काल सर्वत्र उत्साहात गुढी पाडवा साजरा झाला
विशेष म्हणजे यंदाचा गुढी पाडवा विविध क्षेत्रातल्या मान्यवर यशस्वितेंच्या हस्ते गुढी
उभारून साजरा करण्यात आला हि गुढी स्त्री शाक्तीचा जागर करीत ,सकाळ दैनिकाच्या वतीने " तनिष्का स्त्री प्रतिष्टा अभियाना अंतर्गत " कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात [ जिने दुष्टांचा,दैत्यांचा संहार केला अशी आख्यायिका सांगितल्या जाते त्या ] आदिशक्ती म्हणजेच स्त्री शक्तीच्या साक्षीने उभारण्यात आली
ठिकठिकाणी ढोल ताशांच्या निनादात , लेझीमच्या तालावर नाचत ,कुठे कवायती
सादर करीत तर कुठे नऊवारी घालून पारंपारिक वेशात मोटर सायकल वर स्वार होऊन
जुन्या नव्याचा सुरेल संगम साधत मिरवणूकीने पाडव्याचे उत्साहात स्वागत झाले खेड्या,पाड्यात
पुणे ,ठाणे ,नाशिक,व इतर ठिकाणी मान्यवर महिलेच्या हस्ते गुढी उभारण्यात आली कालचा गुडी पाडवा पाहून स्वातंत्र दिनाची आठवण आली इथे फरक इतकाच होता कि ही मिरवणूक गुढी पाडव्याची होती आणि इथे झेंड्या ऐवजी गुढी उभारल्या गेली अर्थात ही गुढी स्त्री स्वातंत्र्याची होती आता खरया अर्थाने स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणावयास हरकत नाही असे सुचित करणारी होती ह्या वर्षीच्या गुढी पाडव्याची नोंद निश्चितच ऐतिहासिक होईल
काही ठिकाणी विधवांनाही मिरवणुकीत सामील करून घेण्यात आले होते
आजचा हा स्त्री स्वातंत्र्याचा दिवस स्त्रीयांच्या नशिबी येण्यासाठी माधवराव रानडे, रमाबाई रानडे ज्योतिबा फुले, टिळक ,आगरकर ,इरावती कर्वे ह्या सारख्या कितीतरी सुधारकांनी अथक प्रयत्न केले
प्रसंगी दगडाचा मारा सहन केला सध्या सुरु असलेल्या झी टी वी वरील "उंच माझा झोका "मधून
आपण पाहतच आहोत आगरकरांनी स्त्रीयांना सलवार कमीज सारखाच सुटसुटीत पेहराव करता यावा
म्हणून सुधारक विचार मांडले पण ते अमलात यायला आजचा काळ यावा लागला
मधल्या पिढीने देखील स्त्री शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले साधी पदवी पर्यंत शिक्षण घेणे सुद्धा तेव्हा कठीण होते मग उच्च शिक्षण आणि परदेश गमन तर दूरच रमाबाईचा काळ स्वातंत्र्या पुर्वीचा होता पण मधल्या पिढीचा स्वातंत्र्या नंतरचा सलवार कुडता ,जीन्स आणि आधुनिक पोषाख घालण तेव्हा इतक सोप नव्हत आज साठीतली महिलाही सहजतेन हवा तो ड्रेस वापरू शकते. आज मुली सहजतेने नोकरी,शिक्षणाच्या निमित्याने परदेशात राहू शकतात त्याचे श्रेय मधल्या पिढीलाच द्यायला हवे.
हा बदल व्हावा म्हणून मधल्या पिढीने प्रयत्न केले मोकळीक दिली जे सण वार सोवळे ओवळे ह्यातून नव्या पिढीची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न केले तेच सण आज आनंदाने साजरे होत आहेत कारण त्याला ग्ल्यामर प्राप्त झालय. ज्या नऊवारी ऐवजी सहावारी घालणे तेव्हा सोपे नव्हते ती नऊवारी साडी आज हॊस म्हणून घातल्या जात आहे अर्थात त्यात वावगे काही नाही पण सण साजरे करताना पारम्पारिकता जपताना पुन्हा आपण मागच्या काळात तर जात नाही ना , ह्याचा विचार जरूर करावा एकीकडे सुनिता विlल्यम्स कल्पना चावलाने अंतराळात वास्त्यव्य करून जगाला स्तिमित केलेले असताना आपण सणा समारंभात गुरफटत तर नाही ना ह्याचे भान ठेवल्यास खऱ्या अर्थाने ती स्त्री स्वातंत्र्याची गुढी ठरेल
गुढी उभी राहिली आता पुढे काय ?
आता बायकांची समस्या सोडवणे ह्या गोष्टीला प्रथम अग्रक्रम द्यायला हवे सर्वात पहिली महिलांच्या जिव्हाळ्याची समस्या म्हणजे मंगळसूत्र घालून निर्धास्त पणे सर्वत्र फिरता येणे त्या साठी मंगळसूत्र चोरांना पकडून त्यांची रवानगी तुरुंगात करणे हे काम स्त्री प्रतिष्ठा अभियानातील महिला पोलिस करू शकतात घरा बाहेर जाताच होणारया चोरया रोखू शकतात घरा घरातून होणारा बायकांचा छळ रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतात कित्तेकदा बायकाच बायकांचे पाय ओढतात अशांना समज द्यावी
महागाई विरोधात काम करता येईल गावातील,शहरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना धारेवर धरता येईल आणि हे जेव्हा प्रत्यक्षात घडेल तेव्हा ती स्त्री प्रतिष्ठा अभियानाची खरी गुढी ठरेल