(नाशीक येथून प्रकाशित होणाऱ्या पोलिस न्यूज ह्या पाक्षीकासाठी व मुक्त वार्ताहर म्हणून मी घेतलेली हि मुलाखत )
दामिनी,घरकुल,थरार,सांजभूल ,इन्स्पेक्टर ,कामेडी डॉट काम ,अशा छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा साकारताना आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवत घराघरात परिचित झालेली एक गुणी प्रतिभासंपन्न उगवती अभिनेत्री मैथिली जावकर यवतमाळ इथे षड्यंत्र ह्या नाटकाच्या निमित्त्ताने येउन गेली तेव्हा तिच्या ह्या नाट्य प्रवेश विषयी तिच्या अभिनय कारकिर्दी विषयी आणि एकूणच तिच्या विषयी जाणून घेण्यासाठी तिच्याशी बातचीत केली तेव्हा तिची लगबग सुरु होती षड्यंत्र ह्या नाटकात ती मेन रोल करत असल्यामुळे तिला बघायला ,तिची स्वाक्षरी घ्यायला व तिच्यासोबत फोटो काढायला येणारया तिच्या चाहत्यांची गर्दी होती त्या प्रत्येकांशी संवाद साधत ती फोटो देत होती त्या मुळे नाटक संपल्या नंतरच तिच्याशी बोलायला वेळ मिळाला सुंदर आणि गोड मैथिली आपल्या आदबशीर वागण्याने समोरच्यांना आकर्षून घेते.
नाटक संपल्यानंतर मुलाखत देताना मैथिली
मैथिलीने अगदी के जी ज़ि. पासूनच नाटकात कामे केलीत शाळेत असल्या पासून ते थेट महाविध्यालायापर्यंत प्रत्येक वर्षी ती नाटकात कामे करायची आणि बक्षीस पटकवायची लहानपणापासूनच तिने अभिनय क्षेत्रात यायचं हे नक्की केल होत शिकत असतानाच ती वेगवेगळ्या नाट्यस्पर्धेत भाग घ्यायची ,आंतर विद्यापीठ ,आंतर राज्य व कामगार कल्याण केंद्र अशा विविध स्पर्धेतल्या नाटकात तिने कामे केलीत आणि ह्या स्पर्धेत तिला उत्कृष्ट अभिनेत्रीच बक्षीस पण मिळाल. घरून तसा विरोध नव्हता फक्त शिक्षण पूर्ण करण्याची अट होती ती तिने पूर्ण केली. तिने हिंदी लिटरेचर घेवून M .A केलंय .
मैथिली मुंबईचीच तिथच तीच शिक्षण झाल आणि करिअरची सुरवात पण मैथिली म्हणते की ,मला अभिनया व्यतिरिक्त इतर कशात रस नव्हता मी ह्या क्षेत्रात आले नसते तर खूप अस्वस्थ राहिले असते मग मी काही केल असत कि नाही कोण जाणे आपली नाटकाची आवड जोपासत असतानाच मैथिलीने वेगवेगळे छंद पण जोपासलेत भरतनाट्यम ,स्विमिंग ,हॉर्स रायडींग ,कराटे ,खो,खो, ब्याडमींटन ह्यात ती पारंगत आहे स्काउट मधेही ती उत्साहाने भाग घ्यायची थोडक्यात तू आल राउंडर आहेस तर !म्हटल्यावर मैथिली हसून दाद देते.
मैथिली जावकर व अशोक शिंदे नाटकातील एका प्रसंगात
तुला पहिला ब्रेक कोणी दिला असे विचारल्यावर मैथिली सांगते
92 ते 95 पर्यंत मैथिली एकांकिका व नाटके करत होती मग सत्यदेव दुबेंनी तिला "सावल्या" ह्या नाटकात संधी दिली पण खरा ब्रेक प्रकाश बुद्धिसागर ह्यांनी "आई परत येतेय " ह्या नाटकातून दिलाय त्यात तिच्या सोबत उषा नाडकर्णी होत्या त्या नाटकात तिला बेस्ट अक्ट्रेस च बक्षीस मिळाल त्या नंतर" सुपारी "हि एकांकिका "डोळे मिटून उघड,उघड" केल त्यात विजय चव्हाण ,अतुल परचुरे होते "अफलातून" ,दांडेकरांचा सल्ला " ही कमर्शियल नाटक केली तिने संतोष पवारांचं "जाणून बुजून " केलाय सप्तपदीचे पायलट एपिसोड केलेत .त्या नंतर २००० साली तीच शोभायात्रा हे नाटक आल त्यातल्या '"बार्बी" ह्या फारिनर मुलीच्या भूमिकेन तिला नाव मिळाल स्वत:ची ओळख मिळवून दिली आणि मग त्यातल काम पाहून "चार चौघी" मिळाल त्यातला प्रतीक्षा लोणकरचा रिप्लेस रोल तिला मिळाला नाटकातली तिची कामे पाहून विशेषत: "शोभायात्रा " पाहून "कुमार सोहनिंनी" तिला"मानसी "मालिकेत काम दिल आणि मैथिलीचा आपसूकच छोट्या पडद्यावर प्रवेश झाला.दामिनी ,घरकुल,थरार ,कामेडी डॉट काम ,चार दिवस सासूचे ,सांजभूल अशा अनेक मालिकांनी तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली ती अधिकारी बंधूच्या हिंदी मालीकातुनहि काम करतेय सब टी वि वर एस बास आणि"सजन झूट न बोलो "मुधून ती येतेय.
