Monday 31 December 2012

चिलकुर बालाजी

        हैद्राबाद पासून तास ,दिड तासाच्या अंतरावर "चिलकुर बालाजीचे"दाक्षिणात्य शैलीचे मंदिर आहे इथल्या बालाजीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची दक्षिणा मागितल्या जात नाही ,इथे पैसे टाकण्यासाठी हुंडी पण नाही .मंदिरा बाहेरिल दुकानातुन नारळ व हार घेऊन तो बालाजीला अर्पण केल्या जातो हारातील फुले भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जातात मंदिरातल्या गाभारयात थोड्या प्रतीक्षे नंतर सरळ प्रवेश मिळतो मूर्ती सुबक व देखणी आहे  मूर्तीला फुलांने सजवले जाते.विशेष म्हणजे इथल्या  देवाला एकशेआठ फेऱ्या घातल्या तर देव नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे त्या साठी एक कागद दिल्या जातो त्यावर खुणा करत प्रदक्षिणा घातल्या जातात सोबत तिथले ब्राम्हण मंत्र म्हणतात त्या मागोमाग मंत्र म्हणत प्रदक्षिणा घातल्या जातात ह्यात सुशिक्षित लोकही असतात प्रदक्षिणा घालण्यासाठी इतकी  गर्दी असते कि त्या गर्दीतून देवळात वाट काढत जावे लागते  घाई घाईत जथ्याने मंत्र म्हणत लोक प्रदक्षिणा घालताना दिसतात इथे दक्षिणा मागितल्या जात नाही पण चीलकुर बालाजीचे पुस्तक घेवून ते लोकांना वाटून ह्याचा प्रसार करा असे आवाहन केल्या जाते इथे संगमरवरी दगडापासून बनवलेले खलबत्ते,पोळपाट व इतर आकर्षक वस्तू   मिळतात