आषाढी एकादशी निमीत्य लाखोच्या संख्येने लोक वारी सोबत पायी पंढरपुरात दाखल झालेत गेल्या महिन्याभरा पासून ते वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या पालख्यांसोबत पायी चालत आहेत त्यात सर्व जाती धर्मातील,वयोगटातील सुशिक्षित,अशिक्षित,शेतकरी,व्यापारी,नोकरदार सामील झाले होते वाटेतल्या अडचणींना तोंड देत पावसातही ही वारी मार्गस्थ होत होती त्यात काही परदेशी नागरिक व विद्यार्थीही होते
वारीसोबत चालण्यारयात काही अपंगही होते एरव्ही थोडेसेही चालल्यावर थकणारे आणि दुरूनच वारीला नमस्कार करणारे मध्यम वर्गीयही आता उत्साहात वारीत सामील होऊ लागलेत वारी सोबत ट्रकमधून खाण्या पिण्याचे साहित्य आचारी,सामान सुमान आणि वेळ पडली तर आवश्यक मेडिकल सेवा पुरवणारी वैद्यकीय मंडळीही होती वारीत फुगेवाले चांभार,शिंपी,आणि इतर व्यावसायिकही होते टी वी वरून हे सार पाहताना जणू एखाद गावच सोबत चालतंय अस वाटत होत.
आज जवळपास दहा लाखांच्या आसपास भाविक पंढरपुरात दाखल झालेत सारे रस्ते भक्तांनी फुलून गेलेत पूर्वी वारी एव्हढी प्रकाशझोतात नव्हती पण वारीकडे परदेशी नागरिक आकर्षित झाले आणि वारीवर सिनेमा निघाला आणि वारी प्रकाशझोतात आली कारण सीनेमावाल्याच्या मागे मिडियावाले आल्याने त्यांना आपसूकच प्रसिद्धी मिळाली त्यातून तरुणाई पण वारीत सामील झाल्यावर नेतेपण त्यात सामील झाले आणि वारीतल्या लोकांची संख्या वाढत गेली वारीतल्या काही लोकांनी निसर्गाच्या सानिध्यात वडाच्या झाडाच्या पारंब्यांना लोंबकळून सुरपारम्ब्या खेळाचा आनंद लुटला.
पूर्वी वारीच एव्हढ प्रस्थ नव्हत पंढरपूर सोलापूर जिल्यातल माझ्या आजोळचे नातेवाईक नियमित वारी करणारे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ते पंढरपूरला जात काही जण शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी येत मला आठवतंय collageमध्ये असताना वारीचा मुक्काम सोलापूरच्या एका शाळेत होता माझे मावस भावजी पालखीची व्यवस्था पाहत आम्ही सारे नातेवाईक व शेजाऱ्यांनी मिळून तेव्हा वारीतल्या लोकांना खाण्याचे पदार्थ करून नेले होते तेव्हा टी .वी नव्हता पण प्रोजेक्टर द्वारा पडद्यावर गजानन चरित्र दाखवल्या जात होते.वारी सोबत आलेल्या एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजीबाइच आम्हाला तेव्हा नवल वाटल होत आईने घरी बोलवून तिला जेवू घालून ओटी भरली होती आता बरीच वर्षे उलटलीत माझ्या माहेरचे अजूनही वारीसाठी जेवण देतात.आता बसेस,रेल्वेची सोय झालीय पंढरपूरला सहज पोहोचता येऊ लागलय पण नवल म्हणजे वारीतून चालणाऱ्यांची संख्या वाढतच चाललीय आणि पूर्वी वारीत एक आजीबाई होती आज कित्येक आहेत माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नानंतरचा एक प्रसंग मला आठवतोय तेव्हा काही म्हाताऱ्या बायका आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणजे पंढरपूरला जाणारे म्हणून आमच्या पाया पडण्यासाठी वाकल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना थांबवल होत तेव्हा पंढरपूरला जाण खूप कठीण होत आज तेच लोक सहजतेन पायी चालत विठोबाच दर्शन घेऊ शकतात हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.आजच वारीच स्वरूप पाहता अस वाटत जणू विठोबाच्या दर्शनासाठी जाणारी वारी म्हणजे जातपात वय विसरून अखंड पायी चालणार चालत बोलत पर्यटन झालय
आमच मूळ घराण पंढरपुरच पुढे शिक्षणाच्या,धंद्याच्या निमित्यान माझे आजोबा सोलापुरात स्थायिक झाले त्या मुळे पंढरपुरात आम्ही नेहमीच जायचो तेव्हा आणि आता किती बदल झालाय ते आताच्या गर्दीतून दिसतय तेव्हाची थोडीशी गर्दीही आम्हाला खूप वाटायची तिथे आम्ही शांततेन दर्शन घेतलय तिथल्या झिपऱ्या शेवंतीचे गजरे घेत देवळात रेंगाळलोय दिवसभर देवळात नातेवाईकांच्या,मैत्रिणीच्या लग्नात सामील झालोय,हे आता सांगूनही खरे वाटणार नाहीं आता दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत गेलीय दर्शनाला चोवीस तास लागत आहेत तरीही वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलय हजारो मैल चालत आलेल्या वारकरयाना फक्त ओढ आहे ती विठू दर्शनाची

अशीच काहीशी अवस्था आज वारकरयाची झालेली असते.आम्ही वारकरी वारकरी करितो पंढरीची वारी
सोबत हत्ती अन अंबारी वाटे चालण्यात सुख भारी
वाट पंढरीची चालता दर्शन एकात्मतेचे घडे
विठू भजनी रंगता जगाचाही विसर पडे
देव नांदतो अंतरी परी दर्शनाची आस भारी
पाहता विठोबाचे मुख मिळे त्रेलोक्याचे सुख