हिंदीचा अनुभव कसा होता ? मराठी भाषिक म्हणून अडचण आली का ?
मैथिली सांगते - हिंदी लिटरेचर केल असल्याने भाषेची अडचण आली नाही शिवाय अधिकारी बंधूच सिरियल असल्याने फक्त स्टोरी वेगळी आणि भाषा वेगळी बाकी स्पॉट बॉय पासून क्यामेरा मन पर्यंत सारे तेच होते त्या मुळे अडचण आली नाही
नाटय सिरियल मधल्या घोडदौडी सोबत तिचा आता चित्रपटातही प्रवेश झालाय मैथिलीच्याच शब्दात सांगायचं तर तिने यशाची आणखी एक पायरी सर केलीय "आधारस्तंभ" ह्या चित्रपटात तिने लक्ष्मीकांत बेर्डे सोबत काम केलय त्यात ते दोघेही पत्रकार होते. खिमजीभाई सत्रा ह्या गुजराती उध्योगपतीचा हा मराठी सिनेमा तिच्या नाटकातल काम पाहून त्यांनी तिला हि भूमिका दिली ह्यात विक्रम गोखले ,दिलीप प्रभावळकर ,रमेश भाटकर ,अशोक शिंदे ह्या सारख्या मान्यवर कलावंतासोबत काम करायला मिळाल्यामुळे मैथिली खुश होती शिवाय ती सत्यमेव जयते ह्या चित्रपटात काम करतेय त्यात दोघेही इन्स्पेक्टर आहेत त्यातला व इन्स्पेक्टर सिरियल मधला इंस्पेक्टरचा रोल तिने खूप एन्जॉय केलाय त्यातला थरार ,धाडस ,घोड दौड तिला खूप आवडली वास्तविक जीवनातही तिला अस धाडस करायला खूप आवडत. मैथिली आई वडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे तु दौरयावर गेल्यावर ते तुला मिस करत असतील न! ती चटकन उत्तरते "हो, ना "!
आत्ताची मैथिली आणि पहिल्याची मैथिली ह्यात काही फरक झालाय का ? विशेषत:: मैत्रीणीत वावरताना मैथिली म्हणते ,मुळीच नाही ,घरी तर मी फक्त मैथिलीच आहे मैत्रीणीत देखील मी पूर्वी सारखीच मिसळते माझ्या आई वडिलांनी माझ्यावर असे संस्कार केलेत कि अजूनही माझे पाय जमिनीवरच आहेत ,मैथिलीला नातेवाईकात पूर्वीप्रमाणेच मोकळेपणाने मिसळायला आवडते
तू सौंदर्याची निगा कशी राखतेस ?
मैथिलि म्हणते कि ,मी व्यायाम अर्थात वेळ मिळाला तरच करते स्विमिंग करते तेलकट तुपकट खाण्याच टाळते शक्यतो घरूनच जेवण्याचा डबा नेते.
खरच , नाटक सिनेमा, सिरियल ह्यांचा तोल सांभाळताना मैथिलीन यशाचा पण तोल सांभाळाय
मैथीलीच्या अभिनयातली सहजता परिपक्वता तिच्यात देखील दिसते तिच्याशी बोलताना तिच्यातली
साधीसुधी निरागस मैथिली डोकावते तिच्यातली नम्रता मनाला भावते आणि तिच्या सहकलावंतांनी
तिच्या चांगुल पणाची दिलेली पावती पाहून मैथीलीच्या भावी यशाची खात्री पटते वेळ बराच झालेला असतो मैथिलीला पुढच्या दौरयावर जायचं असत मलाही घरी पोहचायची घाई असते "तुझे षड्यंत्र नाटकातल काम एकदम झकास होत ह !" असे सांगून व तिचे आभार मानून मी मुलाखत संपवते.
yojana.duddalwar@gmail.com
मैथिली जावकर |