाई देवकरण प्रशाला ,श्रुती मंदिर येथे स्वयंवर ,संशय कल्लोळ आणि इतर संगीत नाटके होत सोलापूरच्या शशिकला जवळकर ,सरला येवलेकर जब्बार पटेल ,फैयाज ,दिनानाथ टाकळकर ,अतुल कुलकर्णी ,विनय बडवे ह्या सिने नाट्य कलावंतांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर यश मिळवले आहे पूर्वी नाटय लेखकांच्या लेखनात शब्दांच सौंदर्य होत हे सांगताना त्यांनी राम गणेश गडकऱ्यांच्या "एकच प्याला" ह्या नाटकात सिंदुच्या तोंडी एकदाही दारू हा शब्द आला नसल्याचे निदर्शनास आणले.
सर्व नेत्यांच्या लांबलेल्या भाषणामुळे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे ह्यांना वेळ कमी असल्याने भाषणाची छापील प्रत वाचा असे सांगावे लागले त्यातील ठळक मुद्दे सांगताना ते म्हणाले महाराष्ट्रासारखे सृजनकार्य इतरत्र होत नाही नाटकाचा पाया शालेय रंगभूमीवरच पक्का करावा नाटय कलेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा त्या साठी शिक्षकांना नाटय कलेच शिक्षण देण आवश्यक आहे गेल्या पंचवीस वर्षात नाट्यगृहाचे भाडे व इतर खर्च वाढले असल्याने तिकीट दर वाढवावे नाटकांना मिळणारी अपुरी सवलत ,समीक्षण ,विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव ,सध्याची मराठी रंगभूमीची अवस्था ह्या बाबतीतही त्यांनी विचार मांडले.
माझा नाटकाचा प्रवास अखेरच्या श्वासा पर्यंत चालूच राहील असे सांगतानाच सध्या भाषेच सौंदर्य लोप पावत असल्याची खंत व्यक्त करत ,भाषेत संस्कृती व संस्कारच सोन इतक रुजवल पाहिजे की त्यांनी हजारो ओंजळी भरल्या पाहिजेत अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ह्या संमेलनात नेत्यांचाच प्रभाव जाणवत होता सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे ह्यांनी ह्या संमेलनात गोरेगाव चित्र नगरीत पहिले नाटय विद्यापीठ उभारणार असल्याचे जाहीर केले विनया जोशी ह्यांच्या पसायदानाने उदघाटन सोहळ्याची सांगता झाली.